Monday, 8 August 2016

An evening in New York

06 Aug 2016
                                        मिताली आणि पियु (भाची...प्रियांंका)
Alister piyu's hubby






कनेटीकट हून पियू व अॅलीस्टरचा निरोप घेऊन न्यूयाॅर्कला आलो.
प्रचंड  ट्रॅफिकमुळे  साडेचार तास लागले .
56th street वर हाॅटेल होते.

संध्याकाळी फिरायला गेलो. आधी Broadway show ची माहीती काढली. लंडनला आॅपेरा पहायचा राहून गेला होता.आता Broadwayshow बद्दल खूप ऐकले होते. पता चला 49th street वर च्या थिएटरवर chicago शो आहे. बजेटचा पण प्रश्न होता पुढच्या रांगेतली तिकीटं obviously महंगी होती $139 वगैरे, (आधी काढली तर स्वस्त मिळतात म्हणून 3 महिन्यापासून intnet वरुन लक्ष ठेऊन होतो...) नशीबाने दुस-या दिवशी दुपारचा शो $49.5 ला मागची तिकीटं ला मिळतात हे दिसलं, लगेच दोन तीकिटं घेतली. (बाटा सारखे हे रेट आॅड का ठेवतात 139 व 49.5 ते कळले नव्हतं पण tax....प्रत्येक states चा tax वेगळा आहे)

तिथून empire state building पहायला निघालो. well defined रस्ते असल्याने पत्ता शोधणे फारचं सोपे होते.
mobile वर GPS map वर  सहज कळतं होतं.34th street वर esb साठी निघालो...





रस्स्ता खूपचं happening होता.वातावरण bubbling उत्त्साहाने charged झाले होते.आम्ही चक्क न्युयाॅर्कमध्ये फिरतोय म्हणून खूपचं exited होतो .आजुबाजूला सगळेच tourst फिरत होते काही रस्त्यावरच खात होते मुलाबाळांबरोबर फिरत होते. road shows व तरुणाई ला उधाण आले होते. अर्धी चड्डी हा global dress code आहे का अशी शंका यावी इतकी सगळीच मंडळी अर्ध्या चड्डीत फिरत होती.सोय म्हणून अस्मादीकांनीही अर्धी कार्गो  परीधान केली होती! अॅडव्हांस डिग्री ला सुधारीत बाईमाणसं quarter चड्डी व त्याही पेक्षा सुधारलेल्या काहीजणी half-quarter चड्डी धारण करुन फिरत होत्या.

"सुधारणा = inversely proportionl कपडे "
असा काही formula असावा का आणि असल्ल्यास त्यात c square (k कपडे,c प्रकाशाचा वेग!) टाकून

सुधारणा = 1 / kc2
k          = 1 / सुधारणा x c square
मग अतिसुधारणा (>>सुधारणा) म्हणजे k ~= शून्य !

अतिसुधारणा म्हणजे nearlyविवस्त्र चअवस्था (?!) अशा theoritical conclusion ला आम्ही पोहचत असतांनाच
आम्ही टाईम्स स्क्वेअर जवळ आलो,समोर तिघीजणी दिसल्या....topless !! tops रंगवलेले होते ....कमरेला इतरांचा मान राखण्यासाठी एव्हढीशी झालर लावली होती , तिचा चेहरा अतिशय आनंद झाला असल्यासारखा फूलला होता .
दुस-या दोघींच्या छातीवर artist रंगवत होता.

आमच्या formula चा proof इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते.आम्ही धन्य  जाहलो !!
(Times square ला चाललेल्या अनेक road shows पैकी हा हि एक प्रकार, असे राहून मग डाॅलर घेऊन फोटो काढू देणे हा एक बिन(धास)कष्टाचा व्यवसाय (?))

जो जे वांछील,
तो ते लाहो,प्राणीजात !


या ओळींच्या अर्थाचा नवीन साक्षात्कार झाला...!

तिथं रेगाळून चालणार नव्हते, 34th street ला Empire State building ला जायचे होते.आम्ही चालत सुटलो.
(भीषण चालणं झालं त्या दिवशी....16,000 steps हाॅटेल ला परतलो तेव्हा as per pedometer !)





Empire State Building 86th floor Observatory वरुन काढलेले फोटोज....





34th street वरुन चालत 56th street वर आलो, solid भूक लागली होती,
 बनारस रेस्टाॅॅरेंंट दिसले,गेलो,बसलो, समोर एका painting ने लक्ष वेधून घेतले होते.

मॅॅनेजर आला, मी विचारले beer कोणती आहे, पता चला, किंग्ज
 फिशर पासून ब-याच काही. म्हटले हे बरे आहे, भारतापासून दूर आल्यावर होमसीक वाटले तर किंग्ज
बरी आहे.मी मेक्सीकन ट्राय केली.
       मॅॅनेजर म्हणाला, आधी पाहिले नाही तुम्हाला.
मी, अरे बाबा tourist आहोत... अच्छा, वो पेंंटिंंग के बारे मे बताओ, बहोत interesting है.
त्या painting मध्ये fusion करुन एका बाजूला...बनारस चे घाट, मंंदिरे,गंंगानदी, अर्ध्य वाहणारे साधुमहाराज आणि skyline ला Newyork च्या tall buildings अशी fantacy दाखवली होती !!


मॅॅनेजरने जोक मारला,
"पता है पंंडीतजी(साधूमहाराज) क्या मांंग रहे है ? वो कह रहे है, किसी तरहा अमेरिका का विजा दिलवा दो,भगवान"



-----------------***------------------***-------------






No comments:

Post a Comment