काही दिवसांपूर्वी पुण्यात (दुस-यांदा) *रानगवा* (gaur) दिसला होता,
त्यावर हि कविता
पुन्हा झाला गवगवा,
पुन्हा आला रानगवा
पुन्हा जनता कावली
पुन्हा मिडीया धावली
पुन्हा तसवीर दावली
टिव्हिवर
गवा मनुष्यहद्दीत आला
कि मनुष्यअतिक्रमणवाला
एकच गौंधळ झाला
खरे काय
विकासाचा धरबंद
की आधीच्या चा हा भाईबंद
कुणाचा याशी संबंध
कोण जाणे
जंगलचे हे गवे
घेऊन येतील थवे
प्रश्नचिन्ह हे नवे
उपस्थीत
अभयारण्याच्या आता
भूतदयेच्या बाता
हे पशुपतीनाथा
कर काही...
--शीघ्रकवी राजेश
No comments:
Post a Comment