This inspiring article written by
श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७
Shrikantkulkarni5557@gmail.com
सुरेश हुंदरे गेले हे कळले क्षणभर मन सुन्न झाले. सुन्न होणे ही मनाची नैसर्गिक प्रतिक्रिया. पण सुरेश हुंदरे अचानक आपल्यातून जाणे म्हणजे पुढच्या पिढीने ज्या दिव्याकडून प्रकाश मिळवायचा तोच अकाली विझल्यासारखे झाले आहे. कोण होते सुरेश हुंदरे तर अतिशय मार्मिकपणे सांगता येईल. टी.व्ही वर आबुराव आणि बाबुराव ही बतावणी पात्रे आपल्या वडिलांचे बढाईखोर पराक्रम सांगतात आबुराव म्हणतो माझे वडील एका ढान्गेत अमेरिकेत पाउल ठेवतात तर बाबुराव म्हणतात हे तर काहीच नाही माझे वडील पहिलं पाउल चंद्रावर टाकतात आणि दुसरे मंगळावर. अशाच पद्धतीने मी जर तुम्हाला सांगितले की मी असा एक माणूस पहिला आहे ज्याने आपल्या व्यावसयिक कारकीर्दीत एकही रुपयांची लाच दिली नाही आणि एक रुपयापण काळा (२ नंबर) पैसा केला नाही तर तुम्ही म्हणाल काय राव आबुराव-बाबुरावची नवी गोष्ट सांगताय काय ? पण हा माणूस असाच विलक्षण होता आणि हे सत्य होते आणि त्यांच्या ३०—३५ वर्षांच्या कारकीर्दीत १५० कोटींची उलाढाल, १०० माणसांना रोजगार हे घडले. लाच न देता धंदा काय वेडेबिडे आहात का ? लाच देणे हे सत्य आपण किती स्वीकारले आहे की सुरेश हुंदरे हे रम्य कल्पना वाटावेत. सुरेशजींना भेटण्याचे २ प्रसंग मला आले त्यातला दुसरा आधी वर्णन करतो कारण माझ्या आयुष्यातली ती एक अभिमानाची गोष्ट आहे.
आमचे प्रिय शिक्षक कृ.ब.तळवलकर यांच्या नावाने २०११ चा “अनुकरणीय उद्योजक” हा पुरस्कार त्यांना द्यायचे आम्ही ट्रस्टी मंडळींनी ठरवले आणि त्यांची भेट घ्यायची ठरवले. त्यांच्या काही परिचितांनी ते कोणताही पुरस्कार घेत नाहीत आणि त्यांना आवडत नाहीत तेव्हा सांभाळून अशी गर्भित सूचना दिली. म्हटले जायचेच. फोन मिळवला येण्याचे कळवले त्यांनी पण “या भेटू” असा प्रतिसाद दिला. आम्ही चौघे पुण्याहून बेळगावला निघालो. तेथे त्यांचा poly-Hydron नावाने व्यवसाय आहे . सकाळी ११ वाजता त्यांच्या बिझनेस आश्रम अशी पाटी असलेल्या कार्यालयात पोहोचलो. स्वागत झाले. आत गेल्यावर स्वामी विवेकानादांचा पुतळा, सभोवताली अनेक पुस्तके व्यवस्थित लावून ठेवलेली कपाटे, भरपूर उजेड आणि मधोमध त्यांचे प्रशस्त टेबल. प्रसन्नपणे स्वागत केले. त्यांना अशा येण्याची सवय असावी कारण अनेक व्यावसायिक आणि व्यापारी संस्था शैक्षणिक संस्था त्यांच्या या बिझिनेस आश्रमास भेट देत असतात. ते स्वत: एक अभ्यास विषय झाले होते. पुरस्काराविषयी एकदम विषय काढायचा नाही असे आमच्यात ठरले होते त्यामुळे तुमच्या व्यावसायिक संकल्पना समजून घेण्यास आलो आहोत एव्हडी सुरवात केली. त्यांना त्याची व्यावसयिक जडण घडण, व्यावसायिक नीतीमूल्यांचे काटेकोर पालन आणि कामगारांचे स्वातंत्र्य यावर अतिशय परखड विचार ऐकवले. त्यांच्या व्यवसायाला नैतिक अधिष्ठान देणारी इन्कम टॅक्स संदर्भात एक घटना पण त्यांनी प्रांजळपणे ऐकवली.
“मी काही धुतल्या तांदुळासारखा नव्हतो पण या घटनेने मला विचार करण्यास प्रवृत्त केले. आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करावयाचे मी ठरवले. प्रामाणिकपणा मी प्रथम माझ्यावर लादला आणि मग सोनी आणि टोयोटा या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी या विचारांना बळ दिले. विवेकानंदांनी मार्ग दाखवला. चला आमचा कारखाना बघू यात.” असे म्हणून ते स्वत: आम्हाला घेऊन त्यांचा कारखाना दाखवू लागले. जाता जाता अनेक गोष्टी समजून सांगत.
“ मी आमच्या कारखान्यास बिझिनेस आश्रम म्हणतो. येथे प्रत्येकाने आपले व्यावसायिक नीती समजावून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वर्तन केले पाहिजे यावर आमचा कटाक्ष आहे. आमच्याकडे कोणत्याही कामगारास कंपनीचे बॅलन्सशीट / नफातोटा बघण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कामगारास मिळणारा इन्सेन्टिव्ह हा त्याने केलेल्या कामावर मिळतो. आमच्याकडे वेगळे क्वालीटी सेक्शन नाही. प्रत्येकाने आपल्या कामाची जबाबदारी घेतली तर या सेक्शनची गरज नाही. गेली अनेक वर्षे आमच्या उत्पादनात १०० टक्के अचूकता आम्ही सातत्याने जोपासली आहे. आमचे कामगार अपवादात्मक परिस्थितीत रजा घेतात. तर येथे सर्वजण समान आहेत माझे कामगार जे जेवतात तेच मी जेवतो. कँटीनमध्ये त्यांच्याबरोबरच जेवण घेतो. माझ्या केबिन मध्ये कोणासही प्रवेश असतो. येथील पुस्तके वाचू शकतो. मला प्रश्न विचारू शकतो. बाहेरील पाहुणे, सरकारी अधिकारी यांचा पण अपवाद नाही. कोणत्याही कस्टमरला फेव्हर करत नाही. आम्ही कोणालाही लाच देत नाही. पूर्वी येणाऱ्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यास आम्ही पैसे देत नाही असे सांगावे लागे. आता परिस्थिती बदलली आहे सरकारी अधिकारी येतात त्यांचे अकौंट तपासणीचे काम करतात त्याचा रिपोर्ट देतात काही त्रूटी आढळल्यास आम्ही त्यावरील दंड भरतो (अशी वेळ बहुदा येतच नाही) पण आम्हाला पैसे मागण्याची हिम्मत होत नाही. त्यांना कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात नाही. त्यांना हवे असणारे रेकॉर्ड दिले जाते. मदतनीस दिला जात नाही. माझे सरकारी काम झाले नाही तर १ महिन्याने आम्ही त्यांना काम न होण्यामागचे कारण लेखी विचारतो. आमच्या मागणीतील त्रूटी सांगा अशी विनंती करतो. तर काही न देताघेता काम होते. या जागेला आम्ही बिझिनेस आश्रम म्हणतो त्यामुळे प्रत्येकजण वस्तूचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतो. आमचा कामगार आणि स्टाफ यांना मी न सांगता वयक्तिक जीवनात हीच तत्वे पाळतो हे विशेष. साध्या इथे १०० सीएनसी मशीन आहेत. या कारखान्यातील प्रत्येक मशीन बँकेचे कर्ज न घेता आणलेले आहेत. आम्हास आत्ता पण एक रुपयांचे कर्ज नाही. आम्ही सर्वांसाठी हे ध्यानमंदिर उभे केले आहे. मी स्वत: पहाटे ५ वाजता येथे ध्यान करतो. कोणासही काम करताना ताण आला तर येथे येऊन ध्यान करण्याची मुभा आहे परवानगीची गरज नाही. मन शांत झाले की कामगार परत उत्साहाने कामास लागतात. ”
“आमच्या कडे ओव्हर टाईमची जरुरी नाही. वेळेत येणे जसे बंधनकारक आहे तसेच घरी जाणे. मी स्वत: हे कटाक्षाने पाळतो. मी इथून बाहेर गेलो की एकल स्कूल चे काम करतो. या संस्थेचे कर्नाटक विभागाचे कार्य मी बघतो. अनेक गरीब आणि वंचित मुलामुलींना या संस्थेतर्फे शिक्षण दिले जाते यासाठी सरकारी मदत घेतली जात नाही. सर्व काम स्वयंसेवक करतात. पहिली ते सातवीचे मोफत शिक्षण दिले जाते. प्रत्येक माणसाने आपला वेळ समाजासाठी दिला पाहिजे.”
सर्व कारखाना दाखवून झाला. जेवणाची वेळ झाली. कँटीनमध्ये सर्वांच्या बरोबर त्यांनी जेवण घेतले. आता त्यांच्या कार्यालयात बसलो. जे पाहिले ते अद्भूत होते.
आता विचारण्याची वेळ आली होती.
मी सरळ विचारले “आता आमच्या येण्याचा उद्देश सांगतो आम्ही आमच्या शिक्षकांच्या नावाने देण्यात येणारा “अनुकरणीय उद्योजक” पुरस्कार आपल्याला देण्याचे ठरवले आहे. तुमची सम्मती हवी आहे.” ते क्षणभर विचारात पडले.
“ मी पुरस्कार घेत नसतो हो! ”
“ आमच्या सरंची तत्वे जगणारी मानसे आम्ही शोधतो आणि पुरस्कार देणे हे गौण आहे. पण तुमच्या सारखी अनुकरणीय उदाहरणे लोकांपुढे आली पाहिजेत. विचार कराच नव्हे हो म्हणाच” मी.
त्यांनी ३-४ मिनिटे विचार केला आणि एकदम विचारले
“पुरस्कार कोणाच्या हस्ते देणार”...सुरेशजी
“ग्राहक पंचायतीचे बिंदुमाधव जोशी”...मी
“राजकारणातले कोणी नाही ना?”... सुरेशजी
“छे, आमच्या ट्रस्टमध्ये राजकारणातले कोणीही नाही सरांचे विद्यार्थी आणि कुटुंबीय”...मी
“मग माझा होकार आहे”
आम्ही अवाक झालो. आनंद झाला.
पुढे फेब्रुवारी २०११ मध्ये पुरस्कार वितरण सोहळा झाला. सुरेशजींनी जे मनोगत केले ते व्यावसायिकांसाठी वस्तुपाठच होता. त्यांना दिलेल्या पुरस्काराने कार्यक्रमास वेगळीच उंची मिळाली. या वर्षात देशात सर्वत्र अण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालले होते. त्यामुळे सुरेशजींच्या विचारांनी उपस्थित भारावून गेले.
पुरस्काराची रक्कम त्यांनी एका एकल शाळेस दिली. त्या देणगीस स्वत:चे नाव न देता आमच्या सरांचे नाव दिले केव्हडा मोठेपणा ! तशी रीतसर पावती पाठवली आणि पुढे या शाळेची प्रगती आम्हास कळवत.
एक व्यावसयिक आश्चर्य ठरलेले सुरेश हुंदरे हे पुढच्या पिढीस दीपस्तंभ ठरावेत. He was inspiring wonder.
Thanks to,