Thursday, 26 April 2018

Reveiw मराठी नाटक : जुगाड...impressive




काल  25 एप्रील 2018 ला ज्योत्स्ना भोळे सभागृह,पुणे येथे हे नाटक पाहिले.


काय योगायोग आहे...

सकाळी पेपर मधे पोलीसांकडून छत्तीसगढ येथे 37 नक्सलवाद्यांचा खातमा ही बातमी वाचली आणि संध्याकाळी रिमोट नालमाची ह्या आदीवासी पाड्यावर घडणारं नाटक पाहीलं !

योगायोग
योग म्हणजे जोडणं
'य' चा ग्राम्य अपभ्रंश 'ज' होतो आणि योग होतो जोग.
जोग पासूनच होत असेल जुगाड,
अर्थ असावा ...जुळवणे..घडवून आणणे
engineering a plot वगैरे ?

(Jugaad : meaning on Quora: Hindi,Urdu, Punjabi word,innovative fix or a simple work-around, a solution that bends the rules,)

मेळघाट इथं भूकबळी अशी बातमी वाचली कि "काय स्वातंत्र मिळून इतकी वर्ष झाली तरी तिथं मदत पोचतं नाही,सरकार काय करतयं?" म्हणून दांभीक चरफडून आपण पेपरचं पान उलटतो, मनातून तो विषय झटकतो.
आणि IPL मधे काय झालंय बघतो.

(सरकार काय करणारं?
ती व्होटबँक आहे का बघणार..
क्वचीत कुणी डाॅ.आमटे परीवार,डाॅ.बंग परीवार व अन्य सन्माननीयअपवाद व्रतस्थपणे काम करतात)

before i forget,
मला या नाटकाच्या संगितकार कौशल इनामदार / सहकारी यांच कौतुक करुदे.

आदीवासी संगीत/ rhyth तालवाद्य जी वाजवलीत ती फारच मनोवेधक व आकर्षक आहेत.
इतकी की pls निर्मात्यांनी ती नेट वर उपलब्ध करावीच अशी विनंती आहे.
मी तर प्रेमातच पडलोय या rhyth devine कौशलच्या !!

कुठून त्यांनी ही वाद्य शोधली असतील, synthesizer वर काही african वाद्य असतात का? की त्यांनी स्वत: electronic device वर mixing करुन ही वाद्य तयार करुन मग हे rhyths वाजवलेत ?

या आदीवासी संगीतातून स्टोरी पुढे सरकते, its integral part of the play.
ग्रेट!

नेपथ्याला (शेखर नाईक) फूल मार्कस्
जंगल चा हुबेहूब आभास निर्माण केलाय, वाह !

कुठेतरी दूर नालमाची ही वस्ती आहे,
आणि अज्ञान, अशिक्षीतपणा,भगत,नालम्मादेवी ,त्यांच्या प्रथा,अड्याण्यांच प्रथा/ पापपुण्य या नावाने शोषण आहे,

प्रसाद म्हणून झिंग आणणारी,डोक्याचा वापर बंद करणारी मोहाची दारु आहे.

त्यांच्यातला एक शिकून वकिल झालेला (चिन्मय मांडलेकर) नालमाची चा नसलेला इतिहास लिहीण्यासाठी शहरी प्रोफेसर( हृषीकेश जोशी) ला फसवून वस्तीवर आणतो.

चिन्मय व हृषीकेश यांना समोरासमोर आणल्याबद्दल निर्माते व लेखक यांचे अभिनंदन .

चिन्मय व हृषीकेश हे दोघंहि  हुशार विचारी/लेखक आहेत/ दिग्दर्शक आहेत आहेत, त्यांना अभिनयाचं काम देऊन आधीच 50% यश निर्माते व लेखक यांनी निश्चीत केलय.

चिन्मय व हृषीकेश यांनी बेदम फटकेबाजी करत बाजी मारलीय हे शेवटी प्रेक्षकांनी वाजवलेल्या कडक टाळ्यांमधून कळतेच.

विशेष उल्लेखनीय म्हणून गुलाब (शुभांगी भुजबळ)चे नाव घ्यायलाच पाहिजे,
आणि इतर बारा जण सुध्दा perfect काम करताहेत.

विषय complicated आहे, विचारांच बुद्धीबळ आहे, analytical आहे.

दंगल मधला dialogue आठवला,
 "दाँव दिखाना एक है और लगाना एक है"

oh my god मधला दुसरा dialogue ही आठवला,
"बहोत दिनोंमे बाजार में नया भगवान नही आया"

म्हणजेच marketing
सोप्या भाषेत,'धंदा'.
वकील असून त्याच्याकडे marketing चे पुस्तक का सापडते याचा इथं खुलासा व्हावा.

नालमाची चा नसलेला इतिहास लिहीण्यासाठी आणलेला शहरी प्रोफेसर( हृषीकेश जोशी) नकार देतो, तुमचा ( म्हणजे समाजाचा ...जातीचा (?)) काही इतिहास नाही का तर म्हणे तुमच्यात कोणी मोठा माणूस (महामानव!) झालाच नाही.

वरुन भोळा,विनम्र व आतुन महाधूर्त वकील म्हणतो ,नसेल तर शोधा,नसेल तर जन्माला घाला आमचा महामानव !!

तो वकील असल्याने ,
अवत्या झोंब्या काकासाहेब हा आमचा ऐतिहासीक नेता होऊन गेला असल्याचे पुरावे ही देतो.

इथून पुढे त्या काल्पनिक महामानवाला पध्दतशीर grow करण्याचे जे मनसुबे कल्पनेने उभे करतो,ते अचाट संवाद ऐकतांना लेखकाच्या ( नितीन अग्नीहोत्री)कल्पनासामर्थ्याने आपण थक्क होतो,
प्रोफेसर त्यापुढे जात पार त्या महामानवाला संसदेत पोचवतो.
लेखकाने कल्पनेची खूपच उंची उडान घेतलीय हे मुळातच पाहणे आवश्यक आहे.

त्याच बरोबर हे आधी कुठेतरी पाहील्यासारखं वाटतयं का असं सूज्ञ प्रेक्षकांना वाटतं,लेखकाला काही इशारा करायचा आहे का असा ही प्रश्न पडतो.
पण हे एव्हढं abstract आहे की बात समजण्याची आहे, वर्णन करण्याची नाही, या अर्थाने 'अवर्णनीय' आहे.

तर असं नाटक पोचवायचं म्हणजे कठीण काम दिगदर्शक ने केलयं.

तर असं नाटकातील संवाद पेलायचे, पचवायचे अन मग पोचवायचे ,त्यातली तगमग दाखवायची हे सोपं काम नाही महाराज....

प्रोफेसर विलासराव ची आधीची हुशारी,तत्वाशी तडजोड मग एकदा खोटा स्थापन केल्यावर तो अमर होणार व येणा-या पिढ्या फक्त पुजारी होणार म्हणून तडफड व हे करणार नाही हे सर्व
हृषीकेश जोशी यांनी जबरदस्त सादर केलयं.

चिन्मय बाबत काय बोलावे, Tv वर अतिपरीचीत होवूनही अवज्ञा न होण्याचं त्यांच glamour आहे,एक magnetic व्यक्तिमत्व आहे, बालपणीच्या कष्टाने भावूक, शिक्षणाने वकील,मनाने मार्केटींग गुरु, लीडरशीप,दिखावू विनम्र,गावठी हुशारी या छटा ते सहजपणे दाखवतात, आदीवासी नाच करताही रुबाब दिसतो.

असा वकील,एका प्रोफेसर शी टक्कर घेऊन बौध्दीक आव्हान ऊभे करतो.

मग कोण जिंकते,
जाननेके लिये पाहिलेच पाहीजे,

जुगाड

काही सूचना ?
yes,
1) एका प्रसंगात प्रोफेसर सिगारेट स्मोक करतात,हे स्टेजवर नको.

2) दुसरे प्रोफेसर सल्ला देतात कि हा जो so called नेता आहे तो लुटारु व अत्याचारी आहे वगैरे,
पण please note कि हे रेकाॅर्ड ब्रिटीशांचे आहे 1935 सालचे,आपले क्रांतीकारकही त्यांच्या दृष्टीने लुटारु च होते !
मग हे कितपत स्विकारार्य आहे?

Sunday, 8 April 2018

बेभाव शेतकरी


बेभाव शेतकरी

सांगा विठूराया,
कष्ट जाती वाया,
आलो जीवनाया
मेटाकूटी

आधी पाण्याची बोंब
कसे उगवावे कोंब
महागाईचा आगडोंब
कुठे जावे

डोक्यावरी ह्या कर्ज
दवा काय या मर्ज
करावे का अन्नवर्ज्य
मंत्रालयी

शेतकरी बेभाव
चोर झाले साव
विठू रे घे धाव
वाचवाया