Thanks to Lokmat dated 09- March-2019.
Thanks to Sahebrav Narsale
Busineswoman from small village, who repayment crore rupees loans. How they can be possible?
साहेबराव नरसाळे
ज्या कधी तहसीलदार कार्यालयात गेल्या नाहीत, ज्यांनी बॅँक पाहिली नाही, शिक्षण नाही, घरात आर्थिक चणचण त्या आयाबायांनी कर्ज काढून व्यवसाय उभारले आणि कोट्यवधींचं कर्ज फेडलं त्या एका अनोख्या गावची गोष्ट!
नवरा ट्रक ड्रायव्हऱ त्यांना आजारानं ग्रासलं उत्पन्न थांबलं नव-याच्या उपचारासाठी सावकाराकडून 5 ते 10 रुपये शेकड्याने कर्ज उचललं घरात खायला अन्न नाही़ त्यामुळे लहानगी मुलगी पाठीशी बांधून बाहेरगावी रोजंदारीवर कामाला जायची़ नव-यालाही उपचारांसाठी घेऊन पळायची. कधी हा दवाखाना, तर कधी तो दवाखाना़ कुणाचा आधार नव्हता़ तेव्हा बचत गटानं तारलं..
डोळ्यातलं पाणी अडवत शीतल बर्डे आपल्या आयुष्याची कहाणी सांगत असते. म्हणते, बचत गटातल्या महिलांनी मला बँकेतून कर्ज मिळवून दिलं त्यातून सावकाराचं कर्ज फेडलं गायी घेतल्या़ रोज दूध डेअरीला जाऊ लागलं लोकांची जमीन अर्धलीनं कसायला घेतली़ आता कसं सुखानं चाललंय सारं.’
अर्थात ही गोष्ट तिची एकटीची नाही. सीमा मोरेही अशीच एक कहाणी सांगतात. चुलीला बांधलेल आयुष्य. कधी बॅँक पाहिलेली नव्हती. पण आता त्यांनी बचत गट सुरू केला आणि आज त्या दूध डेअरीच्या मालकीण झाल्या. बँकेकडून कर्ज घेतलं. त्यातून पिठाची गिरणी घेतली़ व्यवसाय वाढवला़ गाय, शेळ्या घेतल्या़ बोअर घेतला़ दूध डेअरी सुरू केली़ 300 लिटरपेक्षा जास्त दूध डेअरीवर येऊ लागलं. पशुखाद्य विक्री केंद्र सुरू केलं. शेळ्यांचं लसीकरण सुरू केलं.
मुक्ताबाई रामदास बिडगऱ वयाची पासष्टी ओलांडलेल्या आजीबाई़ तरातरा झाडावर चढायचं, शेळ्यांसाठी पाला काढायचा, दिवसभर रानोमाळ शेळ्यांमागं पळायचं असं त्यांचं काम होतं; पण आज या वयात त्या लाखोंची कमाई करताहेच.
या कहाण्या सांगणा-या महिला कुणी सेलिब्रिटी किंवा उद्योजिका नाहीत. साध्यासुध्या चारचौंघी या. त्यांनी जे काम उभं केलं ते आश्चर्यात पाडणारं आहे.
अहमदनगरपासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर चिंचोली काळदात नावाचं एक गाव आहे. त्या गावातील या आयाबाया. इथं दुष्काळानं अनेकांच्या आयुष्याचा फुफाटा केला. पण त्या फुफाट्यातून उभं राहण्याची किमया या बायकांनी करून दाखवली आहे. त्यासाठी त्यांच्या मदतीला होते बचत गट. या गावात बचत गटांच्या उत्तम कार्यपद्धतीचं एक आदर्श मोड्युल उभं राहिलं आहे.
हे सारं काय आहे समजून घ्यायचं म्हणून चिंचोली काळदात गावात पोहोचलो. सोबत महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी संजय गायकवाड होते.
महिला आर्थिक विकास महामंडळानं नगर जिल्ह्यात 33 हजार 500पेक्षा अधिक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबनाची वाट दाखवली आहे. वेगवेगळ्या बँकांकडून विविध टप्प्यांवर 70 कोटी 26 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज महिलांना देण्यात आलं आहे. त्यातून नगर जिल्ह्यात 16 हजारांपेक्षा अधिक महिलांनी आपले विविध व्यवसाय सुरू केले आहेत़ चिंचोली काळदात गाव त्यातलंच एक. मात्र या गावातल्या बचत गटांचं मॉडेल त्यातही आदर्श ठरलं. नगर जिल्ह्यात महिलांनी हे 70 कोटींहून अधिक रूपयांचं कर्ज फेडलंच, तसं चिंचोली गावच्या महिलांनीही. या गावातील महिला कर्ज घेतात़ वेगवेगळे व्यवसाय करतात़ कोणी शेळीपालन तर कोणी गायी घेऊन दुग्ध व्यवसाय करतंय़ कोणी शिलाई मशीनवर गोधडी शिवतंय तर कोणी तरुणी हस्तकलेच्या वस्तू तयार करतं. रेडीमेड गारमेंट, कांदा गोणी तयार करणं, मसाला बनवणं, कापडी पिशव्या तयार करणं, सिमेंट विटा, मातीचे माठ, रांजण, मडकी तयार करणं, खाद्यपदार्थ तयार करणं असे लघुउद्योगही अनेक महिलांनी सुरू केले आहेत़
वंदना उबाळे, संध्या काळदाते, सिंधू आखाडे, ताई जाधव ,सविता उबाळे या आणि बचत गटात सक्रिय असलेल्या अनेक महिलांना गावच्या अंगणवाडीत भेटलो. तिथं उत्तम व्यवसाय करणार्या अनेकजणी भेटल्या. मोठमोठय़ा उद्योजकांनी बँकांचे हजारो कोटी रुपये बुडविल्याची उदाहरणं ताजी असतात; पण बचत गटातील एकाही महिलेनं बँकेचा एक रुपयाही थकवला नाही़ महिलांना हे कसं जमलं, या प्रश्नावर अहिल्याबाई साधन केंद्राच्या अध्यक्ष आशा घोडके सहज सांगतात, ‘चुलीचं मॅनेजमेंट जेवढं जटिल असतं ना, त्यापेक्षा कितीतरी पटीत सोप्पं असतंय बँकांचं कर्ज फेडणं! ते सोपं कसं झालं, याच्या कहाण्या उलगडत जातात, तेव्हा कळतं आयाबायांचं पक्कं व्यवहारज्ञान.

------------------------------------------------------------------
घर दोघांचं : 1 हजार महिला कारभारणी
या गावात 1 हजार घरं पती-पत्नीच्या दोघांच्या नावावर आहेत़ ‘घर दोघांचं’ या अभियानातून महिलांची नावं सातबारा उतार्यावर आली असून, घरांवर महिलांच्या नावाची प्लेट चमकू लागली आह़े
(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्ती उपसंपादक आह़ेत.)
sahebraonarasale@gmail.com
No comments:
Post a Comment