Veena world ची US East &West coast tour संपली,
सुरवातीला जरा अलीप्तपणे वागणारी मंडळीत आता चक्क बाँड निर्माण झाला,आता टूर संपणार म्हणून चक्क उदास वगैरे वाटायला लागले,मग मनालाच समजावले,"whatz goin on,इतकं सेंटी व्हायला काय तू टीनएजर वगैरे आहेस का ??"
शेवटचा दिवस होता,बस मध्ये खूप धमाल केली, सुरवात situation ला appropreate गाण्यांनी झाली,काय तर म्हणे,
तुम तो ठहरे परदेसी,
साथ क्या निभाहोगे,
सुबह पहली गाडी ssss से घर को लौट जायोगे..
(खरचं पहाटे 5:30 वा जायचे होते...)
अच्छा तो हम चलते है,
फिर कब मिलोगे? ....खरचं कधी !?
हम छोड चले है मेहफिल को,
याद आये कभी तो मत रोना....
नंंतर झिंंगाट गाण्यावर तरुणाई धमाल नाचले.मझा आ गया.
Mostly लोक्स 9th आॅॅगस्टला आले,running tour केली आणि आज पहाटे 21 आॅॅगस्टला मुंंबई साठी 'र' से रवाना हो गये ( हम 'र' से रुक गये...)
8:20 ला मित्र अभय मण्णूर हाॅॅलीडे इन हाॅटेल ला आला.
(अभय 1996 ला अमेरिकेला आला, संजू चा जीवलग मित्र !!)
अभय छान गातो, त्याच्या कडे बोस स्पिकर्स सह कराऔके सेट अपआहे. मी त्याला गाणंं म्हणण्याचा आग्रह केला,
अभयने सुरवात केली,
ओ हंंसीनी...मेरी हंंसीनी
कहाँँ उड चली, मेरे अरमानो के पंंख लगा के,
आश्र्चर्यकारक मधूर आवाज, साॅफ्टगायकी....
मग दुसरे गाणे,
तू ही रे,तू ही रे,
तेरे बिना मै कैसे जिऊ.....
तिसरे,
स्वर आले दुरुनी,
मी हळूच correction केले,
यार आले दुरुनी,
जुळल्या सगळ्या त्या ssss आठवणी, स्वर आले...
तो पर्यंत तबल्याच्या class करुन गंधार (मुलगा) आला. तो संस्कृत ही शिकतो!
मग आम्ही यशश्रीअभय च्याआयुर्वेदीक clinic ला गेलो
रिसेप्नीस्ट ने आठवण करुन दिली, एक वाजता FM रेडीओवर अभय चे गाणंं आहे.
अभय तिथंं उभा होता,मूर्तीमंंत सादगी ! भाव खाणंं,इंंप मारणंं यापासून तो शेकडो मैल दूर होता.
कार मधे त्यानंं ते गाणंं (जे रेडिओ ला पाठवलंं होतंं ते) वाजवलंं,
ह्रदयनाथ यांंच संंगित शब्दप्रभू सुधीर मोघे शब्द...
"रात्रीस खेळ चाले या गुढ चांंदण्यांं..."
मधुर आवाज, छान गायला!
सतेज यायला 20 मिनिटे होती, अभय म्हणाला, चला तुम्हाला इथला एलिझाबेथ लेक दाखवतो,
हा लेक आहे / पलीकडे डोंंगरावर ट्रेकिंंग ला जाता येतंं/ पिकनिकला जाता येतंं/इथंं गवतात मला दुर्वा मिळतात
माझ्या कानावर शब्द पडत होते पण मेंंदूवर दृृश्यांचा kaleidoscope
झाला...
background ला गाण्यातील शब्द आले,
" आभास सावली हा ,
असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते ,
असती नितांत भास"
अभय यशश्री तन्वी गंधार यांच्या भेटीने मन आनंदले.
त्यांचा निरोप घेऊन सतेज बरोबर रिना कडे आलो.
सतेज रिना आणि 4 वर्षाचा योहान.
आम्ही आलो म्हणून योहान खूप excite झाला घरभर धावला /धडकला
त्याचं अमेरिकन English बोलणं एकून खूप मजा वाटली.
ही मिताली मावशी ....रिना
मीठाssssली ? .....योहान
ओ एनर्जी, योहान .
मूड बनवायचा आहे? काही नाही फक्त सँँटानॅॅरो सॅॅनहोजे area तून एक round चालायचं,बास,इथली तरुणाई, महंगी cars, bars मधे बसलेले groups , दुकानांचा झगमगाट बघायचा,खुष व्हायचं,
दिवसाचा शेवट गोड झाला, सतेज व रिना खास ठिकाणी घेऊन गेले...स्वादिष्ट राजवाडी थाली.वाह.!!
(स्थानिकही इथे जेवून,बेहद खूष होऊन जातात)
पाॅईंट टू बी नोटेड मिलाॅर्ड, गुलाबजामच्या उजव्या बाजूच्या वाटीत श्रीखंड आहे... wow yummy !!