Thursday, 27 June 2019

Short film script :Jagdish Kude, interview by Heramb Kulkarni (Thanks to Lokmat newspaper)

( I was impressed by this story, so i wrote this script ...Rajesh Morankar)


Short film :
TITLE : सहापट विद्यार्थीसंख्या वाढविणारा तांड्यावरचे शिक्षक
श्री.जगदीश कुडे :

The one-liner:
The teacher arrives to a ruined village school ( doors, windows stollen) and motivates/ persues illiterated parents to educate their kids.

The background:
Labours working as sugarcane - cutters live a normaded life, squeezed by sugarcane factory contractors by low payments and No welfare facilities.Since the labours n their families are moving place to place they dont have awareness to educate their kids and even push the kids for child labour.
Frustrated by the poverty, the labours take to liquers and torcher their families in anger.
The teacher is moved with this vicious cycle and poverty and tries single handedly against all odds to convince the labours to educate their kids, raises awareness to educate girls.

The Hero and the Twist:
Result, from a hopeless start he manages to graduate a sizable number of girls to graduate in a span of 14 years.
Unfortunately he gets no recognization from media or government.
objective of this film is to give publicity to his good work.
The premise:
Suger industries dominated villages.Jaalna.
Thanks.

Thanks to the interveiwer shri.Heramb Kulkarni हेरंब कुलकर्णी who highlighted this story by publishing interveiw in newspaper
Real life Hero : The teacher, shri.Jagdish Kude जगदीश कुडे :

--------------------------------
SCENE NUMBER ___
दिवस   वेळ:सकाळ 11:00  OUTDOOR.
(गुरुजींची बदली झालीय,नवीन खेडेगावात शाळा शोधताहेत)
गुरुजी : काहो शाळा कुठं आहे ?
किराणा दुकानदार : ते काय पुढं दीसतीय तीचं.
दारं आन खिडक्या कुणीतरी चोरुन नेऊन विकलीत, तीच बिल्डींग.
गुरुजी : (DIPRESSION चे भाव, स्वगत)
           कसं मनोबळ आणायचं.
            आभाळच फाटलयं
            कुठं आणि कसं शिवायचं
दुकानदार : तुम्ही नवे मास्तर का?
               आधीचे पळून गेले.
----------------------------------
           continued
शिक्षीका : या गुरुजी
गुरुजी : नमस्कार, किती आहे हजेरीपट?
शिक्षीका : कसला आलाय हजेरीपट.
               कुणीच येत नाही.
               घरोघर जावून मुलांना     
                आणायला पाहीजे पण रोजगार बुडतो म्हणून कुणीच पाठवत नाही.
गुरुजी : बर पाठवलं तर कुठं भरवणार शाळा ?
शिक्षीका : इथं अंगणात बसू या.
गुरुजी : उन्हातच ?
शिक्षीका : '........'
----------------------------------------
        SCENE NUMBER ___
दिवस   वेळ:सकाळ 8:00  OUTDOOR.
( साधारण 8 वर्षाच्या 2 आदीवासी मुली रानातून शाळेला जात आहेत )
मनू : सरु पाय उचल लवकर.
मनू : ते नवीन गुर्जी म्हणतात टायमावर यावं.
( दोघी भरभर चालताहेत)
मनू : (गाण्याची लकेर घेत...)
        रामाssss तुम आशा विसवास हमारा. नननाना नानाननाना रामाsss.
सरू : खूप ग्वाड वाटतं गं,कुणी शिकवलं ?
मनू : गुर्जींनीच....रामाssss तुम आशा
सरू : मला येईल का हे?
मनू : हे नवीन गुर्जी खूप छान आहेत,छान गोष्टी सांगतात,चोरी करायची नाही, साफ रहायचं,शिकायचं,
खूप सांगतात.
( आवाज दूर जातो)
--------------------------------------
SCENE NUMBER ___
दिवस .  वेळ:सकाळ 8:00  OUTDOOR.
( न दिसलेल्या Truck च्या idleing चा आवाज,मधूनमधून accelerating चा आवाज)
ठेकेदार : चला लवकर  लवकर,तुमचे किती आहेत?
बाप : तीन
कारकून : तस नव्हे,किती बाप्ये,किती बाया ते सांगा.
बाप : मी एक आणि दोन बाया
ठेकेदार : ए म्हतारे, तू कुटं चाल्लीस?
बाप: मी एक,बायको अन् आई.
कारकून : नाई ओ.म्हातारं माणूस चालत न्हाई. उसाचा तोडा कमी पडतो.
ठेकेदार : हात चालला पाहिजे हात. मजूरी उगाच देतो का. संध्याकाळ पर्यंत पंधरा Truck चं टारगेट आहे.
कारकून : लायनीत या आणि पटापट बसा ट्रक मधे.
बाप : सरू कुटय ?
आई : ती साळंला गेलीय
बाप : (संतापून ) झाल ना दोन रुपयाचं नुसकान, साळत जातीया.
(  मजूर बाया व माणसांची रांग पूढे सरकतीय)
--------------------------------------
SCENE NUMBER ___
रात्र .  वेळ: 10:00 pm INDOOR.
(झोपडीचं घर)
सरू : आई मी साळंला जावू ?
आई : सर बाजूला,कामं पडलीत.
सरू : आई जातेना मी साळंला.. जावू ?
आई : बापाला इचार.
सरू : आजी जातेना मी साळंला.. जावू ?
आजी : तुज्या बापाला कळल तर, फोडून काडल सगळ्यांना.
सरू : आजी जातेना मी साळंला.. दुसरी मुलं जातात,जावू ?
आजी : जा.
आई : अवो..
आजी : जा. बघूया काय होतय.
          फकस्त लवकर जा, त्याच्या डोळ्यास पडायच्या आदी ..जा.
सरू आजीला मीठी मारते.
---------------------------------
सीन for "DIRECTOR's presence",
director wants to summerrised All in few minutes...)

ऊस कापणी चाललीय
भयाण थंडीत कापत, पुरुष व महिला ऊस कापताहेत.
उसाच्या पानांनी अपघाताने कधी हात ही कापले जात आहेत.

सुरवातीला विस्कळीत मग synchronized ताल निर्माण होतो...
Backgrond music
lower C-chords चा गंभीर आवाज....

सप सप सप  कापण्याचा आवाज
music त्या आवाजाला imitate करते
Trand--Trand--Trand
              ला ला ला ला 

शब्द  जणू मनातले....

सप सप सप
         कोणासाठी
 सप सप सप
         कोणासाठी
सप सप सप
         कोणासाठी 

(music थोड्या वरच्या octave वर )
गाणाऱ्या चा आवाज चढतो....

खप खप खप
         कोणासाठी
खप खप खप
         कोणासाठी
खप खप खप
         कोणासाठी

राब राब राब
         कोणासाठी
राब राब राब
         कोणासाठी
राब राब राब
         कोणासाठी

(आवाज आणखी चढतो...)

शाप शाप शाप
        कशासाठी
शाप शाप शाप
        कशासाठी
शाप शाप शाप
        कशासाठी


लाभ  लाभ लाभ
        कुणापाशी
लाभ  लाभ लाभ
        कुणापाशी
लाभ  लाभ लाभ
        कुणापाशी

music A R रहमान गाण्याचा climax,
जय हो
जय हो
जय हो

Camera मध्ये तिरंगा...15 ऑगस्ट.

कुणा मजुराचा मोबाईल वाजतो...
कोणी call receive करत नाही..
रिंग tone....

"आसवेच स्वातंत्र्याची
आम्हाला मिळाली,
अरे पुन्हा आयुष्यांच्या
पेटवा मशाली....."

screen shows series of still photos quickly .(ऊस कामगार व हलाखीची परिस्थिती बददल photos )

scene ends.
---------------------------------
SCENE NUMBER ___
दिवस .  वेळ:सकाळ 10:00  OUTDOOR.
(शाळेच्या प्रांगणात गुरुजी आणि गोलाकार जमीनीवर मुलं मुली बसलेली आहेत)
गुरुजी : ( harmonium घेऊन)
           तुम आशा,विश्वास हमारा,
            तुम धरती,आकाश हमारा,
            रामा ...
मुलं/मुली : (corus मधे)
              तुम आशा,विश्वास हमारा,
             ( harmonium चे स्वर)
(गुरुजी मुलांच्या चेह-यावर पहाताहेत,
मुलांच्या चेह-यावरुन camera फिरतो,
मुलांच्या चेह-यावर आनंद)
गुरुजी : रामा राआआआमा
( harmonium चे स्वर.
  मुलांना खूण करतात)
मुलं/मुली : (corus मधे)
              तुम आशा,विश्वास .....हमारा
-------------------------------------
          ---continued---
गुरुजी : तू काल का आली नाहीस ?
मनू सरु ला ढोसते,
मनू : गुर्जी तूला इच्चारतेत. उभी -हा.
सरु : (उभी रहाते)
गुरुजी : तू काल का आली नाहीस शाळेत ?
सरु : मी आज कशी आली ते तूला म्हाईत नाई.
मी उद्या येईल का न्हाई,माला म्हाईत नाई.
गुरुजी : (स्वत:शीच ) या तर कवितेच्या ओळी वाटतात !
सरु : मी आज दोन रुपये बुडवले मजूरीचे.बापाचा डोळा चुकवून साळं त आले,संध्याकाळी ढोरागत मारंल तो आता.
गुरुजी : (sad) नाव काय तुझं ?
सरु : सरसोती
गुरुजी : सरस्वती म्हणजे विद्येची देवी.
तू शिकलंच पाहीजे.
गरीबीला कापणारी एकमेव तलवार म्हणजे शिकणं
------------------------------------
गुरुजी : मी बोलू का तुझ्या बापाबरोबर?
सरु : नका येऊ.आलात तर तुम्हाला बी दोन लाथा बसतील बापाच्या.
सरु : दिवसभर आमी उस तोडतोय.
         संध्याकाळी मजूरी भेटते.जातांना टरक मधून नेतात,येतांना पायी यायचं.
आई पैसं जपून आणते,मग वाणसामान आणते,मग जेवन बनवते,मग म्हनते पटपट खा, राकशस येईल.
मंग बाबा येतोच दारु पेऊन.
आधी आजीला दोन लाथा कारन तीच पुढे जाते मग आईला दोन फटके आन शिव्या.
जेवन कुटय विचारतो.
आश्यात तुमी समोर आलात तर सगळा राग तुमच्यावर निंगल.
नका येऊ तुमी.
-------------------------------------
    SCENE NUMBER ___
दिवस .  वेळ:सकाळ 10:00  OUTDOOR.
      ( VOICE OVER) निवेदन
महाराष्ट्रात सुमारे ____ हजार उसतोड असंघटीत मजूर आहेत.
कारखाने / ठेकेदार त्यांची अल्प मजूरी देवून पिळवणूक करत असतात.
त्यांना व कुटूंबीयांना कुठलेली विमा संरक्षण नाही, प्राॅविडंड फंड नाही.
फिरतीचं काम असल्याने ते कायम झोपडीत रहातात.
नैराश्य व गरीबीमुळे ते व्यसनांच्या आधीन होतात.
त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काहीही व्यवस्था नाही.
घराला हातभार लावण्यासाठी मुलांनाही बालमजूर होण्यास भाग पडतं.
काही सामाजीक कार्यकर्ते ह्यावर आवाज उठवतात.पण अजून सामाजीक जाणीव, सहानूभूती व मदत निर्माण झाली नाहीय.
-------------------------------------
SCENE NUMBER ___
दिवस .  वेळ:सकाळ 10:00  OUTDOOR.
( रानात झाडाखाली meeting)
गुरुजी : सर्वांनी आपले हात दाखवा.
( उपस्थीत मजूर आपले हात दाखवतात)
गुरुजी : हे रापलेले, घट्टे पडलेले, कापलेले हात पाहून मन कळवळतयं.
एवढे कष्ट करुन ही गरीबी.जणू जिंदगीची भाग्यरेषा पण पूसली गेलीय.
गुरुजी : गरीबीला कापणारी एकमेव तलवार म्हणजे शिकणं,म्हणून मुलामुलींना शिकू द्या. मुली घराला वर आणतील.
रघू: शिकून मुली कोण बॅलीस्टर होणार काय!
गणू : मघापासून शिक्षणाचं तुणतुणं लावलय. मास्तरा तू शिकलास ना.मग असा कोणता कलेक्टर झालास?
(काही क्षण शांतता)
म्हातारा मजूर : (उसळून) गण्या थोबाड फोडीन.मास्तरांना उलट बोलतोस.
अरे कलेक्टर मस्त शिकला असन,तो कलेक्टर हापीसात बसलाय,आपल्याला काय फायदा?
मी बालमजूर म्हनूण उस कापतोय,अजून तेच, आता हात भरभर चालत न्हाईत म्हनून ते वराडतात.
ह्या धंद्यात प्रमोशन न्हाई.
ह्ये मास्तर उलगडून सांगतोय काय कदर आहे का?
मला असं कोन सांगणारं मिळालं असतं तर मी बी शिकलो असतो.सुखाची जिंदगी मिळाली असती.
(विरोध करणारे मवाळतात)
गुरुजी : (हात जोडत) तेच म्हणतोय,
शिकू द्या मुला मुलींना.
---------------------------------------
AFTER 14 YEARS
मुलाखत.
(copy and paste from news paper lokmat with thanks)

सहापट विद्यार्थीसंख्या वाढविणारा तांड्यावरचा शिक्षक 
- हेरंब कुलकर्णी
बंजारा तांड्यातील विद्यार्थी स्थलांतर १०० टक्के थांबवून शाळेची पटसंख्या सहापट करणारे जालना जिल्ह्यातील श्रीराम तांडा येथील शिक्षक जगदीश कुडे यांची मुलाखत.
    हेरंब कुलकर्णी: तुम्ही २००४ साली या शाळेत आलात तेव्हा या शाळेची, तांड्याची स्थिती कशी होती? आज काय स्थिती आहे?
जगदीश कुडे :
  - मी आलो तेव्हा शाळेचे दरवाजे, खिडक्या काढून नेल्याने शाळाअंगणवाडीच्या खोलीत भरायची. तांड्यातील बहुतेक लोक रोजगारासाठी स्थलांतर करीत होते. शाळेचा पट फक्त २५ इतका होता व ती मुलेही दिवाळीनंतर पालकासोबत स्थलांतर करीत होती. आज शाळेचा पट १४७  आहे आणि त्यात २२  विद्यार्थी फक्त तांड्यावरचे आणि १२५ विद्यार्थी बाहेरून शाळेत येतात. त्यातील ५० विद्यार्थी हे इंग्रजी शाळेतून आलेले आहेत. ३० किलोमीटर अंतरावरून एकूण ९ गाड्यामधून मुले येतात. यावर्षी ६०० प्रवेश अर्ज आले होते; पण वर्गखोल्या दोनच व शिक्षक संख्या नसल्याने जास्त विद्यार्थी आम्हाला घेता आले नाहीत. इतका फरक पडलाय.    
हेरंब कुलकर्णी:
अशा प्रतिकूल स्थितीत सुरुवातीला तुम्ही काय केले?
जगदीश कुडे :
  - प्रथम मी या लोकांची बंजारा भाषा शिकून घेतली. त्यामुळे या लोकांना मी आपला वाटायला लागलो. नंतर पालकांची सभा घेतली आणि स्थलांतर करताना मुले सोबत नेऊ नका, आजी-आजोबांकडे मुलांना ठेवा, अशी विनंती केली. तांड्यातील वृद्ध व्यक्तींना विश्वासात घेतले. लोक तयार झाले; पण लोकांनी उन्हाळ्याच्या सुटीनंतर आम्ही येतो. सुटीत मुलांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आम्ही उन्हाळ्याच्या सुटीत शाळा भरवू, असे आम्ही सांगितले व त्याप्रमाणे आम्ही शाळा उन्हाळ्यात भरवली
हेरंब कुलकर्णी:
शाळेची गुणवत्ता उच्च दजार्ची असल्याने यावर्षी ६०० प्रवेश अर्ज आले. ही गुणवत्ता उंचावण्यासाठी काय प्रयत्न केले?
जगदीश कुडे :
  - विद्यार्थी गटपद्धतीने अध्ययन करतात. स्वयंअध्ययन कार्ड वापरतात. त्यातून मुले ६ अंकी संख्येच्या गणिती क्रिया करतात. इंग्रजी संभाषण करतात. सतत सराव करीत असल्याने मुलांची भाषिक प्रगती झाली आहे.  
हेरंब कुलकर्णी:
* शाळाबाह्य मुले शाळेत आणणाऱ्या बालरक्षक मोहिमेत तुम्ही नेमके काय काम करताय ?
जगदीश कुडे :
  - आमच्या तांड्यावर स्थलांतर थांबल्यावर आमच्या केंद्रात, तालुक्यात, जिल्ह्यात स्थलांतर थांबविण्यासाठी कार्यशाळा झाल्या. मी त्या सर्व  बालरक्षक कार्यशाळेत सहभागी होऊन मला आलेल्या अडचणी व उपाय मांडले. त्यातून इतर शाळांनीही विद्यार्थी स्थलांतर थांबविले. आमच्या मंठा तालुक्यात ८०० ते १००० विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले आहे. बालरक्षक चळवळीने संपूर्ण जालना जिल्ह्यात विद्यार्थी स्थलांतर थांबवण्याचा खूप चांगला प्रयत्न यावर्षी झाला.      
हेरंब कुलकर्णी:
तुमच्या मुलांना नैतिक शिक्षण तुम्ही कसे देता?
जगदीश कुडे :
  - शाळेच्या परिपाठात श्यामच्या आईच्या गोष्टी मी सांगतो. त्याचा खूप चांगला परिणाम होतो आहे. भ्रूणहत्या रोखण्यासाठी मुलींच्या जन्माबाबत प्रबोधन केले. आज तांड्यावर मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. पूर्वी मुली ७ वीपर्यंत शिकायच्या व बालविवाह व्हायचे. त्यामुळे ७ वी पास झालेल्या मुलीचा व तिच्या आईचा सत्कार हा उपक्रम सुरू केला. आज बालविवाह तर थांबले; पण तांड्यावर १२ मुली पदवीधर, ६ मुली डीएड व २ मुली डीफार्मसी आहेत. मुलांना सतत नैतिक गोष्टी सांगितल्याने मुले सापडलेली वस्तू आणून देतात. या तांड्यावर पूर्वी दारूभट्ट्या होत्या; पण आज तांड्यावर सर्व लोक निर्व्यसनी आहेत. सतत लोकांशी बोलून हे घडले.     
हेरंब कुलकर्णी:
ही सारी धडपड का करावीशी वाटते?

जगदीश कुडे :
  - खरे सांगू या शाळेवर मी आलो. मला या ऊसतोड मजुरांचे दु:ख बघवले नाही. अतिशय अमानुष कष्ट बघून वाटले की, या लोकांच्या मुलांना आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. यांची पुढची पिढी चांगली शिकून या कष्टातून बाहेर आली पाहिजे. हीच माझ्या धडपडीची प्रेरणा आहे.   
---------***********-----------------

Tuesday, 4 June 2019

रंकाळा morning walk

काहीनाही...कोल्हापूरला गेलतो...म्हटलं..चला morning walk ला जावूया.

operation 'भेट रंकाळा'...5 kms in 53 mins....पूर्ण सर्कल.

















4253 steps