Thursday, 6 September 2018

चाँद से परदा किजीये,कही चुरा ना ले चेहरेका नूर !



30 एप्रील 2018 ( बुद्ध पौर्णिमा )
मित्राच्या लग्नाला वाराणसीला गेलो होतो.
परतीचा प्रवास ,
वाराणसी --हैद्राबाद आणि पुढे हैद्राबाद--पुणे असा होता.
भारताचा नकाशा डोळ्यापुढे आणला,
Flight मधे आमची सीट डाव्या बाजूला होती.
आज बुद्धपौर्णिमा हे माहिती होतं,
थोड्यावेळाने विमानातून आपल्याला पौर्णिमेचा चंद्र दिसेल,असा मी अंदाज मितालीला सांगितला !



photo from internet with Thanks

आता मनाची वैज्ञानिक window बंद झाली.
आश्चर्य म्हणजे आता कलात्मत विचारांची मनाची window उघडली गेली.
कल्पनाशक्तीने पुढे गेलो.
विमानाच्या खिडकीतून चंद्र दिसण्याची गोष्ट किती romantic.

photo from internet with Thanks


त्यातून त्याची सौदर्यदृष्टीने दखल घेण्याची गरज कितीजणांना वाटली असेल?
आणि icing on the cake म्हणजे त्यावर शायरीचा विचार येणे.
त्यावर मी काय comment करू या हा विचार करत डोळे मिटून शांत बसलो.

समीर ची शायरी आठवली, ते गाणं आठवलं ...

चाँद से पर्दा कीजिये
कहीं चुरा ना ले चेहरे का नूर
ऐ मेरे हमनवाज. ऐ मेरे हुज़ूर....


साधारण एक तासाने बायकोने "पौर्णिमेचा चंद्र दिसतोय बघ !!"
सांगितले.

everything was foreseen.
मनात आधीच पाहिले होते,
फोटो कसा दिसेल,
comment काय लिहायचे.


त्याक्षणी मला आश्चर्य वाटले ते human grey cells चं.

विमानाचा आश्चर्यकारक शोध,
निसर्गाचा पौर्णीमायोग,
तो विमानातून पहाण्याची आम्हाला संधी मिळणे,
त्याक्षणी माझा जीवलग जवळ असणे,
आणि ह्याचा साक्षीदार मी होतोय हे मला (आधीच)कळणे...

मी परमेश्वराचे आभार मानले.