Wednesday, 8 April 2020

हनूमानाकडून आज काय शिकायचं...,

हनूमान जयंती च्या शुभेच्छा

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।




मला शाळेचे दिवस आठवले,
आम्ही मंदिरात जायचो,
परीक्षांचे दिवस जवळ आलेले असायचे,
आम्ही, हनूमाना,मारुतीराया मला पास कर एवढेच मागायचो....
आमच्या अल्पसंतुष्टीवर मारुतीराय गालात हसत असतील !!

आम्ही मोठे झालो आणि
" हजारो हसरतें ऐसी,
कि ऐकऐक पर दम टूटे "
अशी अवस्था झाली  !!

तो विषय नाहीये,
बुद्धीमतां वरीष्ठं हनूमानाकडून काय शिकलो हा आहे.

सुधा मूर्ती ऐका कथेत सांगतात,
त्यांच्या शिक्षीका गोष्ट सांगत,आणि त्यातून काय शिकायचं हे ही.

तर द्रोणागिरी वरुन संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनूमान गेले असता, चूकी ची शक्यता शून्य करण्यासाठी ते पूर्ण pharmacy अर्थात द्रोणागिरी पर्वत च घेऊन आले !
(हनूमानाने विराट रूप धारण केल्याने द्रोणागिरी लहान दिसू लागला, तळहातावर घेऊन आले...)

यातून शिकण्यासारखा global संदेश काय ?????

स्वत:ला समस्येपेक्षा मोठे करा !!

हा आहे.
point to be noted milord
देवदास प्रमाणे दु:खाच्या भिंगातून पाहिले तर क्षूद्र  गोष्टी हत्तीएवढ्या दिसू शकतात
दू:खं देवदास बनून उगाळल्याने कमी न होता आणखी गडद होऊन त्याचीच झिंग चढते.

त्यापेक्षा,

दुनिया में कितना गम है,
मेरा गम कितना कम हे,
लोगोंका गम देखा तो,
मै अपना गम भूल गया...
(आनंद बक्षी)

असा approach ठेवला तर आपण समस्येपेक्षा नक्कीच मोठे होऊ शकतो.

हेच तर आज शिकायचं.