Wednesday, 30 September 2015

सुरेश भट : मी असा त्या बासरीचा सूर होतो!

सुरेश भट
मी असा त्या बासरीचा सूर होतो!
नेहमी ओठांपुनी मी दूर होतो!

प्रीतही आली फुलांच्या पावलांनी
हाय, मी चिंध्यांत माझ्या चूर होतो!

राहिल्या आजन्म चिंतामुक्त चिंता...
मी घरोब्याचे जुने काहूर होतो!

तू किती केलास भेटीचा अचंबा..
भूतकाळाचा जणू मी धूर होतो!

मी न साधी चौकशी केली घनांची
ऐन वैशाखातला मी पूर होतो!

कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो!

तेवते आहेस तू पूजेत कोठे?
एकदा मीही तुझा कापूर होतो!

---------------------------------

i liked this poem,

And concluded हे कवी जन "Lateral Thinking" करतात.
म्हणजे आपण नेहमी विचार करतो तसे क्रमश: न करता,
आधी कवितेची 4th line लिहीतात
मग 3rd line,
मग 2nd line
finally 1st line.

मी पध्दतशीर rhyms (यमके) जमा केली.
स्फूर्ती वगैरे किही नाही.
ठणठणीत जुळवाजुळवी.

आतुर होतो
मजबूर होतो
भरपूर
मगरूर
ढाराढूर होतो
नुपूर
मजकूर
शूर
हूरहूर

rajesh addition
(sanju pls ठोकून / काटछाट करुन या ओळी meter मधे बसव)

स्पर्श तो मखमली कधी मी मागतो?
ये तुझ्या पायीचा मी नुपूर होतो

वाहुनी गेले अता नये वाचता
नजरेतल्या पत्रातला मी मजकूर होतो

बोललेले अर्थ ना मी जाणतो
शब्द तुझा या कानी तर होतो संतूर होतो

भेट ती स्वप्नातली पुन्हा कधी ना पाहतो
काळ मजसाठी किती निष्ठूर होतो

प्रीती चा ना इजहार केला,
जाणते तू मी कधी इतका शूर होतो

हासुनी तू पाहता दुसरीकडे,
जीव हा नुसता असा हुरहूर होतो

Wednesday, 23 September 2015

छोटी छोटी बाते

काही समस्या  खूप कमी महत्वाच्या असतात्त , तरीही त्यावर काही उपाय मिळतो का यावर मी विचार करतो 

(१) ओला कचरा बास्केट : आजकाल सगळीकडे एवढे तरी प्रबोधन झाले आहे की कचरा ओला (किचन वेस्ट , फळे/भाजीपाल्याची साले,देठ इत्यादी )आपण पुण्यात वेगळ्या बास्केट मध्ये गोळा करतो ,हे जेव्हा सफाई कर्मचारी रिकामी करून आपल्याला परत देतो तेव्हा त्या बास्केट च्या तळाशी  कचरा चिकटलेला असतो,त्यावर उपाय काय?
काही जण प्लास्टिकच्या पिशवीत ओला ठेवतात ,त्याचा सफाई कर्मचार्या ला त्रास होतो .तो चिकट  ओला कचरा वेगळा काढून ,प्लास्टिकपिशवी सुक्या कचर्यात टाकण्याचे किचकट काम त्याला करावे लागते.
उपाय काय??
Ideally मला वाटते कि एक केळीचे पान बास्केट मध्ये ठेवावे, गोल कापून तळाशी आणि दुसरा  तुकडा गोलाकार फिरवून बास्केट च्या आतून साईडला ,
पण रोज केळीचे पण कुठे मिळणार मग त्या ऐवजी पत्रावळी विकत घेऊन ठेवल्या तर काम सोपे होईल .
ओल्या कचर्याच्या आतून पत्रावळी लावायच्या ,तळाशी अन आतून बाजूने, मग दिवसभर ओला कचरा साठवून सफाई कामगाराचे काम सोपे होईल, नुसती बास्केट उलटी केली कि सर्व ओला  कचरा रिकामा होईल व आपल्याला स्वच्छ बास्केट परत मिळेल.      

दुसरा विचार: ओल्या कचर्यासाठी जर बास्केट ऐवजी Nonstic pan ठेवली तर ??!  

(२) प्रवासी बॅग च्या तळाचे हायजीन /स्वच्छता कशी सांभाळायची ? आपण बॅगकुठेही ठेवलेली असते, रस्त्यावर , गाडीत,Toilet  मध्ये सुद्धा, भारतात आपले बांधव कुठेही थुंकत असतात, काय माहीत, आपण आपली बॅगकाही वेळ अश्या गलिच्छ ठिकाणी ठेऊन शेवटी घरी आणत असतो. 

मग bag च्या तळाचे हायजीन /स्वच्छता कशी सांभाळायची ?

जर आपण प्रत्येक वेळी घरी आल्यावर पाण्याने bag स्वच्छ धुवत असलो तर ठीक आहे. पण अन्यत: काही दुसरा उपाय आहे का?

सोचो सोचो …

जर आपण वेल्क्रोव ने तळाशी एक कागद चिकटवला आणि घरी प्रवेश करण्याआधी तो कागद काढून फेकून दिला तर ?

(3) सुरक्षेतील ढिलाई : बेल वाजते . आपण दार उघडतो,दारात इस्त्रीवाला असतो.आपण इस्त्रीचे कपडे घेतो, विचारतो किती झाले?
तो काही आकडा सांगतो. आपण पैसे आणायला आत जातो, जातांना दार बंद करावेसे वाटते पण त्याच्या तोंडावर दार बंद करणे फार उध्दटपणाचे वाटते म्हणून आपण दार उघडेच ठेऊन आत जातो (मोठ्या धोक्याला आमंत्रण )

उपाय : शू रॅक ड्राॅवर मध्ये रु.100-150 ठेवणे ,त्यातील पैसे देणे/पैसे दुकानात आणून देतोसांगणे /सरळ दार बंद करणे./असल्यास सेफ्टी दार बंद करणे.

Saturday, 12 September 2015

वाडा चिरेबंदी Reveiw


वाडा चिरेबंदी reveiw

यशवंतराव नाट्यगृह मध्ये (1 आॅगस्ट 2015 असावी) आम्ही इस्टमित्रांसह वाडा चिरेबंदी पाहिले.
परिणाम ताजा असतांना मनावर उमटलेले तरंग थोडे थोडे लिहित गेलो (public memory is short ! आज प्रेक्षकांना काहीच आठवत नसणार..... )

नाटकाचा कालावधी केवळ आठ ते नऊ दिवसांचा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर पाचव्या दिवशी मधला मुलगा मुंबईहून गावी येतो आणि चौदाव्या दिवशी तो निघून जातो,

नेपथ्यकाराला फुलमार्क्स
वाडा हाच या नाटकाचा हिरो आहे
( intnet info: नेपथ्यकार प्रदीप मुळ्येंनी विदर्भातल्या अनेक वाड्यांना भेटी देऊन सूक्ष्म निरीक्षण व अभ्यासानंतर नाटकाची नेपथ्यरचना केली होती.)
     photo from internet 👆
(आनंद मोडकांचं पार्श्‍वसंगीत हा या नाटकाला आणखी एक प्लस पाॅइंट आहे)
खोट्या प्रतिष्टेच्या कल्पनांना चिकटून राहणे
आणि संधींचा दुष्काळ.
त्यामुळे शोकांतिका, मन विषण्ण होते.
शेवटी भावनिक हिंदोळ्याचे हेलकावे पाहून मनाला रडू कोसळते.
हे कलाकार आणि नाटककाराचे यश म्हटले पाहिजे.
यावर उपाय काय असु शकतो असा विचार करायला भाग पाडतं हे नाटकातील सर्व कलाकारांचं यश आहे.
रोजचा किराणा भरायला पैसे नाहित,पण रिती प्रमाणे तेराव्याला गावजेवण झाले पाहीजे असा वैभवचा आग्रह !
बन्सिलाल मारवाडी उधार द्यायला नकार देतो (तर वैभव मारवाड्याचा उद्धार करतो...लोटा घेऊन आला होता वगैरे..पण आज तो वाडा विकत घेऊन demolish करायला बघतोय हे वास्तव त्याला पचत नाही)

निवेदिता सराफ ,मोठी सून,max footage, सुंदर काम, मुलांचे,नवर्याचे, वाड्याचे कवकुवत मुद्दे कायम झाकण्याचे काम करते,विदर्भाकडील बोली / हेल उत्तम सांभाळला.
वैभव मांगले मोठा भाऊ, काम चोख केलय.
कोकणस्थ सून, छान काम.
प्रसाद ओक धाकटा भाऊ ,शहरी नोकरदार
थोडा हिशोबी ,वाड्यातून काही वाटा मिळतोय हे पहाणारा त्याचवेळी सर्वांसाठी खूप काही करावसं वाटणारा.
नंदू : धाकटा भाऊ,नोकरासारखा राबतो
सिद्धेश्‍वर झाडबुके यांची निवड अचूक. ते प्रेक्षकांची सहानुभूती मिळवतात
प्रभा : वाचनामुळे शुद्ध भाषा बोलणारी, शिकायचं होतं पण वडिलांनी जुनाट विचारांनी शिकू दिलं नाही, लग्नाची प्रपोजल्स अडाणी माणसांची म्हणून तिनं रिजेक्ट केली, सर्वांना शाब्दीक चाबकानं फोडून काढण्याचं लायसेंन्स असल्यासारखी झाडत असते.
         photo from internet 👆
(intnet info: निवेदिता सराफ दीर्घकाळाने या नाटकानिमित्तानं पुन्हा रंगमंचावर दिसतील. वैभव मांगलेची अतिशय वेगळी भूमिका यात आहे. बोलीभाषा भूमिकेत सूक्ष्म रुजवण्याचं त्याचं कौशल्यही पुन्हा वेगळ्या प्रकारे इथं दिसेल. प्रसाद ओकची व्यक्तिरेखाही महत्त्वाची आहे. सिद्धेश्‍वर झाडबुके, नेहा जोशी या नव्या दमाच्या कलाकारांनीही आपली छाप एव्हाना निर्माण केलीच आहे. भारती पाटील, पौर्णिमा मनोहर यांचे अभिनयकौशल्यही आपल्याला माहीत आहे. प्रतिमा जोशी, विनिता शिंदे, अजिंक्‍य ननावरे असा सगळा संच छानच जमलाय आणि "वाडा‘सारखं "चॅलेजिंग‘ नाटक समोर असल्याने प्रत्येकाचा कस लागलाय.)

व्यंकटेशा ssss  किती वाजले विचारणारी आई.
न दिसलेले ट्रॅक्टर, मारवाडी, ट्यूशन मास्तर
सुरवातीला स्वार्थ जपणारी व पाच दिवसाच्या सहवासाने निस्वार्थपणे जवळ येणारी माणसं दिसतात.
वाड्याची अटळपणे येणारी शोकांतिका थांबवणे सर्वांच्याच ताकदीबाहेर असण्याची जाणिव अस्वस्थ करते, विशेषत: शहरी म्हणून अवास्तव अपेक्षा न पेललेल्या प्रसादची घुसमट पाहवत नाही, त्यामुळे शेवटी नंदुच्या हाकेला न उत्तर देता त्याने घेतलेली exit अनेकांना चटका लावून जाते.

internet वर माहिती मिळाली की लेखक एलकुंचवार  यांनी या नाटकाचे एक नव्हे तर दोन sequel लिहीले होते
वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ अशी तीन नाटकं. प्रत्येक नाटकाच्या दरम्यान दहा-बारा वर्षाचा कालावधी होता. म्हणजे एकूण तीन नाटकांत मिळून पस्तीस वर्षाचा काळ, अशी ही वेगळ्याच प्रकारची त्रिनाट्यधारा होती. तिच्यात देशपांडे नावाच्या विदर्भातील एका खेडेगावातील कुटुंबाची कथा असली तरी ती कुठल्याही एका कुटुंबाची गोष्ट नाहीय. हे नाटक सगळं सिंबॉलिकल आहे. खेडं आणि शहर यातलं अंतर, एकत्र कुटुंब पद्धती, जुन्या परंपरा, रीतीरिवाज यांचं आपल्यावर असलेलं दडपण, अंतर्गत नातेसंबंधाचं बिघडत जाणं, आजूबाजूच्या परिसराचं बदलणं हे सगळं या नाटकात अतिशय सुंदर पद्धतीने आलंय
व त्यांची इच्छा होती कि 5 तासांचे दिर्घ नाटक सादर व्हावे.
पण मला वाटतं  फारच heavy dose झाला असता.
( प्रेक्षक आणि नाट्यकलावंत दोघांनाही.)

नाटकात दु:ख आहे,त्याची काळोखी कलाकारांच्या मनावर पडत असेल का? मग ते कसे तालीम करत असतील असे प्रश्न मनाला पडतात.क्लासिक / दर्जेदार कलाकृती ही अपरीहार्यपणे शोकांतिकाच असावी लागते का? (शेक्सपीयर / जी.ए वगैरे??)

स्टेजवरिल प्रकाशमान /अप्रकाशीत कंदीलाचा उजेडात सादर होणार नाटक पाहून आम्हास वर्तमानकाळाचा विसर पडला होता,काहींच्या मोबाईल रिंगचा आवाज ऐकून भानावर आलो, अनेकदा सांगून silent का ठेवत नाहीत असा विचार करतांना silent कसा करायचा हे माहीत नसणे हि एकच शक्यता उरते !!

Annuncement सूचना : मोबाईल silent करा आणि ज्यांना silent करणे माहीत नसेल (अपमान झाला तरी हरकत नाही)त्यांनी जवळच्या जाणकारांकडून आपला मोबाईल silent mode वर ठेवावा.

एव्हढं सुंदर नाटक आवडल्याची पावती द्यावी असं अनेकांना वाटत असते पण तशी संधीच मिळत नाही,म्हणून नाटक संपल्यावर कलाकारांनी व रंगमंच सहाय्यकांनी रंगमंचावर यावे व प्रेक्षकांच्या standing ovation मानवंदनेचा स्विकार करावा ही विनंती.

राजेश मोराणकर