Friday, 25 June 2021

Big Congratulations dear pilot Sanjana

तव आकांक्षापुढे गगन ठेंगणे...

(Note: photos from Internet (with Thanks) Not her but look alike for illustrations purpose only)



"पप्पा sssss....संजना ला flying licence मिळालं बर का, i mean commercial pilot's licence (aeroplane) , संजनाने तुम्हाला ते दाखवयला सांगीतलं हं "


" wow...convey my Big CONGRATULATIONS to her...

तुला माहीत नाही, मला किती आनंद झाला ते"


"माहीतेय, मलाच नाही तर संजनाला पण माहीती आहे म्हणूनच तिने ते तुम्हाला दाखवायला सांगितलयं...."


आनंद बक्षींच्या lines मधे मी म्हणेन,


पुर्वाई बन में चले,

पंछी चमन में उड़े

राम करे कभी हो के बडी

तू बनके बादल गगन में उड़े

जो भी तुझे देखे वो ये कहे

किस माँ (/पापा) की ऐसी दुलारी है तू

चंदा है तू मेरा सूरज है तू

ओ मेरी आँखों का तारा है तू



चक्क डोळ्यांसमोर ऋतु कुस बदलून घेतो

पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो...

गारवा

वाऱ्यावर भिर-भिर-भिर पारवा, नवा नवा

प्रिये, नभात ही

चांदवा नवा नवा...


चक्क माझ्या डोळ्यासमोर एक मुलगी पायलट झाली, हा आनंद अवर्णनिय आहे.

संजनाचा एक शुभचिंतक म्हणून मी अनेक वर्षे

मूकपणे observe करतोय,

( हे तिला माहिती आहे हे मला माहीत नव्हते)



मी बाल्कनीत बसलोय माझ्या झाडांकडे बघतोय, ते सुरवंट आता कोषात गेलयं,

इतक्यात कोष हलतांना दिसला,

महत्प्रयासाने त्यातून फूलपाखरु बाहेर पडलं,

perfect sunny day, मंद हवा,

फूलपाखराने पंख हलवले,

आणि take off घेतला,

smile दिल्याचा भास झाला,

पंख हलवून hi bye केले.

मी निरखून पाहीले फूलपाखराच्या डोक्यावर छोटासा crown दिसला, princess?

princess sanjana ?

हो तिच.

wow क्या बात है !!

----------------------------------------------------

flash-back....may be year 2008 or 2009,

साधारण शाळेत 7th or 8th std ला असतांना रसिका कुठलसं exhibition पाहून आली होती,

रसिका म्हणाली,

" संजनाचं aim ठरलयं,

ती पायलट होणार....

होणार म्हणजे होणारचं "

मी पहात होतो,

लहानपणी आधी मी postman होणार होतो,

मग bus conductor,

मग bus driver

मग पोलीस constable...

यापैकी काहीच झालो नाही,

इथं ही पोरगी सरळ पायलट म्हणत होती,

ही गोष्ट माझ्या पक्की लक्षात राहीली,

तिचं स्वप्न नकळतं माझं स्वप्न झालं !!


अधूनमधून विचारायचो,

" रसिका ...संजनाचं काय चाललयं"

" engineering करतेय"

" yeah right ..an engineer knows turbine in n out..it will help"

काही वर्षांनी,

" रसिका  तुझी मैत्रीण...ती...काय नाव! संजना?

हं संजना...काय चाललयं तिचं?"


"पप्पा तीचं engineering संपलयं,

ती lecturer आहे त्या काॅलेजात..."


"अरे पायलट व्हायचं आहे ना, त्याचं काय?"


"होणारचं आहे ती पायलट"

रसिका सहजपणे म्हणाली.


" अग, सोपं आहे का ते,

किती पापड बेलावे लागतात,

expensive flying hours आणि India त limited flying clubs मग abroad जावं लागते, पाण्यासारखा पैसा वहावा लागतो,

नुसतं technical knowledge पुरेसं नसतं,

नुसतं romantic dreams असणं पुरेसं नसतं,

you need physical fitness , mental fitness and nerves of steel to keep calm and handle it cold-bloodedly,

ते easy नाहीये burning passion लागते....कळलं का?..."

ऐकायला रसिका नव्हती, ती केव्हाच बाहेर गेली होती, म्हणजे मी भिंतीशी बोलतं होतो ?!

-----------------------------------------------

मधेच कळलं,

संजना flying hours abroad ( Australia ki New Zealand?) मधून करतेय.

oh म्हणजे ती आपलं स्वप्न विसरली नव्हती.

------------------------------------------------------------

" पप्पा, मी माधूरी आंटी कडे painting साठी गेले होते, खूप छान paintings काढली"

"great great"

" संजना, होती का? तिने काय painting केले

i was expecting ...निळे आकाश आणि एक colorful glider flying  असे painting from sanjana !!

स्वप्नांच्या निखा-यांवर राख जमता कामा नये ....



--------------------------------------------------------------

Thank you parag and madhuri (best papa mom in the world...) for supporting sanjana while chasing her cherished dream.

And Thank you sanjana for working un-tiringly to make it happen.

A fairy tale....dream came True.


This is your assistant-captain , ...sanjana kelkar speaking,

Thank you choosing this airlines.

weather is warm n sunny,

we will fly to an altitude of 26,000 feet, we will reach our destination B'lore in 2 hr15 mins.

seat-back...relax and enjoy our hospitality.


dear parag and madhuri,

seat-back and relax

your dear princess sanjana already flew high in the sky, reached her dream- destination !!

we are so proud of her.

----------------------***---------------------

Tuesday, 8 June 2021

Pawarsahab meets Dilipkumar

दिलीपकुमार हिंदूजा हाॅस्पीटल मे आराम कर है

सायराबानो उनकी nursing कर रही है...

 TV पर दिलीपकुमार की film गोपी चल रही है,

background में गाना सुनाई दे रहा है,

"सुख के सब साथी,

दुख में ना कोई,

मेरे राम तेरा नाम एक साथी,

दूजा ना कोई ....." 


फोन की ring बजती है.

सायरा : " hello,

बहोत अच्छे, आने दो उन्हे...

यूसूफसाब, कोई आपसे मिलने आये है"


पवारसाहेब अंदर आते है, 

फूलोंका bouquet देना और हालचाल पूछने के बाद,


शहेनशहा दिलीप कुमार :

" फल....मै फल बेचता था,

ये acting का शौक कब लगा पता ही नही चला...."


पवारसाहेब

"हल....मै हल बेचता हूँ, वैसे acting हम भी कर लेते है"!


दिलीपकुमार:

" माफ किजीऐगा, मै कुछ समझा नही,

हल, वोह खेती वाले या, समस्या का हल वाले?"


पवारसाहेब

"दोनो..."


दिलीपकुमार:

"ये आप एक तीर मे दो शिकार कैसे कर लेते हो?"


पवारसाहेब :

" दो नही तीन....congress , SS और bjp !! "

"दिल ने हमे बहोत धोका दिया, आजकल दिमाग से काम लेता हूँ "


दिलीपकुमार:

" ओहो, ये तो मेरा 'दिल दिया दर्द लिया' film का dialogue..."


पवारसाहेब :

" ये हवेली जिसके छत के निचे तुम साँस लेते हो,

मैने मूहमांगी दाम दे कर खरीद ली है !! "


दिलीपकुमार:

ये भी  मेरा 'दिल दिया दर्द लिया' film का dialogue..."

सायरा :

" और युसूफ मिया, 

'उडे जब जब जूल्फे तेरी

पवारोंका दिल धडके '

बरसोंसे आपके fan रहें है पवारसाहब.

दिलीपकुमार:

" क्या बात है !! शुक्रिया"

दिलीपकुमार:

"आप तो पहेलीया बुझा रहे हो, हमारे पल्ले कुछ भी नही पड रहा है...."


पवारसाहेब :

"लोगोंके भी कहा कुछ पड रहा है??"


दिलीपकुमार:

" आपने acting कि बात की ....आप तो polititian है."


पवारसाहेब :

" नेता और अभिनेता में ज्यादा फरक नही होता ! हमारा बारीशवाला भाषण भूल गये??"


दिलीपकुमार:

"वोह acting थी ? बहोत जबरदस्त acting कर लेते हो आप, script किसकी थी?"


पवारसाहेब :

" वोह script भी हमारी थी,

वोह जगह भी हमारी थी,

और वोह बारीश भी हमारी थी.

हम तुम्हे मारेंगे ,

और जरुर मारेंगे

majority ना मिले

तो भी मारेंगे.... "


दिलीपकुमार:

" वाह,आप राजकुमार की छुट्टी कर देते,

हम आप के fan हो गये है."


पवारसाहेब :

हम भी तो आप के fan है इसीलिये मिलने आये है.


"बहोत शुक्रीया, मैने दुनिया देखी है, 98 साल बहोत होते है,अब ये बताईये अगले 98 दिन मे क्या करने जा रहे हो ?"


पवारसाहेब :

"कम्लाहॅबैडनक्सेततोसौप्रैद्वेवैक्सेतक्योनैक्रस्ती"


दिलीपकुमार:

अच्छाअच्छा, समझा समझा.

जय रामजी की.


पवारसाहेब :

राम राम.


क्या केह गये पवारसाहब जातेजाते हम कुछ भी नही समझे सायरा.

सायराबानो :

 केह गये,

कमला हॅरीस प्रेझ.बायडन के साथ काम कर सकती है तो सुप्रीया देवेंद्र के साथ क्यो नही करेगी,

मतलब फडनवीससाहब CM और मोहतरमा सुप्रीया पवार deputy CM !!

दिलीपकुमार:  आँ...

(काल्पनिक)

-------------****-----------------


Friday, 4 June 2021

आतातरी झाडे लावा , ऑक्सीजन ची किंमत कळली ना कोरोना काळात ??

 

झाडं लावण्यासाठी एक पॅशन लागते,

आणि दृढ निश्चय तो माझ्यात आहे,

2016 हाच दिवस हाच महीना...


मी रसिका व मिताली बरोबर शाॅपींगला गेलो,

पण मनात सिक्रेट प्लॅन होता, तळजाई टेकडीवर झाडं लावायचा.पाऊस वाढेल हा विचार नव्हता,

एकंदरीत सर्व अविचारच होता.


शाॅपींग झाल्यावर एका नर्सरीजवळ मी थांबलो, गाडी मितालीच्या हवाली केली,

"मी पटकन झाडं लावून येतो"


त्यादोघी अविश्वासाने माझ्याकडे पहात होत्या.

"व्हा पुढे येतो लगेच..."


त्या गाडी घेवून गेल्या.

पाऊस सूरुच होता,


मी नर्सरीतून 6 झाडं विकत घेतली,

घरातून लपवून आणलेलं खणण्याचं टूल होतच.


मी रिक्षा करुन तळजाई टेकडीवर गेलो,

संध्याकाळचे 5 वा होते.


मी हातात 12 किलो वजन घेवून टेकडी चढत होतो.मला थोडी काळजी वाटली, ब्लड प्रेशर वाढलं असेल का...

आता पाऊस वाढला,

वरुन वेगाने ओहळ वाहू लागले,

मला माझं साहस मूर्खपणाचं वाटू लागलं,

पण जायचं म्हणजे जायचच.

(त्यावेळी दिडकोटी झाडं लावण्याचा महाराष्टाचा ड्राईव्ह होता.मला त्या मधे माझं खारीचं योगदान द्यायचं होतं, दूस-या दिवशी कतार ला आणि महीन्याने US ला जाणार होतो,तेव्हा आजचं काही करावं असं वाटलं होतं...)

मी कसाबसा वर गेलो.

दूस-या ग्रूपने खड्डे खणून ठेवले होते,

पण ते पाण्याने भरले होते,

सर्वत्र जमीन मऊ झाली होती,

मी सहजपणे नवीन खड्डे केले आणि आणलेली 6 झाडं लावली, एक कदंब होतं,सर्व साधारणत:  3 फूट मोठी रोपं मी आणली होती.

झाडं लावणं हे एक टीम वर्क असावं असं मला फार वाटलं.काही असो.

झाडं जगायसाठी खूपचं अनूकूल परीस्थीती होती. 


स्पोर्ट शूज चिखलाने माखले होते.

मी निवांतपणे टेकडी उतरलो,


ग्रेसच्या ओळी आठवल्या,

"झाडाशी निजलो आपण,

झाडात पुन्हा मिसळाया,,,,"

एक रिक्षा थांबली,

मी रिक्षात बसून रिक्षावाल्याशी गप्पा मारत घरी आलो,

" तुम्ही झाडं लावायला गेला होतात,

तुम्ही कमीन्स मधे कामकरता का?"


नाही रे,का ?

"कमीन्स कंपनी स्टाफला on duty झाडं लावायला घेऊन जातात". रिक्षावाला म्हणाला.

वाह,चांगलं करतात ते, मी म्हणालो.


मी स्वत: ची पाठ थोपटली,

अतिशय प्रतिकूल परिस्थीती, एकटेपणा यातही माझ्या कामावरची श्रद्धा ढळली नाही,

माझ्या निश्चयाची परिक्षा मी पास झालो होतो.

‘व्हर्टीकल फार्मिंग’द्वारे वाईत हळद लागवड!

 copy n paste from loksatta dated 04-June-2021

Thanks to loksatta team 

Thanks to शशिकांत कोरडे, प्रगतशील शेतकरी, वाई ( Shashikant Korde, progressive farmer , wai)

Thanks to विश्वास पवार ( Vishwas Pawar)



‘व्हर्टीकल फार्मिंग’द्वारे वाईत हळद लागवड!


सांगली आणि वाई हे दोन्हीही प्रदेश हळद लागवडीसाठी आजवर प्रसिद्ध राहिलेले आह


हळद पीक म्हटले, की महाराष्ट्रातील कृष्णाकाठचा वाई आणि सांगलीचा परिसर डोळय़ांपुढे येतो. यातील वाई तालुक्यात नुकतीच इस्रायलच्या ‘व्हर्टीकल फार्मिंग’ पद्धतीद्वारे हळद लागवडीच्या प्रयोगास सुरुवात करण्यात आली आहे. याच प्रयोगाविषयी..


महाराष्ट्रातील कृष्णा काठचा वाई आणि सांगलीचा परिसर हळद लागवडीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. वाई तालुक्यात अनेक गावांत आजही पारंपरिक पद्धतीने हळदीची लागवड केली जाते. या प्रवासात आता वाई येथे नुकतीच इस्रायलच्या ‘व्हर्टीकल फार्मिंग’ पद्धतीद्वारे हळद लागवडीच्या प्रयोगास सुरुवात करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे हळद लागवडीचा हा पहिलाच प्रयोग आहे. यासाठी हिमाचल प्रदेश व उत्तराखंड येथील ‘लॉकेडॉनंग’ या औषधी गुणधर्म व निर्यातक्षम बेण्याचा वापर केला आहे.

हळद हे मसाले वर्गातील एक प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ टन इतकेआहे. जगातील हळदीच्या एकूण उत्पादनापैकी जवळजवळ ८० टक्के उत्पादन भारतामध्ये होते. परंतु त्यापैकी केवळ १५ ते २० टक्केच हळद निर्यात होते. देशांतर्गत उत्पादनाचा विचार केला तर आंध्रप्रदेश प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंड असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली आठ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२ हजार ५०० टन इतके होते. भौगोलिकदृष्टय़ा हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ  शकते. समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीपर्यंतच्या सर्व प्रदेशात हळद चांगली येऊ शकते. महाराष्ट्रात साधारणपणे सर्व भागात हळदीचे पीक चांगले येऊ शकते. ज्या भागात उसाचे क्षेत्र जास्त आहे किंवा ओलीताखालील क्षेत्र जास्त आहे त्या भागात हवेतील दमटपणा थोडा वाढतो आणि हा दमटपणा हळद पिकास अनुकूल असा असतो.


हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत करणे चांगले. ठिकठिकाणच्या स्थानिक प्राप्त परिस्थितीनुसार लागवडीचा कालावधी मागेपुढे होतो. यासाठी एकरी १००० किलो बेणे लागते. लागवड मातृकंदापासून करतात. या कंदापासून तयार केलेल्या ३० दिवस वयाच्या रोपापासूनही लागवड करतात. कन्याकंदही लागवडीसाठी वापरतात. हळदीच्या पिकानंतर कांदा, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, ऊ स यासारखी पिके घ्यावीत. टोमॅटो, वांगी, मिरची, तंबाखू, बटाटा या पिकानंतर हळद लागवड करू नये. कारण या पिकांवर जमिनीतून उद्भवणारे सर्व रोग पुढे हळद पिकावर येतात. आपल्याकडे हळद लागवडीच्या काही पारंपरिक पद्धती आहेत. यामध्ये सरी वरंबा पध्दत, रुंद वरंबा पध्दत, गादीवाफे किंवा बेड पद्धत वापरली जाते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास मोठा वाव आहे.


सांगली आणि वाई हे दोन्हीही प्रदेश हळद लागवडीसाठी आजवर प्रसिद्ध राहिलेले आहेत. यातील वाईमध्ये आता या हळद लागवडीचे नवनवे प्रयोग सुरू झाले आहेत. यातच सध्या येथील काही शेतक ऱ्यांनी इस्रायलच्या ‘व्हर्टीकल फार्मिंग’ पद्धतीद्वारे हळद लागवडीच्या प्रयोगास सुरुवात केली आहे. या प्रयोगाकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.


पाच गुंठे जागेत हळद लागवडीचा हा प्रकल्प उभारला आहे. यासाठी हिमाचल प्रदेशमधून हळदीचे बेणे आणले आहे. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मात्र याचे प्रमाण किती आहे, हे हळदीतील ‘कुरकूम’ नावाच्या घटकावर ठरते. ‘कुरकूम’ म्हणजे हळदीचा गंडा मोडल्यावर आत दिसणारा लालसर पिवळसर गोलाकार भाग होय. आपल्याकडच्या हळदीमध्ये हे प्रमाण अडीच ते तीन टक्के असते तर हिमाचल प्रदेश व उत्तराखंड येथील हळदीमध्ये हे प्रमाण साडेपाच ते अकरा टक्के एवढे आहे.


या नव्या लागवडीसाठी पाच गुंठे क्षेत्रात ‘पॉलिहाऊस’ उभारले आहे. या हरितगृहाच्या आत साठ फूट लांब आणि दोन फूट उंचीचे सहा कप्प्यांचे एकेक थर उभारले आहे. या दोन थरांमध्ये तीन मीटर अंतर ठेवून असे नऊ  थर उभे केले आहेत. दोन फूट उंचीच्या कप्प्यामध्ये दीड फूट माती भरलेले आहे. या मातीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केलेला आहे. या प्रकल्पातील लागवडीसाठी साडेपाच क्विं टल बेणे वापरले आहे.


ठाण्यातील एस अ‍ॅग्री अँड अ‍ॅक्वा लिमिटेड कंपनीबरोबर परिसरातील शशिकांत कोरडे, दीपक कोरडे, विजय जमदाडे, बाळासाहेब सपकाळ आणि अमोल कोरडे या पाच शेतकऱ्यांनी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये जमीन, पाणी, वीज, रस्ता शेतकऱ्याने पुरवायचे आहे. तर ‘ग्रीन हाऊस’ अंतर्गत मातीपासून सगळी सामुग्री या कंपनीने पुरवली आहे. यामध्ये माती, रचना, बी बियाणे, सेंद्रिय खते, मजूर हे कंपनी पुरवते. यासाठी शेतकऱ्यांनी कंपनीबरोबर सहा वर्षांचा करार केला आहे. यातून उत्पादित होणारे सर्व उत्पादन कंपनी घेणार असून याद्वारे दरवर्षी पन्नास टक्के परतावा कंपनी शेतकऱ्यांना देणार आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर असून पुढील वर्षी अशापद्धतीचे आणखी बारा प्रकल्प या परिसरात उभारले जाणार आहेत. त्याची तयारी आत्तापासून सुरु करण्यात आल्याचे शशिकांत कोरडे यांनी सांगितले.


हिमाचल प्रदेशातून आणलेल्या ‘लॉकेडॉनंग’ या हळद बेण्याचा औषधांसाठी म्हणून अधिक वापर होतो. या प्रकल्पातून उत्पादित होणारी सर्व हळद निर्यात केली जाणार आहे. या हळदीला परदेशात मोठी मागणी आहे. हळदीत असणाऱ्या ‘कुरकूम’च्या प्रमाणावर तिचा भाव ठरला जातो. या बेण्यात लालसर पिवळसर ‘कुरकूम’चे प्रमाण पाच ते सहा टक्के आहे. या हळदीत औषधी गुणधर्म जास्त आहेत. या हळदीला अमेरिका आणि युरोप खंडातील देशांमध्ये मोठी मागणी आहे. या हळदीपासून तयार केलेली पावडर ‘कॅप्सूल’ स्वरूपात खाण्यासाठी आणि सुगंधी तेल,आयुर्वेदिक औषधे, कीटक नाशकात वापरली जाते.


हळदीच्या दरामध्ये सतत होणारे चढउतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठय़ा प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पद्धतीने काढणी करणे इत्यादी बाबींचा विचार करून पारंपरिक हळद लागवडीचा फेरविचार करण्याची वेळ आल्याचे या शतक ऱ्यांचे म्हणणे आहे. जास्तीत जास्त आणि दर्जेदार उत्पादन काढण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्वाचा विचार करत या पिकाबाबत जगभर जे नवे संशोधन, पीक पद्धती चालू आहे, त्याचाच अवलंब वाईतील या शेतक ऱ्यांनी आपल्या या नव्या प्रयोगात केला आहे.


आपल्याकडे नियमित लागवड केली जाणारी हळद ही खाण्यासाठी वा मसाल्यांमध्ये वापरली जाते. त्याच अनुषंगाने आपण या पिकाची आजवर लागवड करत आलो आहोत. मात्र परदेशामध्ये हळदीचा औषधांसाठी मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. मोठमोठय़ा औषधी कंपन्या हळदीवर अनेक प्रयोग करत आहेत. त्यांच्या मागणीप्रमाणे आपल्याकडच्या हळदीच्या वाण, लागवड, पीक पद्धतीत प्रयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठीच या नव्या प्रकारच्या बेण्याद्वारे आणि नव्या पद्धतीने हळदीची लागवड केली आहे.


 शशिकांत कोरडे, प्रगतशील शेतकरी, वाई