www.deshdoot.com अशोक आरगडे,ओम शेती, विश्वनगर, पुणे हायवे ग्रीन गोल्ड सिड जवळ, वाळूज तालुका गंगापुर, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत 431133
copy and paste
with Thanks
शेती या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा जसा विकास होत गेला तसाच हा व्यवसाय अधिक गुंतागुंतीचा होत गेला. त्यामुळे शेती व्यवसायात हिशोब, नियोजन व अंदाजपत्रक इत्यादी बाबींना महत्त्व प्राप्त झाले. बरेच शेतकरी खरेदी-विक्री, खर्च-उत्पन्न इत्यादी बाबींची नोंद ठेवून शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसायातील कोणत्या उपक्रमातून किती फायदा-तोटा झाला हे हिशोब ठेवल्यामुळे समजते. पुढच्या वर्षाचे नियोजन करता येते. शेती व्यवसायाचे पृथ्थकरण केल्यामुळे त्याची प्रगती लक्षात येते व दोष काढून सुधारणा करता येते. शेती व्यवसायाचे नियोजन नियोजन म्हणजे तो एक आराखडा असून त्यात पुढच्या कामासाठी पूर्वकल्पना आखलेल्या असतात. शेती व्यवसायात कोणते उपक्रम राबवावेत, कोणत्या पद्धतीने राबवावेत व किती उत्पादन काढावे याचा अचूक अंदाज घेतला जातो. तसेच झालेले उत्पादन कोठे व केव्हा विकावे, उत्पादित माल किती दिवस गोदामात ठेवावा व त्यानंतर तो कुठल्या बाजारपेठेत विकावा याची पूर्वकल्पना केली जाते. बरेचशे शेतकरी शेतीचे नियोजन अलिखित किंवा मनातल्या मनात करतात. पण नियोजन शास्त्रो्नत व लिखित करणे आवश्यक आहे. शेती नियोजन म्हणजे एकात्मिक व आधुनिक कार्यक्रमाची रूपरेषा असून त्यातून व्यवसायाच्या विकासाविषयी अंदाज घेतला जातो. शेती नियोजन शेतकर्याला होकायंत्रासारखे उपयोगी पडते. त्यामुळे शेती व्यवसाय योग्य पाऊलखुणांनी चालतो. शेती नियोजनाचे महत्त्व सांगताना असे निदर्शनास आले आहे की, अस्तित्वात असलेल्या उत्पादन तंत्रात नियोजन केल्यामुळे शेती व्यवसायाच्या उत्पादनात वाढ होते. नियोजन एक शिक्षणाचे हत्यार आहे. ते शेतकरी व विस्तार कार्य करणार्या व्य्नतींना उपयोगाचे आहे. शेतकर्यांनी यात लक्ष घातल्यास नियोजनाची बाब सोपी आहे. ते सहज करू शकतात. नियोजनामुळे व्यवसायात वेळोवेळी बदल करता येतात. तसेच त्यातील मर्यादा, अडचणी समजताच साधनसामुग्री विषयी माहिती मिळते. थोड्नयात उत्पादनाची कोणती पद्धत कोणत्या उपक्रमासाठी योग्य आहे हे नियोजनामुळे समजते. व्यवसायातील गरजा जसे बियाणे, खते, इतर सामुग्री विविध उपक्रमांसाठी किती लागेल हे समजते. या सर्व सामुग्रीसाठी एकूण चालू भांडवल किती लागेल याचा अंदाज येतो. नियोजनाचा मुख्य उद्देश शेती व्यवसायातून उत्पन्न वाढवणे हा आहे. तसेच अंतिम उद्देश शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावणे हा होय. शेती नियोजनातील विविध तंत्र शेती नियोजनात साधनसामुग्रीचा कार्यक्षमतेने वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादन कार्य तंत्र (प्रॉड्नशन फं्नशन) या तंत्राच्या आधारे उत्पादनात वापरलेली जमीन, मजूर, बैलजोडी, खते, बियाणे, कीटकनाशके, पाणी इत्यादींचा वापर किती करावा याच्याबद्दल पूर्वकल्पना करता येते. सरळ कार्यक्रम तंत्र (लिनियर प्रोग्रामिंग) याचा शेती नियोजनात खूपच उपयोग होतो. निवडलेल्या मर्यादित शेती उपक्रमात असलेल्या मर्यादित साधनांचा जास्तीत जास्त नफा व कमीत कमी खर्च यासाठी अतिउच्च तंत्रज्ञान म्हणून याचा वापर करतात. वक्रता कार्यक्रम तंत्र. (नॉनलिनियर प्रोग्रामिंग) या तंत्राचा वापरसुद्धा उत्पन्न जास्त व खर्च कमी म्हणून शेती नियोजनात करता येतो. तसेच गतिमान कार्यक्रम (डायनॅमिक प्रोग्रामिंग) ज्या उपक्रमातून झालेले उत्पन्न व साधनांचा चालू भाव गृहीत धरून या तंत्राचा वापर जास्त उत्पादन व कमी खर्च पूर्वकल्पनेसाठी नियोजनात करतात. फेरबदल तंत्र (ड्रायव्हरसीफिकेशन मॉडेल) या तंत्रानुसार शेती व्यवसायात फायद्याचे उपक्रम वापरले जातात. त्यात जमीन व भांडवल योग्यरीतीने विभागून दिले जाते. या तंत्राचा उपयोग शेती नियोजनात जोखीम कमी करणे व जोखीम पत्करण्याची क्षमता वाढवण्यासाठी होतो. तसेच शेती व्यवसायाचा कारभार नीट चालविण्यासाठी खर्च, उत्पन्न, माहिती गोळा करणे, हवामानाचा अंदाज, व्यवस्थापनातील सल्ला कराराची शेती इत्यादी शेती व्यवसाय व्यवस्थापनात विचार होणे आवश्यक आहे. तसेच मागणी, पुरवठा किमतीविषयी योजना इत्यादींसाठीसुद्धा शेती व्यवसायात महत्त्वाच्या समजल्या जातात. जमा खर्चाचे अंदाजपत्रक हे नियोजनातील महत्त्वाचे तंत्र समजले जाते. शेती व्यवसायाचे अंदाजपत्रक पूर्वकल्पनेच्या रूपात शेती व्यवसाय नियोजन रूपांतर खर्च, उत्पन्न व निव्वळ नफा यामध्ये करतात. त्याला शेती अंदाजपत्रक असे म्हणतात. शेती व्यवसायाची मिमांसा अथवा पृथ्थकरण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. तो कालावधी कोणत्याही तारखेपासून चालू करता येतो. जसे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे धरतात. काही भागात कृषी वर्ष 1 जुलै ते 30 जून असे धरले जाते. थोड्नयात एक वर्षाचा कालावधी सोयीप्रमाणे धरावा व पुढे वर्षानुवर्षे तोच कालावधी शेती नियोजन व अंदाजपत्रकासाठी वापरावा. एका वर्षात विविध उपक्रमांवर पूर्व उत्पन्नात आधारीत खर्च उत्पन्न व नफा यांची नोंद करावी. त्यासाठी पिकाखाली असलेल्या क्षेत्रफळानुसार तसेच गायी, म्हशी, शेळ्या यांच्या कळपानुसार त्यांचे स्वतंत्र खर्च उत्पन्न व नफा असे पत्रक बनवणे आवश्यक आहे. तसेच शेती व्यवसायाचा सारांश रूपाने खर्च उत्पन्न व नफा काढावा. स्वतंत्र पत्रक बनवताना पहिल्या स्तंभात पिकाचे नाव/ कळपाचा प्रकार, दुसर्या स्तंभात पिकाखालील क्षेत्र/ कळपातील जनावरांची संख्या तिसर्या स्तंभात खर्च ‘क’/ एकूण खर्च, चौथ्या स्तंभात एकूण उत्पन्न व पाचव्या स्तंभात निव्वळ नफा असा आराखडा करून नोंद करावी. त्यानंतर तिसर्या, चौथ्या व पाचव्या स्तंभाची एकानंतर एक उभी बेरीज करावी. नमुना तक्ता 1) पिकाचे नाव – गहू, पिकाखालील क्षेत्र 1 हे्नटर, एकूण खर्च ए्नस, एकूण उत्पन्न ए, एकूण नफा ए-ए्नस. 2) हरबरा – पिकाखालील क्षेत्र 1 हे्नटर, एकूण खर्च-वाय, एकूण उत्पन्न बी, एकूण नफा बी-वाय. 3) ज्वारी – 1 हे्नटर, एकूण खर्च झेड, एकूण उत्पन्न सी, एकूण नफा सी-झेड एकूण 3 हे्नटर, एकूण खर्च ए्नस+वाय+झेड, एकूण उत्पन्न ए+बी+सी, एकूण नफा (ए-ए्नस)+ (बी-वाय)+ (सी-झेड). अशा रीतीने संपूर्ण शेती व्यवसायात वर्षाकाठी एकूण खर्च उत्पन्न व निव्वळ नफा किती झाला ते समजते. वर्षाकाठी त्या सर्व उपक्रमांचा प्रत्यक्ष निकाल एकूण खर्च, उत्पन्न व नफा काय आला हे पाहणे आवश्यक आहे. अंदाजपत्रकाच्या आलेल्या निकालानुसार पुढच्या वर्षाचे अंदाजपत्रक तयार करावे. कारण आधुनिक शेती व्यवसायासाठी ही महत्त्वाची बाब आहे. नाही तर शेतकरी बेहिशोबी शेती करतात. त्यांची स्थिती लागाम नसलेल्या आंधळ्या घोड्यावर बसलेल्या व्य्नतीसारखी असते, अशी म्हण आहे. म्हणून हिशोब ठेवून शेती करणे ही काळाची गरज आहे, असे सिद्ध होते. केवळ हिशोब ठेवून फायदा नाही तर त्याचे वर्षाकाठी पृथ्थकरण करणे गरजेचे आहे. वस्तुस्थिती संदर्भ कृषी विज्ञान केंद्र, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयु्नत विद्यमाने ‘शेतकरी’ शेती शाळांचे अशा विविध उपक्रमातून प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सर्व पिके व जोडधंदे यास चांगले महत्त्व दिले जात आहे. यात प्रशिक्षणार्थींना साहित्यरूपाने नोंदवही, पेन, दप्तर, हॅट इत्यादी सुविधांची व्यवस्था केली जाते. या प्रशिक्षणात शेती व्यवसाय व्यवस्थापन या विषयास महत्त्व देण्यात आले आहे. तसेच शेतीचा हिशोब, नियोजन अंदाजपत्रक, शेती भांडवलाचे व्यवस्थापन व बाजार नियोजनाच्या बाबींचादेखील समावेश आहे. त्याचबरोबर घरखर्च व्यवस्थापन कृषी तंत्र विस्तार शिक्षणाचाही समावेश आहे. हा उपक्रम ‘स्त्री’ शेतकर्यांसाठी महत्त्वाचा आहे. अशा रीतीने शेती व्यवसायात नक्कीच भरभराट होईल. कारण यात बँक, सोसायटी व बाजार व्यवस्था, सरकारी योजना इत्यादी विषयांवर भर दिला आहे.
अशीच एक वेगळे नियोजन यशस्वी शेतीकरिता
www.deshdoot.com तसेच अशोक आरगडे,ओम शेती, विश्वनगर, पुणे हायवे ग्रीन गोल्ड सिड जवळ, वाळूज तालुका गंगापुर, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत 431133. आपला आभारी असेल
संदर्भ व साभार : http://www.deshdoot.com तसेच अशोक आरगडे,ओम शेती, विश्वनगर, पुणे हायवे ग्रीन गोल्ड सिड जवळ, वाळूज तालुका गंगापुर, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत 431133.