Tuesday, 24 August 2021

फुलं वजनावर विकता, कुठे फेडाल हे पाप?



फुलं वजनावर विकता,

कुठे फेडाल हे पाप?

निर्माल्य शिल्लक रहाते 

सुगंधाची होते वाफ !!


जगात सौदर्याची कुठे कदर ?

फूलांची होते तीच गत,

काही कुजतात इथे तिथे

काहींचे मग होते खत !!


काही नशीबवान थोडे

ज्यांच्या हाकेला मिळते उत्तर

मिळता कदरदान अत्तरीया

त्यांचे होते धूंदअत्तर !!!

---rajeshmorankar


Tuesday, 10 August 2021

कबूतरं , शीट आणि माझी गांधीगिरी

 


बाल्कनीत शिटून ठेवणा-या कबूतरांवर मी पूर्वी खूप चिडायचो. 

बाल्कनी स्वच्छ धूतली तरी 10-15 मिनीटात पुन्हा कबूतरांची नक्षी हजर असायची,

जरा मोकळी हवा घेत मोबाईलवर बोलावे म्हटले कि पाय कुठे ठेवावा हि पंचाईत.

यावर तोड काढण्यासाठी मी काय काय crimnal plans केले, एकदम खराटा घेवून कबूतरांना फटका मारायचा प्रयत्न केला,

काटेरी तार लावायचा विचार केला,

प्रत्येक वेळी कबूतरं मला पूरुन उरली.

माझा संताप होऊ लागला.


परवा eye specialist ला डोळे दाखवले तर त्यांनी sherlock holmes सारखं कबूतरं आहेत का विचारलं !! infections...


पूण्य मिळवण्याच्या मूर्ख कल्पनांनी टाकलेलं पायलीपायली धान्य....पहा video.

https://youtu.be/5S1rrj0zaAs




अचानक मी track बदलला.

चीडचीड करुन आत chemistry बदलते, आणि नसलेले आजार सुरु होतात.

आता मी कबूतरांकडे पाहून cute smile देतो,

आणि मुन्नाभाई movie त दाखवल्या सारखे बादलीभर पाणी आणि खराटा घेवून स्वच्छ करायला लागतो, आधी वाकता येत नव्हते आता मस्त हात जमीनीला लागतात, कामाचा झपाटा वाढलाय, बाल्कनी 37 seconds मधे स्वच्छ करतो.


15 दिवसात अर्धा किलो वजन कमी झालयं.(सहा महिने थांबा, chiselled and ripped मी दिसलो तर आश्चर्य वाटून घेवू नका !!)


आताशा मी कबूतरांची वाटच पहातो,

पुण्य मिळवण्याच्या भोंगळ कल्पना असलेल्या 

व्यापा-यांनी टाकलेलं पायलीपायली धान्य खावून माजलेली,

वजन वाढलेली कबूतरं कशीबशी पंख मारत 6 floor वर येतात.

religously त्यांचे विधी पार पाडतात,

मी त्या कबूतरांना sweetest smile देतो,

आणि बादली व खराटा घेवून स्वच्छतेच्या कामाला लागतो.


बघायचय....

कबूतरं हारतात 

की 

मी.


--------------***------------****----------***----------