24 मार्च 2017
आज सकाळी फेरफटका करण्यासाठी पर्वतीला निघालो.प्लॅन असा होता की पर्वती चढून उतरायची मग तळजाई टेकडीवर जायचे...
सकाळची वेळ मन निरभ्र.
आणि रेडिओवर हे गाणं (अभंग) लागलं...
http://www.marathimati.com/entertainment/songs/anandache-dohi-anand-tarang/
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥
काय सांगू जाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥
ऐकल्यावर रेडीओ बंद केला.
आता हे गाणं 2-3 दिवस मनात फिरणार.
मुरणार....
मग चव आणखी वाढणार.
350 वर्षापुर्वीचे वाटेना इतकी आधुनिक भाषा मला तरी वाटली.
शेजारचा बंड्या म्हणतोना,
" काल पार्टीत कायच्या काय च धमाल झाली"
किंवा
" अरे यार,अश्विनने काहीच्या काही बाॅलींग केली ! काय गंडला तो स्मिथ "
किंवा एखादी फॅन म्हणते
" त्या गाण्यात रणवीर काय च्या काय नाचलाय !"
इथं त्या शब्दाचा अर्थ "अवर्णनीय" असा घ्यायचा असतो...
तुकाराम म्हणतात,
काय सांगू जाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥
अध्यात्मिक चिंतन करीत असतांना काही साक्षात्कार किंवा विठ्ठलाचे दर्शन किंवा काही वैश्विक गुपिताची उकल किंवा तत्सम काही गवसल्यावर जो अवर्णनिय आनंदाचा अनूभव त्यांना आला असणार त्याचे tranlation करुन इतरांना सांगावा असे त्यांना वाटले असावे.
आणि तुमची मंंझील गाठल्यावर पुढे चालण्याची गरजच काय?
त्याचे अध्यात्मिक निरुपण बुवा,महाराज मंडळी करतील तो आपला विषय नाही.
मला कौतुक त्यांच्या सोप्या शब्दांची निवड करुन पोचवण्याचे सामर्थ हे वाटते.
उपमा शोधायची तर सर्वोच्च सर्जनशील निर्मीतीक्षम अवस्था निवडण्यास पर्याय नाही म्हणून ,
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥
ज्याप्रमाणे गर्भाला जे आवडतंं,ते मिळवण्याची आस मातेला लागते,त्याप्रमाणे ही कल्पकता
'conceive' झाली तसा तो आनंद ही आपोआप प्रतिबिंबीत झाला असे त्यांना सांगायचे असेल.
जसा अनुभव आला,तो तसाच्या तसा, (आजच्या भाषेत "आँँखो देखा हाल' म्हणा किंवा photocopy वा recording सारखा म्हणण्यासाठी त्यांनी योजलेले शब्द पहा...)
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥
असा हा सरस अनुभव मुखे आला !
(modesty विनय...हे मी केले असे न म्हणता, हे माझ्याकडून झालं अशी नम्रता)
अशी अती उच्च विचार शक्ती
दुर्दैवाने आपण आज फक्त ,
एवढचं व्यक्त करु शकतो. असो.
श्रीनिवास खळे यांचे आभार ,त्यांनी गाथेतून हा अभंग निवडून चाल बांधली नसती तर आपण व्यस्त जीवनात कशाला हा अभंग वाचला असता ??
दिदी व आकाशवाणी /संंकेतस्थळ चे आभार.
ह्या अभंगात काही भर घालण्यास scope आहे का.
see the daring !
(तुम्हारी औकात क्या है,
तुम्हारी हिंमत कैसै हुई ?
वगैरे प्रश्न बाजूला ठेऊ या.)
rajesh addition
अर्थाचे कावडी, गीताचा सोहळा
तेथीचा जिव्हाळा, येथे प्रतिबिंबे ॥ 4 ॥
आनंदाचे डोही आनंद तरंग...