Thursday, 6 October 2016

पुन्हा काॅलेजला जातांना...



सानिकाने इंजीनिअरींग (Instruments/Electronics) ला अॅडमीशन घेतल्या पासून भेटलो  नव्हतोच,म्हटलं चला, सानिकाला भेटून येवू,काॅलेजही कसे आहे पाहू या.

सानिकाचा तास (lecture) होई पर्यंत कट्यावर बसलो,आम्ही इकडे तिकडे पहात होतो.
 उन लागू नये म्हणून एक मुलगी स्कार्फ बांधत होती,
बाईकवर बसलेला मुलगा,
"आता काय आणखी tan होणाराय,म्हणजे scope नाहीये "
मुलगी म्हणाली,
"बिनडोक"
दोघं हसले वआपल्या रस्त्याने निघून गेले.

मुलमुली ग्रुपने बोलतं उभे होते,हसतं होते टाळ्या देत होते,

मी म्हणालो,
"किति healthy मैत्री आहे ना मुलांमुलींमध्ये"

मिताली म्हणाली,
" exactly आता या क्षणी हेच मी सांगणार होते, तेव्हढ्यात तू बोललास"

ती अंतर्मुख झाली, आपण काय मिळवलं,काय हरवलं...
आमच्या वेळी मुलं अशी मोकळेपणी बोलतं नव्हते,नुसते बघत बसायचे, कधी comments pass करायचे,
आजचे मुलमुली मनमोकळी वाटताहेत,

पलीकडे ग्रुपमधे एका हूडधारीने मुलीच्या खांद्यावर हात ठेवला, मित्राच्या खांद्यावर ठेवतात तसा. हा विश्वास.

4:00-4:30 pm झाले, मोटरसायकल्स रोरावू लागल्या, triple seat मुलं bye bye म्हणत सुटली,
हे असं चालतं का?
तो वर एका बाईकवर triple seat मुली गेल्या.
दुसरीवर मुलगा व मुलगी गेल्या.

तिथं साधारणत: 600 bikes असतील का? मी हिसाब करत होतो, average Rs.50,000/-- किंमत समजली तर तिथं तीन कोटी रु.ची चल प्रोपर्टी आहे, बौद्धीक प्राॅपर्टी infinite रु. असावी कारण सळसळत्या रक्ताचे हे तरुणतरुणी पाहीजे त्या साच्यात घातले जाऊ शकतात,

कोई engineer का काम  करेगा,
business में कोई अपना नाम करेगा
पापा कहते है,बडा नाम करेगा/ करेगी !!

काही madams समोरून गेल्या.
फक्त प्रोफेश्वर पहायचे राहीले.
प्रो.विवेक यांची आठवण झाली.

सानिकाचा तास संपला, सानिका आली, फिरवून काॅलेज दाखवलं.
तिला सोई कशा आहेत,कँटीन कसे आहे वगैरे विचारलं.


प्रो.विवेक busy असतील का? जावे की न जावे. शेवटी म्हटलं जावूया.

सानिका ने आफिसमधे जावून निरोप दिला. त्यांना एवढा आनंद झाला.


त्यांची वाग् रसवंती सुरु झाली,इ
कालच मी हिला म्हटलो, सानिका दोन महिने भेटली नाही,तिची building / department  वेगळी आहे. आणि आज भेट झाली.
ते काय Rs.103 चे पॅक आहे ना, मोबाईल ही जुना झाला,घ्यायचाय,

आमच्या केमीस्ट्री dept च्या रामटेके सरांची transfer झाली, ते RCF ला गेले, सानिकाच्या बाबांना माहिती असेल.

त्या दिवशी बरका, त्या फंक्शनला स्टेजवर गातांना पोपट झाला, पण दुसरी संधी चालून आली, कँरीओकेवर गायची संधी मिळाली,
मग गायलो,
मी उत्सूकतेने कोणते गाणं?
"धुंदी फुलांना...."
वाह मी म्हणालो.
त्यांनी कलीग शी आमची आपुलकीने ओळख करुन दिली.

त्यांचा निरोप घेऊन आम्ही सानिकाच्या होस्टेलला गेलो.

No comments:

Post a Comment