अनंत हस्ते देता करुणाकराने
किती घेशील दो कराने..
15 जानेवारी पासून मी किचनमधे एका बटाट्याकडे पहात होतो, कितीवेळा तो भाजीत, खिचडीत टाकण्यासाठी हात पुढे पण झाला,
पण तो मित्राने आणला होता म्हणून मी सोडून देत होतो.
मित्र ही तो बटाटा त्याच्या रेसीपीत वापरत नव्हता....
तो बटाटा sprouting सुरु झाला.
wastage of resources असा विचार येत होता, असेच काही दिवस येताजाता पहात होतो.
1 Feb 2021 मी काही gardeners काम करतांना पाहीले,
enough मी निर्णय घेतला,
धावत kitchen मधे गेलो,
तो sprouted बटाटा शांतपणे बसला होता,
तो घेऊन gardeners ना म्हणालो,
हा पेरा..
आणि हो आपल्याला प्रत्येक कोंबाला संधी द्यायची आहे,
म्हणून कापा, सूरीने 4-5 तुकडे करा,
आणि पेरा. 01-Feb-2021
काल बघीतलं ,मातीत बटाटा दिसला,मी माती सारुन लपवला.
आज gardener म्हणाला
"बटाटा दिसतोय,मी माती सारुन लपवला."
आयुष्पातला पहीला बटाटा plantation आणि एवढा बहार ...वाह !
"hey hey...enough
time to harvest...चलो"
दम-आलू रेसीपी पाहीली पाहीजे !!
निसर्गापुढे नतमस्तक झालो,
विचार आला..
अनंत हस्ते देता करुणाकराने
किती घेशील दो कराने..