प्रकट चिंतन :
मी बाप्पांची विसर्जन मिरवणूक TV वर पहातोय, तो जल्लोष, ते उत्साहवर्धक वातावरण.
original विचार करण्याची सवय जाऊ नये म्हणून थोडा विचार करतोय...
(काय झालयं,विचार करण्याचं काम थोड्या लोकांनी हातात घेतलंयं, बाकी लोक्स,
फोडीले भांडार,धन्याचा हा माल, मी तो हमाल, भारवाही...
सारखं फक्त frwd करण्यात धन्यता मानतात)
मी अबूधाबीत एकदा एका वाचस्पतींचं प्रवचन ऐकलं होतं.
ते म्हणाले,
"लोकांना 'आला देव,गेला देव' असं हवं असतं !!
सतत देवाची उपस्थिती नको असते,
कारण मग पापं करता येत नाहीत (?!).
कोकणात पुढच्या दरवाज्याने गणपती गेला की मागच्या दरवाज्याने मासे किचन मधे आणले जातात, असं कुठंतरी वाचल्याचं आठवलं.
मागे एकदा मी कुठेतरी नातेवाईकांबरोबर गाडीने जात होतो, ठिकाण आठवत नाही पण "धूतपापेश्वर मंदिर' पार केल्याचे आठवते, excuse me पण मला धक्का बसला...
" हि काय laundary servce आहे का?"
पापं करा आणि ह्या मंदिरात या असं असतं का??
थोडंसं संस्कृत काय आलं,ह्या लोकांनी धूतपापेश्वर नाव ठेवलं.
खरं तर 1 किलो पुण्य करा, त्याचं reward मिळेल.
1 किलो पाप करा, त्याची punishment मिळेल.
पाप पुण्य square-off किंवा cancell होतं नाही. असं मला वाटलं.
what you say?
खरं तर काय पाप,काय पुण्य?
its all theory of relativity !!
एकाचं पुण्य हे दुस-याच्या दृष्टीकोनात पाप असू शकतं.उदा.विशिष्ट दिवशी बकरे कापणं. त्याचं वेळी अहिंसावादी मंडळी हे थांबवा म्हणताहेत.
निसर्ग might is right बळी तो कान पिळी म्हणतोय, survival of the fittest.
साधारण 1298 मधे ज्ञानेश्वर पसायदान मधे विश्वाचे कल्याण चिंतीत होते नेवासे मधे,
"जे खळांचे व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो ।"
(खलनायकांचे वाकडेपण दूर होवो, त्यांना चांगल्या कामात रूची निर्माण होवो)
तेव्हा त्याचवेळी तेथून 1267 किमी दूर अल्लादीन खिलजी दिल्लीत मुंडक्यांचे pyramids रचतं होता.हजारो माणसं मारली त्याने.
तर दूस-याचं मन न दुखवणं ही आपण पूजा समजूया का ?
पण मग what about our own मन ??ते दुस-यांनी दुखवलं तर कसे चालेल ????
मी कुठल्याही conclution ला येत नाही.
think over it.
यावर विचार करा.
#rajeshmorankar
No comments:
Post a Comment