Sunday, 8 April 2018

बेभाव शेतकरी


बेभाव शेतकरी

सांगा विठूराया,
कष्ट जाती वाया,
आलो जीवनाया
मेटाकूटी

आधी पाण्याची बोंब
कसे उगवावे कोंब
महागाईचा आगडोंब
कुठे जावे

डोक्यावरी ह्या कर्ज
दवा काय या मर्ज
करावे का अन्नवर्ज्य
मंत्रालयी

शेतकरी बेभाव
चोर झाले साव
विठू रे घे धाव
वाचवाया

No comments:

Post a Comment