Wednesday, 5 April 2017

The importance of Perseverance गांंधर्व महाविद्यालय (पुणे) प्राचार्य मराठे व विद्यार्थी यांंचे अभिनंंदन

फूल ते संपले,गंध ना राहिला... (पाडगावकर)
सूर ते संपले, धूंद ना राहिला.....(अस्मादिक)


आज सकाळ वाचतांंना ह्या माहीतीने लक्ष वेधून घेतले.
गांंधर्व महाविद्यालयात प्राचार्य मराठे व विद्यार्थी 24 तास हारमोनियम वाजवणार.(एकूण 108 तास harmonium /संवादिनी वादन !)

मला ही निसंंशय मोठी गोष्ट वाटली, मी इतर कामंं सोडून तिथंं गेलो.
लोकांंच्या थंंड प्रतिसाद पाहून मला धक्का बसला.कुणालाच वेळ नव्हता का ?

सोसुनी वेदना गीत गातो कुणी
लेखुनी क्षुद्र त्या आणि जातो कुणी
मीहि जागेपणी खेळ हा पाहिला

(जर कोणी अॅक्टर येणार कळले असते तर मरणाची चेंंगराचेंंगरी झाली असती, तेव्हा कसा मिळतो वेळ? आश्चर्य म्हणजे कामाचा अभिनय /सोंग करणा-यांचं कौतुक व खरे काम करणा-यांकडे दुर्लक्ष...म्हणून मेरी काॅम पेक्षा तिची भूमिका करणारी जास्त कमावून जाते...थोडे विषयांतर झाले.)
कुणी विक्रमी कार्य करत असेल तर त्यांंना प्रोत्साहन द्यायला नको का??

रियाझ करण्याचंं महत्व वेगळंं सांंगायला नको.
1% inspiration आणि 99% perspiration म्हणतात,कलेच्या सादरीकरणात वेगळीच उंंची गाठायची असेल तर अफाट सराव करुन  विद्येवर अशी महारथ / हुकूमत मिळवावी लागते,तेव्हाच कलाकाराने बुद्धीने केलेला अमूर्त विचार वाद्यातून साकार प्रकट होतो !


मी पत्रकार होतो का ? नाही
जाणकार होतो का ? नाही

ह्या कला-साधनेला लागते शिस्त, एकाग्रता,चिकाटी,बैठक,स्नायूंंची क्षमता,विश्वास आणि कमालीची समर्पणभावना....
मी ह्याचा साक्षीदार होतो.
(मी 30 मिनीटे मोबाईल मधे रेकाॅर्ड केले,compress करुनही 150 mb होतंय ( here limit is 100 mb) असो edit करुन upload करीन.








मला यातून प्रेरणा मिळाली,मला पियानो वाजवता येत नाही पण मी chords असाच अमर्याद सराव करणार.
पुढच्या काही महीन्यानंंतर पियानोची माझी समझ वाढणार यात शंंका नाही.

No comments:

Post a Comment