sketches and painting from internet with Thanks
whatapp वर ही कविता पावली, हे गावाकडील शब्द विस्तृती च्या अंधारात जात आहेत हे पाहून खूप वाईट वाटलं...काय करणार! कालाय तस्मे नम:
कवीचं नाव नव्हतं...अज्ञात कवी ला प्रणाम
copy and paste
मोट गेली, नाडा गेला,
गेला सोंदुर कणा
सहा बैल नांगर आता,
दिसेल का हो पुन्हा
हेल गेला, कासरा गेला,
गेली शर्यत बैल गाडीची.
मोगरी गेली, हातणी गेली,
गेली मळणी धान्याची.
वावडी गेली,उपननी गेली,
गेली धार धान्याची.
भुसारा गेला,कलवड गेला,
गेली इर्जिक नांगराची
वाडगं गेलं,खळं गेलं,
गेली शान झोपाट्याची.
सावड गेली,बलुतं गेलं,
गेली राखुळी गुरांची.
हौद गेला, सारन गेली,
गेली बारव जुनी
वढवान गेलं, रहाट गेलं
शेंदु कसं पाणी
मेड गेली, कुड गेला
गेला वसा आढं
कुळव गेला, डुब्बं गेल
फराड गेलं पुढं
खुरवत गेला, खळं गेलं
चंद्राचं ते तळं गेलं
हरनाची गाडी गेली
मामाची पण माडी गेली
हेल गेला, गंजं गेली
करडईचा फड गेला
अंगणात लावलेला भला मोठा
वड गेला
बोरं गेली, जांभळं गेली
गेला रानमेवा
खंबीर होती जूनी पिढी
गावाकडे तेव्हा
आता कुठं शोधायच्या
गावाकडच्या वाटा
प्रगतीच्या नावाखाली
मोजू कसा तोटा
सांग मित्रा, कधी आता
गावाकडे जायचं
ताटलीत दुध भाकर
चुरून मुरून खायचं
यातले कितीतरी शब्द आपल्याला भविष्यात *आठवणार* सुद्धा नाहीत🙏
#शेतकरी #गड्या_आपला_गावच_ सातबारा
कदाचित यातील कित्त्येक शब्द *पुढील पिढीला* कळणार देखील नाहीत 😔
पण हा *अनमोल* मराठी *शब्द ठेवा* जतन करायलाच हवा 🙏🏽
No comments:
Post a Comment