Wednesday, 23 May 2018

प्रयोगशील कांदाशेतीत अोळख मिळवलेले निमोण :ज्ञानेश उगले esakal

Inspirational Story



Thanks to ज्ञानेश उगले and esakal.25 May 2018.

नाही नदी, नाही नाला, नाही खळाळत पाणी
माझ्या गावच्या पाण्याची, आहे रीतच अडाणी...
प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील या अोळी जणू निमोण गावासाठीच आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. खळाळंत पाणी तर दूरच, पण वर्षानुवर्षं पाऊसही या गावावर रुसतो. तरीही गावच्या मातीची उमेदच जगावेगळी आहे. कांदा उत्पादकांचं गाव म्हणून निमोणनं ख्याती निर्माण केलीय. नाशिक जिल्ह्यात चांदवड या दुष्काळी तालुक्‍यातील हे दुष्काळी गाव. पावसाळ्यात जेमतेम पाऊस पडतो. त्यावर कसंबसं तग धरणारं हे गाव.

स्वतःची अोळख तयार केली
प्रतिकूलतेतही उभं राहताना स्वत:ची ओळख निर्माण करताना निमोणचा शेतकरी अत्यंत चांगल्या प्रतीचा कांदा पिकवतो. पिकविल्यानंतरही प्रतवारी करूनच विक्रीला नेणार, ही त्याची ओळख आहे. कुठलीही बारमाही सिंचनाची सोय नसतानाही शेतीत कायम वेगवेगळे प्रयोग करण्याची धडपड त्याच्यात दिसून येते.

कांदा, भाजीपाला आणि पशुपालनही
निमोणची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत
गाव शिवारात सुमारे ३५० कुटुंबे
मुख्य व्यवसाय शेती आणि त्यातही मुख्य पीक कांदा.
हंगाम व पाण्याच्या सोयीनुसार भाजीपाला पिके
एकूण क्षेत्रापैकी तीन हजार एकरांवर कांदा, तर उर्वरित पंधराशे एकरांवर अन्य पिके आहेत.
गावातील प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी क्षेत्र ८ एकर. पैकी पाच ते सहा एकरांवर कांदा.
पन्नास टक्के शेतकरी पशुपालन व दुग्धव्यवसाय. त्यातून दूध व शेतीला शेणखत उपलब्ध होते.

 अल्पावधीत कांदा बाजारात
ऑगस्टमध्ये नागपंचमी ते ऑगस्ट अखेरपर्यंत श्रावणसरी असतात. त्या कोसळल्यानंतरच्या गारव्यावरच लागवडीची तयारी केली जाते. त्या आधी सरी वाफे पाडून शेत तयार केलेले असते.

श्रावण महिन्यात अत्यंत कमी पाणी दिले जाते.
तोपर्यंत विहिरींमध्ये पाणीसाठा झालेला असतो. लागवडीपासून
ते काढणीपर्यंत पिकाला कमी पाण्याची सवय ठेवली जाते. जोडीला शेणखताचा चांगला वापर होतो. यामुळे लागवडीपासून सुमारे ८० दिवसांत कांदा सशक्त व काढणीसाठी तयार होत असतो.

बाजाराचा अभ्यास
पोळा सणापूर्वी या कांद्याची लागवड होत असल्याने त्यास पोळकांदा म्हणतात. त्याची हेक्टरी उत्पादकता रब्बी कांद्यापेक्षा कमी असते. ऑक्‍टोबरमध्ये हा कांदा बाजारात येतो. या काळात देशभरात कांद्याची कमतरता असते व त्यामुळे चांगला दर मिळतो. त्यामुळे उत्पादकता कमी असली, तरी त्याचे अर्थकारण बिघडत नाही. बाजारात चढ-उतार नेहमीच असतात. एखाद्या वर्षी तोटा जरी झाला, तरी दर वर्षी निष्ठेने पीक घेण्यात निमोणच्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. मग काही वर्षे नफ्याचीही मिळतात.

चार महिने जमिनीला विश्रांती
जून ते नोव्हेंबर या काळात कांदापिकात आकंठ बुडालेला निमोणचा शेतकरी डिसेंबर ते मार्च या काळात मात्र फारसे कोणते पीक घेत नाही. पाणी नसल्यामुळे ते शक्‍यही होत नाही. या काळात जमिनीला विश्रांती मिळते. एप्रिलनंतर हा शेतकरी पुढील हंगामाच्या तयारीला लागतो.

शेतकऱ्यांनी विकसित केले वाण
कमी पाण्यात खात्रीशीर उत्पादन कसे काढता येईल, याचा शोध घेताना वाणबदल करण्याचे इथल्या शेतकऱ्यांनी ठरविले. चांगल्या प्रतीचा गोल, रंगीत, चवदार, दुभाळका नसलेले कांदे अशा निकषांवर आपल्याच वाणांतून शोध घेतला. त्यातून मागील आठ वर्षांत निवड पद्धतीने वाण विकसित केले. त्याला स्थानिक भाषेत ‘चायना'' असे म्हटले जाते. अन्य वाणाच्या कांद्याला जिथे किमान १०० दिवस काढणीस लागतात, तिथं हे वाण ८० दिवसांत काढणीला येत. कमी कालावधी, कमी पाणी व  कमी खर्चात त्याची लागवड होते. यामुळे उत्पादनात एकरी १० ते १५ क्विंटलने वाढ झाली. निंदणी, कीडनाशक फवारणी, मजुरीच्या खर्चात बचत झाली. या म्हणीनुसार बीज शुद्ध करण्यावर भर दिला. काही वर्षांपासून सातत्याने त्यात सुधारणा केली. आता विश्‍वासार्ह बियाणे तयार करण्यात यश मिळाले.

शेतकरी गटाने केली निर्यात
निमोणमधील शेतकऱ्यांनी गट तयार केला आहे. शासनाच्या "आत्मा'' यंत्रणेचेही सहकार्य त्यांना मिळते. गटाने मागील वर्षी सौदी अरेबिया देशाला दोन कंटेनर कांदा निर्यात करण्यात यश मिळवले. येत्या काळात मार्के.िटंग व निर्यात यावर गट भर देणार आहे. : भाऊसाहेब गोसावी,९८५०७१७१५२.
अध्यक्ष- आई सप्तशृंगी शेतकरी गट, निमोण.
 : पंकज दखणे,  ९८५००३७३७६, गटसचिव

कांदा झाले  मुख्य पीक
साधारण १९८० च्या  दशकापर्यंत पावसाच्या पाण्यावर येणारी बाजरी, मका, मूग, भुईमूग अशी पिके घेतली जायची. त्या वेळी फक्त १० ते २० टक्के क्षेत्रावरच कांदा असायचा. मात्र, अर्थकारण सुधारण्यासाठी वीस वर्षांपासून कांदा हेच मुख्य पीक झाले आहे.

कमी पाण्यात उत्पादनाचे तंत्र
निमोणला सुरवातीपासून पाण्याची अडचण. पावसाळ्यात पाऊस अत्यल्प. बारमाही वाहणारी नदी नाही. जुन्या काळातील दोन नद्या आहेत. त्यावर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाझर तलावाची कामे झाली. पाऊस पडला, तरच बंधाऱ्यात पाणी साठते. तरच पुढे शेती चांगली होते. इथली बहुतांश शेती मुरुमाड आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला थोडा पाऊस पडला, तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विहिरींना पाणी उतरते. त्या वेळी कांदापिकाची तयारी केलेली असते. रांगड्या भाषेत सांगायचे, तर विहिरींना नुसता घाम जरी आला, तरी इथला शेतकरी कांदा लागवडीचे धाडस करतो. अत्यल्प पाण्यातही चांगल्या प्रतीचा कांदा काढण्याचे कौशल्य इथल्या शेतकऱ्यांनी अवगत केले आहे.

Monday, 21 May 2018

शेवग्याने बनविले लखपती !



Thanks to
लोकमत  न्यूज  नेटवर्क
Published: May 22, 2018 02:44 AM | Updated: May 22, 2018 02:44 AM

 भातशेतीमध्ये काही मिळत नसल्याची खंत चेतन याला लहानपणा पासून  होती  .
विक्र मगड : पालघर जिल्ह्यातील विक्र मगड तालुक्याच्या मुहु खुर्द गावातील शिक्षक असलेल्या चेतन रमेश ठाकरे याने शेवग्याच्या शेंगांच्या पीकातून अनोखी समृद्धी प्राप्त केली आहे.
येथील शेतकरी आजही तोट्यात असलेल्या पारंपारीक भातशेतीवरच जगतो आहे. मुहु खुर्द या गावातील या तरुण शेतकऱ्यांनी मात्र वेगळी वाट चोखाळली आहे. वडिलांच्या नावे असलेल्या जमीनीत आजपर्यंत पारंपरिक भातशेतीच केली जात होती तर त्यापैकी मुरबाड- दगडमाळ असलेली जमीन वर्षानुवर्षे पडीक अवस्थेत होती.
भातशेतीमध्ये काही मिळत नसल्याची खंत चेतन याला लहान पणापासून होती. काहीतरी वेगळे करण्याची संकल्पना त्याच्या लहानपणापासून होती. मात्र घरची परिस्थिती बेताची होती. आणि त्यातच शिक्षण सुरु होते. त्यामुळे शेतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नव्हता.
मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील शेतकºयांना एक वेगळी दिशा देण्यासाठी त्यांनी स्वत:च्या दगडाळ -माळरान असलेल्या पाऊण एकर शेतीमधे शेवंगा-मोरिंगा ह्या जातीच्या शेवग्याची लागवड केली तिचे सहा महिन्यात पीकही आले.
त्यांनी लागवडीसाठी जागा सपाट करणे, तसेच रोपे बनविणे, लागवाडी साठी खड्डे काढणे, शेणखत असा पाऊण एकर जागेसाठी एकूण १५ हजार रु पये खर्च केला आहे. त्यातच त्यांनी या शेवगा शेतीसाठी जीवामृत, शेण असे सेंद्रिय खत वापरले. त्यांनी ही शेवग्याची रोपे स्वत घरी बनविली त्यासाठी त्यांनी शेवग्याचे बी नाशीक वरु न मागविले होते.
पाऊण एकर जागेमधे ५०० झाडांची लागवड केली आहे. लागवडीसाठी त्यांनी ६ बाय ६ अंतरावर, १ बाय १ खोलीचा खड्डा खोदून रोपे लावली आहेत. त्याचे अवघ्या सहा महिन्यात उत्पादन सूरु झाले.
शेवग्यावर सहसा रोग कीड याचा प्रादूर्भाव होत नाही. शेवगा हे कमी जागेत, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पिक आहे त्याला पाच ते सहा दिवसातून पाणी दिले जाते मोरिंगा या जातीच्या शेवग्याची शेंग जवळपास दोन फुट लांब होते. एका किलोत पाच ते सहा शेंगाच मावतात आणि शेवग्याच्या शेंगांना ५० ते ५५ रुपये प्रतीकिलो भाव मिळत असतो.
चेतन ठाकरे या शेतकºयांनी आपल्या शेतात जवळपास २ टन माल निघेल असा अंदाज व्यक्त केला आहे आणि त्यातून एक लाख ते सव्वा लाखाचे उत्पन्न येणे त्यांना अपेक्षित आहे. या शेवग्याच्या पिकामधे आंतरपीक म्हणून त्यांनी डांगर, मिर्ची, मका, टोमॅटो, झेंडू अशी विविध पीके घेतली आहेत.

Thursday, 10 May 2018

खेबुडकर, तुम्हांवर केली मी मर्जी बहाल

धूंदीत गाऊ
मस्तीत राहू
छेडीत जाऊ
आज प्रीत साजणा..,

गाण्यांवर कवीची inviscible signature असते !

मी हे गाणं ऐकले अन् वाटलं
हे जगदिश खेबुडकरांचं गाणं आहे का?
why?

कारण key word 'धूंद" वा धूंदी
plus निसर्ग..वेली पानं फुलं असेल तर you can bet it has great chances to be जगदिश खेबुडकर

मी search केला
आणि yess
जगदिश खेबुडकरच होते.

मी 4 th May (पूण्यतिथी)एक कार्यक्रम पुण्यात पाहिला होता devoted to जगदिश खेबुडकर.

अशोक सराफ यांची reaction video clip दाखवली,ते म्हणाले,
"एक माणूस उच्च स्थानावर जातोआणि सात दशकं तिथच रहातो हे अद्वितीय आहे"
कारण rise अन् fall हा निसर्गनियम आहे.


त्या कार्यक्रमात त्यांची खूप hit गाणी गायली होती,
he was hard worker
never give up attitude.
म्हणजे inspiration + perspiration चा अनोखा संगम होते ते.

पिंजरा साठी त्यांनी 49 लावण्या लिहिल्या ज्या v.shantaram यांनी reject केल्या,

निराश होऊन जगदिश खेबुडकर घरी गेले,विचार करत राहीले
stylized विचार...

रात्री 2:30 वा v.shantaram ना फोन लावला,

तुम्हावर केली मी
मर्जी बहाल
नका सोडून जावू
रंगमहाल

pass !
rest is history !!

पापण्यांची तोरणं
 बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते
काळजातली पिरती
जवळी यावं, मला पुसावं,
गुपीत माझं खुशाल


तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल


हुरहुर म्हणु की ओढ
म्हणू ही गोड
या बसा मंचकी,
सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला रात ही
पसरे मायाजाल

तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल


लाडे-लाडे अदबीनं
तुम्हा विनविते बाई
पिरतिचा उघडला
पिंजरा तुमच्या पायी
अशीच ऱ्हावी रात साजणा,
कधी न व्हावी सकाळ


तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल

Saturday, 5 May 2018

शाश्वत शेती : सौ. सुप्रिया अवधूत भिडे

copy paste
forwarded
(salute to writer   सौ. सुप्रिया अवधूत भिडे )
पुर्णपणे शाश्वत शेती करायची या उद्देशाने आम्ही आमचं गावं गाठलं आणि काही अडचणी समोर आल्या .त्यातील मुख्य अडचण म्हणजे देशी बियाणे मिळणे.गावात आजूबाजूला चौकशी करून सुध्दा खूप पिकांची देशी बियाणे मिळेनात पण शोध चालूच ठेवला तेंव्हा एक नाव समोर आलं संजय पाटील.गेली 12 वर्षे हा माणूस देशी बियाणे जतन आणि संवर्धन यावर काम करत आहे.त्यांच्याशी बोलताना काही  गोष्टी समोर आल्या ज्या शेअर कराव्या वाटल्या तेच लिहीत आहे

         सध्या जगभरातील सगळ्या बियाणांची जी बियाणे बँक आहे ती नॉर्वे या देशात आहे  . तेथील काही कंपन्याच्या ताब्यात जगातील सर्व बियाणे आहेत .हरितक्रांतीच्या नावाखाली, अधिक उत्पादन देतील अशी आम्ही बियाणे बनवतो असे सांगून जगभरची सगळी बियाणे जमवून त्यावर प्रक्रिया करण्यात आली ;आणि मग नवी बियाणे त्या कंपन्यांच्या नावाने पेटंट मिळवून बाजारात उतरवली. शेतकऱ्यांना ही लालूच दाखवली की आपल्याला एका वेळी जास्त उत्पादन ,कमी वेळ ,कमी श्रम हे सगळे  ह्या संकरित बियाणाने साधता येते. साहजिकच जगभरची लोकं ह्याला भुलली आणि आपले स्वतः चे बियाणे टाकून हे तथाकथित उत्तम बियाणे घेतले.आता अशी परिस्थिती आली आहे की आपली पूर्वीची बियाणे तर नष्ट झाली आहेत आणि जी संकरित बियाणे आहेत ती तर परत वापरताच येत नाही .मग या कंपन्या देतील तरच आणि त्याच भावात  आपण अन्न पिकवू शकू .ते सांगतील त्या अटींवर जगाला ते नाचवत आहेत.कोणत्या देशाने काय पीक घ्यायचे हेही तेच ठरवतात .

            पण  सुदैवाने आपल्या देशात मात्र अजून काही प्रमाणात देशी बियाणं जिवंत आहे . त्याची जी कारण आहेत ती  म्हणजे आपली जैव विविधता ,आदिवासी लोकं (ज्यांना आमच्या तथाकथित विकासाचा गंध नाही ),काही जुन्या रूढीं परंपरा , आणि महिलांच्या परसबागा .
                 तसेच आपल्या पैकी खूप कमी लोकांना माहीत आहे की ज्या देशांना आपण विकसित म्हणून नावजतो त्यापैकी खूप देशांत शेतकऱ्यांनी त्याच्या  शेतात काय पिकं घ्यायचं हे सरकार ठरवतं. ते ही या बियाणं कंपनी सांगतील तेच पिकं घ्यायचं. पण सुदैवाने भारतात अजून अशी पद्धत नाही म्हणून छोटे छोटे शेतकरी आपलं बियाणं जगवू शकतात.


              आपल्या कडील सण साजरे करण्यामागे काही उद्दिष्टे होती .उदा.आपल्या कडे नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी करतात .त्या दिवशी माझ्या कडे जे पिकं आलं त्याचे तोरण दाराला लावायचे. म्हणजे जे धान्य माझ्या तोरणात नाही ते पिकं मी घेतले नाही हे कळायचं. इतर लोकं ते धान्य मला देणार मीहि तसेच करायचे.
दुसरा सण संक्रांत यात प्रत्येक स्त्री 5  जणींना वाण द्यायची त्यात आपल्याकडील बियाणे असायचे .म्हणजे एका घरी वेगळी 25 बियाणे मिळायची . आता शहरांशी  संपर्क आल्यामुळे गावातील बायकाही प्लास्टिक डबे वाण म्हणून देतात . कारण शहरात शिकलेली माणस राहतात ते थोडीच चुकणार आहेत .


             आपल्याकडे बियाणे विकणे हे पाप होते.आता पाप पुण्य हा ढोंगीपणा झाला त्यामुळे हे सण   नष्ट झाले . नाहीतर नुसता उपचार राहिला सण साजरा करायचा.
      नंदुरबार जिल्ह्यात  अस्थम्भा नावाचा डोंगर आहे तिथे अजूनही दिवाळीनंतर 150000 लोकं अश्वत्थामा च्या दर्शनासाठी येतात. नैवेद्य म्हणून आपले बियाणे आणतात आणि प्रसाद म्हणून तिथे ठेवलेलं बियाणं घरी नेतात.कोणीही हा उत्सव आयोजित करत नाहीत तरी रुढी नुसार स्वतःहून लोकं जमतात आणि बियाणांची देवाण घेवाण होते.

                आपल्या कडे धान्य साठवणे ,बियाणे टिकवणे ह्याच्याही खूप विचारपूर्वक तयार केलेल्या पध्दती होत्या .पण त्या आता गावातूनच हद्दपार झाल्या.
गावातील जुन्या लोकांना घोळात घेऊन विचारले की तुम्हाला या पद्धती कश्या माहीत नाहीत तर म्हणतात आमची मुले शाळेतून शिकून सवरून आली आहेत. ते म्हणतात तुम्ही अशिक्षित आहात तुम्हांला काही कळत नाही.तुम्ही नका शिकवू आम्हाला. हा अनुभव आमचाच नाही तर सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या खूप जणांना आलेला  आहे .खरंतर या लोकांना खूप ज्ञान आहे पण आपण अडाणी या न्यूनगंडा मुळे काही बोलत नाहीत.1922 ते 1938 भारतात सर अल्बर्ट हॉवर्ड नावाचे इंग्लंड चे शेती संशोधक येऊन गेले त्यांनी ब्रिटिश राणीला सांगितले होते की भारतातील प्रत्येक शेतकरी हा संशोधक आहे त्याला नष्ट करू नका जगाला ते घातक ठरेल.पण इथले शास्त्रज्ञ मात्र आमच्या शेतकऱ्यांना वेडं ठरवतात.नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एक अत्यंत खेडूत बाई ' राई बाई पोपेरे 'ह्यांचे बियाणांवर खूप काम आहे. पण जेव्हा पहिल्यांदा त्या स्टेजवर बोलणार होत्या त्यावेळी  समोर माशेलकर, भटकर,अकोलकर असे शास्त्रज बसणार आहेत मग काम जरी या बाईचं असेल तरी कोणीतरी शिकलेल्या माणसाने प्रेझेन्टेशन द्यावे अशी संयोजकांनी मागणी केली . पण संजय पाटीलांनी ते न ऐकता त्या बाई बोलणार हाच आग्रह धरला .ज्यावेळी त्या बाईने आपले ज्ञान दाखवले .तेंव्हा ही मंडळी आवाक झाली.ही शास्त्रज्ञ मंडळी तेंव्हा पासून त्यांच्या कडे जायला लागली .पण आमचा दृष्टकोन कधी बदलणार?
           आम्ही आमच्या पूर्वजांना नावं ठेवतो की माणसाची ओळख ते जातीवरून करायचे किती संकुचित होतें ते. पण दुर्देवाने सध्या  आपण माणसाची ओळख त्याच्या साक्षरते वरून करतो.त्याने ह्या युनिव्हर्सिटी हे संशोधन केले म्हणजे त्याला या बाईपेक्षा कितीतरी ज्ञान असणार असे आपण गृहीत धरतो.भारतात अश्या कितीतरी राईबाई आहेत ज्याच्याकडूनच आपलं जुनं शेती तंत्र आपल्याला कळू शकतं.या शास्त्रज्ञांनी प्रयोग शाळेत संशोधन केलेले असते ते कित्येक वेळी जमिनी वर लागूच होत नाही असे अनुभव आलेले आहेत.


              असे म्हणतात की भारतात तांदळाच्याच 15000 जाती होत्या. त्या नष्ट होऊन फक्त 500 वर आल्या आहेत पण ह्या जरी जाती आपण टिकवल्या तरी आपण जगात टिकू शकू.कारण भात हेच भारतचे मुख्य पिकं आहे .आता आपल्याला अश्या कितीतरी sites दिसतील की गहू किती त्रासदायक आहे आपल्याला हे सांगतात . हरितक्रांती च्या नावाने देशात मुबलक पिकं निर्माण होणार या गोंडस नावाखाली गहू आपल्यावर लादला .
मध्यंतरी रेशनवर 2 रु किलो गहू मिळायला लागला .त्यामुळे काही श्रम न करता जर धान्य मिळत तर शेती कराच कशाला ?असा विचार करून कोकणातील शेतकऱ्यांनी नाचणी घेणे सोडलं आणि घाटावर ज्वारी कमी पिकू लागली.कित्येक ठिकाणची ज्वारी आणि नाचणीची देशी बियाणे नष्ट झाली.त्यानंतर लगेच  असं संशोधन झाले आहे की नाचणी ,ज्वारी हे माणसाला हितकारक आहेत .म्हणून कित्येक डॉक्टर गहू बंद करून नाचणी आणि ज्वारी लोकांना खायला सांगतात  .म्हणजे परत ही पिकं घ्यायची तर बियाणे कुठलं ?याचं कंपन्याचं. नाहीतर यांचाच multi grain आटा घ्यायचा म्हणजे तुम्ही पिकवू नका आम्ही देते तुम्हाला वाटेल त्या भावाला.
                 पूर्वी आपल्या कडे धान्याची खूप variety होती.कोणत्या सणाला कोणते पदार्थ करायचे हे सगळे ऋतू,स्थळ ह्यानुसार ठरवले होते .ते सगळे आरोग्या साठी उत्तम होते .आता जागतिकरणं या नावाखाली फक्त गहू,तांदूळ आणि मका ह्या तीनच धान्यांनी आपलं  85 % खाणे व्यापून टाकलं आहे.त्यामुळे हळूहळू खूप प्रकारची स्थानिक धान्य लुप्त झाली आहेत.जी की निसर्गाने आपल्या साठी बनवली होती. ते नसल्याने आता नवनवीन  आजार निर्माण झाले.

या वर उपाय म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीने परत शेती सुरू करणे.आपली शेती ही शाश्वत ,परस्पर पूरक होती. फक्त एक देशी गाय आणि देशी बियाणे ह्या वर उत्तम शेती होऊ शकते.गरज आहे ती फक्त ते जाणून घ्यायची.
                    सध्या भारतात या बियाणे जतनावर खूप लोकं अगदी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.त्यांना multi नॅशनल co  धमक्या देतात पण तरीहि ते आपलेे  काम सोडत नाहीत. ही लोकं शेतकऱ्यांना जमा करतात त्यातील जुन्या लोकांकडून तेथील स्थानिक  बियाणांची माहीती घेतात .बाकीच्यांना पटवतात की देशी बियाणे च वापरा .जुन्या लोकांचे ऐका . तुम्हीच स्वतः त्याचे जतन आणि संवर्धन करा .बियाणे ही कधीही विकायची गोष्ट नाही  तसेच खरेदीही करायची गोष्ट नाही हे पटवतात . आपल्या कडील रूढी परंपरा ह्या शहरातील लोकांचे बघून सोडू नका, पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास ती शाश्वत  ठरते.भरघोस उत्पादन याकडे न बघता चांगले पिकं या कडे लक्ष केंद्रित करा.
जागतिक करार नुसार आपल्या कित्येक बियांचे पेटंट हे या multi नॅशनल  co. कडे आहेत .त्यासाठी लढा देणे ,शेतकऱ्यांना स्वतः कडील बियाणं समृद्ध करून त्यांची पेटंट घेऊन देणे अशी अनेक जोखमीची कामे ही लोकं करत आहेत. अश्या लोकांना मदत सोडाच पण त्यांची साधी माहितीही आपल्याला नसते.
       या सगळ्यांना दिर्घ आयुष्य मिळो ही प्रार्थना आणि त्यांच्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा