बुडतां हे जन देखवे ना डोळां ।
येतो कळवळा म्हणउनि ॥२॥
# संत तुकाराम
चार दिवसापूर्वी ती बातमी वाचली आणि समाजात किती अज्ञान आहे याचा नव्याने साक्षात्कार झाला, हे हे अज्ञानाच्या हिमनगाचे टोक असावे का?
बारा वर्षाची अजाण पोर, पहिल्या मेंसेसमधे तिच्या कपड्याला डाग पडले, तिला काय माहित ती चार दिवसांनी ती ह्या पृथ्वीतलावर असणार नाही. तिचं अज्ञान तिचा जीव घेण्याइतकं भयानक होतं का! तिला समजावून सांगणारं कुणीतरी मिळायला पाहीजे होतं.
Puberty चे वय लवकर होतं चाललय, आणि याबद्दल ची माहीती, काळजी,शाळेतील शिक्षिका, आंगणवाड्यातील ताया,मुलींच्या आया, आत्या मावश्या,शेजारच्या बाया, आज्या ह्या जसे प्रसंग येतील तशा सांगत असतातच.
दुर्दैवाने या मुलीला सांगणारे कुणी नव्हते.
आई वडील गावी शेतात कष्टत असतील, मुलगी भाऊ व वहीनी जवळ रहात होती.
हे टिव्ही सिरीयल्स, पेपरमधल्या बातम्यांमुळे समाजाचे मन इतके प्रदूषीत झालेय ,वहिनीच्या मनात संशय येऊन,तिने भलताच संशय घेऊन, हिने कुणाबरोबर तरी संबंध केले असावेत असे हिच्या भावाला सांगितले. सिक्यूरीटी गार्ड म्हणून काम करणारा भाऊ संतापला, कोण तो सांग, म्हणत 4 दिवस उपाशी ठेवून मारहाण केली.
मुलीला काहीही समाधानकारक सांगता आले नाही,प्रश्नच कळला नसावा, ती मेली.
फूल ऐसे भी हैं जो खिले ही नहीं जिनको खिलने से पहले फ़िज़ा खा गई, कोई समझा(या) नहीं, कोई जाना नहीं..
कोवळ्या वयातील मूलींना पिरीयेडस बद्दल माहिती,काळजी, स्वच्छता याबद्दल याबद्दल नर्सींग,डाॅक्टर्स,सोशल अॅक्टीव्हिस्ट,वगैरेंकडून खूप लिहिलं,सांगितल गेलयं.
काय करता येईल हा विषयच काढत नाहीये, थोडी माणूसकी, थोडं प्रेम शिल्लक राहू द्या एवढचं सांगतोय.
समाजातल्या क्राईमच्या बातम्यांनी माझे मन निब्बर झाले आहे असे समजत होतो, पण या घटनेने, तो थर खरवडला गेला असावा आणि मनाचा संवेदनशील भाग उघडा पडला.
आनंद बक्षी लिहीतात,
मत पूछो, औरों के दुख में,
ये प्रेम कवि क्यूँ रोता है...
बस चोट किसी को लगती है,
और दर्द किसी को होता है..,,
दूर कहीं कोई दर्पण टूटे,
तड़प के मैं रह जाता हूँ.
मी निराशावादी नाही तरी पूर्वी एका रिक्षाच्या मागे लिहीले होते,ते आठवले,
" हे असचं चालायचं...."
No comments:
Post a Comment