Sunday, 10 October 2021

iot (internet of things)

 


          photo from internet with thanks.

सनी वैतागला होता,

"सर पकवतात यार मी बोललो, रिअल लाईफ एक्साम्पल द्या तर आधी पोर्शन संपवू दे "


मनी म्हणाली,

'आणि तो पहिल्या बेंच वरचा चतुर खूप शायनिंग मारतो, रट्टा मारून आलेल्या डेफिनिशन्स पोपटासारख्या सांगतो "

        photo from internet with thanks.

हनी म्हणाला," आपल्याला समजेल असं सोपं करून सांगणारे प्रोफेसर मिळायला पाहिजेत"

सानी म्हणाली," असे प्रोफेसर आहेत... इथेच आहेत"

" क्काय कोण आणि कुठे ?"



" ते काय, आजोबा तिकडे बाल्कनीत बसलेत"

" ते प्रोफेसर नाहीत, पण खुदा की कसम, टीचर पेक्षा कमी पण नाहीत "

"wow, ते हेल्प करतील आपल्याला ?"


"  i guess so "

पोरं पोरी आजोबां  कडे गेले.

photo from internet with thanks.   

आजोबांनी खुणे ने शांत रहा असे  सांगून समोर बोट दाखवले, त्यांचा हसरा चेहरा पाहून पोरांचा स्ट्रेस गेला.

एक बुलबुल पक्षी गार्डन मधला अंजीर खात होता,

" कुल यार"....मनी


हो, मी iot म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स बद्दल वाचलंय, आजोबा म्हणाले.


" मग आम्हाला सोपं करून सांगा ना प्लिज, खूप स्ट्रेस आलाय, मंडे ला टेस्ट आहे"...फनी.


" तुम्ही आपसात इंटरनेट chatting करता राईट?असा विचार करा की जर निर्जीव वस्तूंना internet उपलब्ध करून दिला,तर काय होईल,

ही खुर्ची डायनींग टेबल शी काय chatting करेल ?"


" हायला..कसला भन्नाट विचार आहे हा "


" आणि जर हे कप व बशी एकमेकांना कविता पाठवायला लागले तर,


कप म्हणाला बशी ला,

तुझा बरा वशिला ..


बशी म्हणाली कपा ला

तूच माझ्या कपाळा "


मनी तू कविता लिहितेस ना,

काय नवीन लिहिलंस?


काही च सुचत नाही स्ट्रेस मूळे,

पण आता तुमच्याजवळ छान फ्री वाटतंय.


असं शक्य आहे  का ? ....सानी न विचारले

नाही i was kidding to catch yr attention.

पण आता सांगतोय ते शक्य आहे,

तुमचा वॉटर फिल्टर choke झालाय तर तो technician तुमच्या घरी पाठवू शकतो,

जो तुमच्या सोयीने घरी येऊन फिल्टर candle बदलू शकतो !!


फनी चे डोळे चमकले, हे शक्य आहे का?

येस.

कसे काय?


वेल, नेहमी येणाऱ्या कंटाळवाण्या कामांसाठी, बिझनेस वाढवण्या साठी, मॅन पावर कमी करण्यासाठी, कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट ला नंबर देईल,आणि जसजसा फिल्टर कचरा अडकून choke होईल तसा त्याचा dp म्हणजे inlet pressure व outlet pressure यांच्यातील फरक (diff P) वाढेल,

हा dp इंटरनेट मधून कंपनीच्या डेटा बेस ला कळवेल, डेटाबेस ऑटोमॅटिक तुम्हाला  मोबाईलवर sms पाठवेल, 

"तुमचा वॉटर फिल्टर चोक होतोय,तुमच्या सोयीने टेकनिशीयन कधी पाठवू ".

म्हणजे त्या गाण्यासारखं,

न बोले तुम, ना मैंने कुछ कहा कहा,

मगर न जाने ऐसा क्यों लगा लगा,

के काम की "बिना कहे सुने ही" 

बात हो गयी !!


मग तुम्ही पाठवलेलं रिप्लाय sms maintenace विभागाकडे जाईल वगैरे.


डेटा science व artificial intelligence या हजारो लाखो फिल्टर्स चा chart वगैरे काढून किती वेगाने कुणाचा फिल्टर चोक होतोय हे पण ग्राहकांना सांगतील.


सनी म्हणाला, " पण ह्या माहितीचा  employment मिळवण्यासाठी काय उपयोग? "


"good Question ! "


स्टुडंट्स नी शिकतांनाच ग्रुप मिळून एखादी फर्म रजिस्टर करावी आणि subcontract मिळवल्यास फिल्टर बदलण्याचे काम स्वत: किंवा इतर माणसं ठेवून करू शकाल.

कारण शेवटी ते humanly च काम आहे.

सिस्टिम कितीही प्रगत होऊ द्या त्याची शेवटची कडी नेहमीच human रहाणार आहे,

sevicing, maintenance , plumbing, cooking आणि कूरियर ह्या कामांना मरण नाही !!


पण आमच्याकडे अजून degree नाही.


तुम्ही त्या zomayo deliveri man कडे driving  licence मागता का?


डिग्री म्हणजे driving  licence सारखी असते, त्यापुढे जाऊन काम करायचे असते.


OYO त्या निर्माता फक्त 16 वर्षाचा होता.


Quiz time...

पोरं घाबरली.


आता आणखी कश्या साठी iot वापरू शकाल?


" घरातले LED lights fuse झाले की iot कंपनीला सांगू शकते, 5 ऑफ 15 lights fused, need to be replaced.


ग्रेट

अजून काय?


मुलं डोकं खाजवू लागली पण काही सुचेना.


इन्शुरन्स चा विचार करा, संपला की लगेच नवीन quotetions चा sms.त्याला AI जोडला की compare ऑफ सर्व schemes, आणि क्रेडिट कार्ड ला काही choice दिला असेल, जसा buy the lowest इन this limit, की सरळ इन्शुरन्स buy करून receipt inbox मध्ये.

आपण मोकळे.

अजून?

"..........."

"how about smart fridge".....आजोबा


तो काय असतो?....हनी ने विचारले.


camera + AI + iot अश्या combo चा विचार करा,

तुमच्या आधी च्या 10 grosary lists चा अभ्यास करून आणि फ्रिज मध्ये कॅमेरा ने पाहून, माहितीचे analysis करून inventary reveiw प्रमाणे smart फ्रिज, बिंदास ऑर्डर देईल मॉल मध्ये, तुमच्या card च्या limit प्रमाणे payment ही होईल व दारात delivery आल्यावर तूम्हाला कळेल की भाजी संपली होती,दूध संपलं होते !!


"आयला कसला भन्नाट विचार करता तुम्ही."


"भविष्यात modern kitchen मध्ये हे नॉर्मल वाटेल."


आता स्मार्ट agreement बद्दल पण वाचतोय,

त्यात flight cancel किंवा वस्तू खराब निघाली की सरळ नुकसान भरपाई तुमच्या अकाउंट वर जमा होणार.


पोरं भारावलेल्या अवस्थेत गेली.


आजोबा तुम्ही आमच्या कट्टयावर येत चला.


अरे प्रत्यक्ष कशाला पाहीजेय,

virtual भेटू या कधीतरी,

तुम्ही धमाल मस्ती करत रहा... बाय

मी जरा ब्लॉग लिहितोय.

      photo from internet with thanks.


Tuesday, 5 October 2021

काय विचार करत असेल ती ??????

Quora वर हा फोटो पहिला.

एखाद्याला / एखादी ला दया येणार नाही. कुणी सांगितलं होतं 3 मुलं जन्माला घालायला?  असा प्रश्न ते उपस्थित करतील.

मला दया आली, मी परकाया प्रवेश केला, चिंतन केले,

script लिहिली. 


काय मिळालं पेरमात पडून..…

ही तीन नागडी पोरं??

साळा सोडली ते माज चुकलंच

आता थोरल्या ला साळत घालायच,

नाय तर भीक च मागयचा

काय करावा,कसं करू?


आता पोरं उठल्या वर भूक भूक म्हणून अंगावर येत्याल,

थोड्या येळानं यांचा बा येईल, पेवून, कमरेत लात घालायला,जेवन कुटं हाये ईचारत.


त्या ताई लई चांगल्या हायेत, ये सैपाक करायला म्हणल्यावत्या, म्याच कटाळा क्येला,

आस च करते, जाते त्यांच्या कडच,

त्याच कडेला लावतील.

सोच्चता लईच हाये त्यांच्याकडे, अंघुळी तरी 

भेटल त्यांच्याकडं.

(rational thinking and problem solving attitude, even in "have-Not" condition, optimistic end)


___ a rajeshmorankar sctipt.