Thursday, 20 October 2016

Age is only a number !!

20-Oct-2021                                              60th Birthday

Age is only a number !! हे म्हणण्यासाठी यावर्षी काय केलं....60 km 🚲 cycling

( मी हिम्मत केली स्वत:ला explore करण्यासाठी, body allowed me to complete it...) 


         रोमेल ने त्याची रु. 4 लाख ची सायकल दिली.

(12 hours duty करुन संध्याकाळी 6:30 pm ला घरी आलो, लगेच 7:00 pm ला निघालो,एकटाच solo 🚲 ride ला,सलग 4 तास 10 मी नंतर मी माझी history लिहीली !!)

याआधी तयारी :

Filipino मित्र Romel ला सांगितलं, माझी      bucket-list wish आहे की 60 km cycle   चालवून 60th Birthday चे स्वागत करावे.

तो उत्साहाने मदतीस तयार झाला. Trial run आम्ही दोन cycles वर 30 km ride केली.

एक दिवस rest घेऊन मग दुसरा Trial ride run 42 km केला.Thanks to Romel, without his support this wd Not hv realized 🙏🏻🙏🏻🙏🏻



हजारो मील लंबे रास्ते,                                       तुझको पुकारे,

तेरा fitness check करने वास्ते,                      तुझको पुकारे,

यहा पूरा खेल अभी जिवन का,                            तुने कहा है खेला ?!

चल अकेला, चल अकेला,चल अकेला,                      तेरा मेला पीछे छूटा,राही चल अकेला...

-----------------------****--------------------------

मागच्या वर्षी,

आज 59 व्या वर्षात पदार्पण केले.(20-Oct-2020)

This is 10th year of this 'custum'....

i do some stunt on birthdays.

एका उपक्रमाची आज दशकपूर्ती ( completion of a decade) झाली.

कोणता उपक्रम?
वाढदिवशी stunt करणे.

why? का कशासाठी.
स्वत:लाच प्रेरणा देण्यासाठी !!

50 th Bithday पासून हा उद्योग सूरु केलाय,
B'day...No cake....मग? धावायचं!

50 th B'day--- 5 km jog
51 th B'day--- 6 km jog
52nd B'day -- 8 km jog
53rd B'day -- 10 km jog
54th B'day -- 12 km jog
(all on tread mill)
55 th B'day--- 20 km walk
56nd B'day -- 10 km jog on tread mill
57rd B'day -- 20 km walk
58 th B'day -- 10 km jog on tread mill

मग या वर्षी काय ?
how about cycling for a change,
मित्राकडून cycle उसनी घेतली.
59 th B'day -- 13 km cycling-done

( This is 10th year of this 'custum'....
i do some stunt on birthday
(no time due to nightshift so preponed stunt 5 days early)

so cycled to a unknown destination
purple island. 




*8.6* miles (13.76 km)



watch my youtube report

👇🏻

https://youtu.be/2df6bfpUTp4


---------------------------------------------------------------
interesting to monitor walking / jogging records
may be in 2 years.





-------------------------------------------------------------
This is year, 20-Oct-2019



I just celebrated  58 th Birthday with 10 km jogging.
-----------------------------------------------------------------

I happened to visit same botonical garden in 
Mauritius twice.....same tree...

.
             July2015                          May 2019

(This is not for boasting....just to see the fact )

-----------------------------------------------------------------------

20-Oct-2018 : 20 kms walk done : same rout as 2016.


--------------------------------------------------------------


20-Oct-2017 : 10 kms on trademill

.
--------------------------------------------------------------------------
20 Oct 2016
या वाढदिवशी काय करावं, विचार करत होतो.

या वर्षी काय ?

म्हटलं चला,20 km चालायचं.
जमेल का ?
कुठे जायचं?
सेफ्टी बद्दल काय?
किति वेळ लागेल, 5 km / h च्या हिशोबाने 4 तास लागतील.

सकाळी 5 am चा गजर लावला.
5:20 ला घराबाहेर पडलो.
नळस्टाॅप,
income tax लेन,
सेनापती बापट रोड,
symbiosis,
चतु:शुंगी,
विद्यापीठ,
औंधगाव,
9 km झाले
It was okay. Not much difficult.
परत फिरलो.
आलो तोच रूट ठेवला,
18 km झाले, DP रोड वरुन चक्कर मारुन 20 km पूर्ण केले.



Birthday walking target 20 km completed.




काय शिकलो?
आपण काही कामांना थेट भिडायचं असतं !
काय /कसं /कुठं मध्ये जेव्हढी उर्जा वाया जाते, त्यापेक्षा कमी श्रमात ठरवलेले काम पूर्ण होते.
(कॅलरीज् चा विचार केला तर 65 x 20 =1300 cals burn झाल्या)
वर्षभर सराव करुचं,
पुढच्या वाढदिवसाला काहीतरी तगडं challenge ठेवूया.


-------------****-------------*****-----------*****----

Thursday, 6 October 2016

पुन्हा काॅलेजला जातांना...



सानिकाने इंजीनिअरींग (Instruments/Electronics) ला अॅडमीशन घेतल्या पासून भेटलो  नव्हतोच,म्हटलं चला, सानिकाला भेटून येवू,काॅलेजही कसे आहे पाहू या.

सानिकाचा तास (lecture) होई पर्यंत कट्यावर बसलो,आम्ही इकडे तिकडे पहात होतो.
 उन लागू नये म्हणून एक मुलगी स्कार्फ बांधत होती,
बाईकवर बसलेला मुलगा,
"आता काय आणखी tan होणाराय,म्हणजे scope नाहीये "
मुलगी म्हणाली,
"बिनडोक"
दोघं हसले वआपल्या रस्त्याने निघून गेले.

मुलमुली ग्रुपने बोलतं उभे होते,हसतं होते टाळ्या देत होते,

मी म्हणालो,
"किति healthy मैत्री आहे ना मुलांमुलींमध्ये"

मिताली म्हणाली,
" exactly आता या क्षणी हेच मी सांगणार होते, तेव्हढ्यात तू बोललास"

ती अंतर्मुख झाली, आपण काय मिळवलं,काय हरवलं...
आमच्या वेळी मुलं अशी मोकळेपणी बोलतं नव्हते,नुसते बघत बसायचे, कधी comments pass करायचे,
आजचे मुलमुली मनमोकळी वाटताहेत,

पलीकडे ग्रुपमधे एका हूडधारीने मुलीच्या खांद्यावर हात ठेवला, मित्राच्या खांद्यावर ठेवतात तसा. हा विश्वास.

4:00-4:30 pm झाले, मोटरसायकल्स रोरावू लागल्या, triple seat मुलं bye bye म्हणत सुटली,
हे असं चालतं का?
तो वर एका बाईकवर triple seat मुली गेल्या.
दुसरीवर मुलगा व मुलगी गेल्या.

तिथं साधारणत: 600 bikes असतील का? मी हिसाब करत होतो, average Rs.50,000/-- किंमत समजली तर तिथं तीन कोटी रु.ची चल प्रोपर्टी आहे, बौद्धीक प्राॅपर्टी infinite रु. असावी कारण सळसळत्या रक्ताचे हे तरुणतरुणी पाहीजे त्या साच्यात घातले जाऊ शकतात,

कोई engineer का काम  करेगा,
business में कोई अपना नाम करेगा
पापा कहते है,बडा नाम करेगा/ करेगी !!

काही madams समोरून गेल्या.
फक्त प्रोफेश्वर पहायचे राहीले.
प्रो.विवेक यांची आठवण झाली.

सानिकाचा तास संपला, सानिका आली, फिरवून काॅलेज दाखवलं.
तिला सोई कशा आहेत,कँटीन कसे आहे वगैरे विचारलं.


प्रो.विवेक busy असतील का? जावे की न जावे. शेवटी म्हटलं जावूया.

सानिका ने आफिसमधे जावून निरोप दिला. त्यांना एवढा आनंद झाला.


त्यांची वाग् रसवंती सुरु झाली,इ
कालच मी हिला म्हटलो, सानिका दोन महिने भेटली नाही,तिची building / department  वेगळी आहे. आणि आज भेट झाली.
ते काय Rs.103 चे पॅक आहे ना, मोबाईल ही जुना झाला,घ्यायचाय,

आमच्या केमीस्ट्री dept च्या रामटेके सरांची transfer झाली, ते RCF ला गेले, सानिकाच्या बाबांना माहिती असेल.

त्या दिवशी बरका, त्या फंक्शनला स्टेजवर गातांना पोपट झाला, पण दुसरी संधी चालून आली, कँरीओकेवर गायची संधी मिळाली,
मग गायलो,
मी उत्सूकतेने कोणते गाणं?
"धुंदी फुलांना...."
वाह मी म्हणालो.
त्यांनी कलीग शी आमची आपुलकीने ओळख करुन दिली.

त्यांचा निरोप घेऊन आम्ही सानिकाच्या होस्टेलला गेलो.