Monday, 18 May 2015

कविता

सुरेश भट यांच्या दोन ओळी घेऊन एक पर्यावरणवादी कविता होईल असे मला वाटले ,
 …

original सुरेश भट

कुठे झाडे,कुठे पक्षी ,कुठे तेथे झरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता .



राजेश addition

तुझ्या वस्त्रांसम होती गर्द राई जिथे
आता राख वैराण नजर जाई जिथे
तुझे नि माझे ते स्वप्न मखमाली सरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता

तोडिल्या वेली,तोडली झाडे,काष्ठ नाम याला
फोडिला डोंगर,पत्थर विकून झाला
वनश्रीमंतवासी होता ,नागवा ठरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता

कसला विकास कसली हि राज-नीती
धनदांडगे नि पुढारी अशी हि अभद्र युती
बांधली खुराडी,मानवता गुदमरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता

एकीकडे असा  हा धन उर्जा विध्वंस दिसे
दुसरीकडे परंतु पिण्यास पाणी नसे
अपराधी, घे पोटात आम्हा धरे आता
जिथे भेटायचो आपण तेथे आली घरे आता

No comments:

Post a Comment