photos from internet with thanks
2008 august ची गोष्ट.
आमचा सतरा जणांचा ग्रुप थायलंड मलेशिया सिंगापूर टूर करून परत येत होता. विमानात माझी मुलगी ऋतुजा म्हणाली,
" पप्पा आपल्या मागे जे आंटी, अंकल बसलेत ना ते जम्बो सुडोको सोडवताहेत "
असतील कोणी गणिती ब्रेन्स असे म्हणून मी निवांत बसलो,नंतर उत्सुकतेने कोण असावेत म्हणून मी वळून बघितलं आणि काय आश्चर्य आमच्या मागच्या सीटवर साक्षात डॉक्टर मंगला नारळीकर आणि डॉक्टर जयंत नारळीकर बसलेले होते मी क्षणार्धात त्यांना ओळखलं पण तरीही माझा विश्वास बसत नव्हता कारण एवढे महान शास्त्रज्ञ इकॉनॉमिक क्लास मधून कसे येतील हा प्रश्न मला पडला.
मी मितालीला सांगितलं की मला शंभर टक्के खात्री आहे हे डॉक्टर जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर आहेत. मिताली चक्क त्यांनाच विचारलं,
" आपण डॉक्टर जयंत नारळीकर आहात का? "
त्यांनी हसून हो म्हटलं,
मग काय माझ्यासकट सगळ्यांचीच त्यांच्याशी हात मिळवून अभिवादन करण्याची रांग लागली.
डॉक्टर नारळीकर यांना मी त्यांच्यावर महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी मासीक मध्ये एक लेख लिहिल्याचे सांगितला "एका बातमीचा मागोवा" असे त्या लेखाचं शीर्षक होतं आणि पेपर मधली एक बातमी होती त्यात त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं की विषाणू हे अवकाशातून येतात त्यावर मी लिहिलं होतं, त्यांनी उत्सुकतेने माझे बोलणे ऐकलं.
बॅगेज बेल्टजवळ ही मी त्यांच्या मागे घुटमळत होतो, बेल्ट वरून त्यांच्या बॅग काढून देण्यास मी मदत केली. पुण्याला ते आमच्या गाडीतून येतील का? अशी संधी आपल्याला मिळेल का असा मी विचार करत होतो त्यांच्या प्रायव्हसी मध्ये अतिक्रमण करणे योग्य ठरेल की नाही हे मला ठरवता येईना,मी मंगलाताईंच फोनवरच बोलणं ऐकलं त्या बहुतेक मुलीशी बोलत होत्या,
" काही नको वरण-भात कर फक्त"
असं ऐकलं ,त्यांच्या सादगीचं मला अतिशय आश्चर्य वाटलं, आदर वाढला.
मी जेव्हा ही गझल ऐकतो तेव्हा मला डॉ. जयंत नारळीकरांची च आठवण येते..
"धनक में चांद नहाया, तो तेरी याद आयी, जहाँ में कोई भी भाया तो तेरी याद आयी... "
धनक = इंद्रधनुष्य
हे असं शक्य आहे का कि ही फक्त कविकल्पना आहे असे मला त्यांना विचारायचे होते ते राहून गेले,
"गेले राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्यापास आता स्मृती आणि पुस्तक पाने.."
सूर्य आपल्या पाठीमागे चमकत असावा, नुकताच पाऊस पडून गेला असावा, संध्याकाळची वेळ असावी,इंद्रधनुष्य दिसावं आणि चमत्कार...आकाशात (पौर्णिमे चा) चंद्रमा उगवावा.
एकदा मी बातमी वाचली आणि डॉ. जयंत नारळीकरांची च आठवण आली,ते सुलभ सोपे असे समजून सांगतील.
शास्त्रज्ञांनी अंटार्टिका वरचा बर्फ उकळवला पूर्ण पाण्याची वाफ झाल्यानंतर त्यांना खाली काही लोखंडाचे कण दिसले.
हे लोखंडाचे आयसोटोप (समस्थानिक)होते, हे iron-60 आयसोटोस पृथ्वीवरच काय तर आपल्या संपूर्ण ग्रहमालेत उपलब्ध नाहीत, ते iron-60 isotops 2000 साली पृथ्वी वर आले असे मी वाचले, हा कॉस्मिक किरणांचा परिणाम होता असे नंतर कळले तेव्हाही मला डॉक्टर नारळीकरांची आठवण झाली त्यांनी आपल्याला अतिशय सोपे आणि कळेल असे स्पष्टीकरण दिले असते
डॉक्टर नारळीकरांची आठवण येतच राहणार.
प्रकांड पंडित आणि साधेपणा असे हे व्यक्तिमत्व पृथ्वीवर वावरून गेले हे येणाऱ्या पिढ्यांना कसे कळेल?
राजेश मोराणकर 9822865559
rajeshmorankar@gmail.com
--------------------------------
(The iron isotope found in Antarctic snow and associated with supernovas is called iron-60 (according to Natural Habitat Adventures and Scientific American). This isotope is produced in the cores of massive stars and ejected into space during supernova explosions. It's a radioactive isotope with a half-life of 2.6 million years.)
----------------------------------
No comments:
Post a Comment