झाडं लावण्यासाठी एक पॅशन लागते,
आणि दृढ निश्चय तो माझ्यात आहे,
2016 हाच दिवस हाच महीना...
मी रसिका व मिताली बरोबर शाॅपींगला गेलो,
पण मनात सिक्रेट प्लॅन होता, तळजाई टेकडीवर झाडं लावायचा.पाऊस वाढेल हा विचार नव्हता,
एकंदरीत सर्व अविचारच होता.
शाॅपींग झाल्यावर एका नर्सरीजवळ मी थांबलो, गाडी मितालीच्या हवाली केली,
"मी पटकन झाडं लावून येतो"
त्यादोघी अविश्वासाने माझ्याकडे पहात होत्या.
"व्हा पुढे येतो लगेच..."
त्या गाडी घेवून गेल्या.
पाऊस सूरुच होता,
मी नर्सरीतून 6 झाडं विकत घेतली,
घरातून लपवून आणलेलं खणण्याचं टूल होतच.
मी रिक्षा करुन तळजाई टेकडीवर गेलो,
संध्याकाळचे 5 वा होते.
मी हातात 12 किलो वजन घेवून टेकडी चढत होतो.मला थोडी काळजी वाटली, ब्लड प्रेशर वाढलं असेल का...
आता पाऊस वाढला,
वरुन वेगाने ओहळ वाहू लागले,
मला माझं साहस मूर्खपणाचं वाटू लागलं,
पण जायचं म्हणजे जायचच.
(त्यावेळी दिडकोटी झाडं लावण्याचा महाराष्टाचा ड्राईव्ह होता.मला त्या मधे माझं खारीचं योगदान द्यायचं होतं, दूस-या दिवशी कतार ला आणि महीन्याने US ला जाणार होतो,तेव्हा आजचं काही करावं असं वाटलं होतं...)
मी कसाबसा वर गेलो.
दूस-या ग्रूपने खड्डे खणून ठेवले होते,
पण ते पाण्याने भरले होते,
सर्वत्र जमीन मऊ झाली होती,
मी सहजपणे नवीन खड्डे केले आणि आणलेली 6 झाडं लावली, एक कदंब होतं,सर्व साधारणत: 3 फूट मोठी रोपं मी आणली होती.
झाडं लावणं हे एक टीम वर्क असावं असं मला फार वाटलं.काही असो.
झाडं जगायसाठी खूपचं अनूकूल परीस्थीती होती.
स्पोर्ट शूज चिखलाने माखले होते.
मी निवांतपणे टेकडी उतरलो,
ग्रेसच्या ओळी आठवल्या,
"झाडाशी निजलो आपण,
झाडात पुन्हा मिसळाया,,,,"
एक रिक्षा थांबली,
मी रिक्षात बसून रिक्षावाल्याशी गप्पा मारत घरी आलो,
" तुम्ही झाडं लावायला गेला होतात,
तुम्ही कमीन्स मधे कामकरता का?"
नाही रे,का ?
"कमीन्स कंपनी स्टाफला on duty झाडं लावायला घेऊन जातात". रिक्षावाला म्हणाला.
वाह,चांगलं करतात ते, मी म्हणालो.
मी स्वत: ची पाठ थोपटली,
अतिशय प्रतिकूल परिस्थीती, एकटेपणा यातही माझ्या कामावरची श्रद्धा ढळली नाही,
माझ्या निश्चयाची परिक्षा मी पास झालो होतो.
Wow. . . Very much inspiring n fortunately now monsoon is nearing too. . . It's going to be a great idea.
ReplyDeleteThank you vineet 💞
ReplyDeleteएखादे झाडे लावा शिबीर / workshop असेल तर नक्की भाग घ्या.