Monday, 30 March 2015

आयुष्यातील अलाद्दिन फॅक्टर



                                          बिन मांगे मोती मिल जाये    
                                          मांगे मिले न भिक...


काळ बदलला कि समाजातील विचारधारा पण बदलतात.वर दिलेल्या ओळी पूर्वीच्या काळातील विचार मुल्य दाखवतात ,ज्यावेळी मागणं कमीपणाचे लक्षण मानले जात होते. पण आता एकंदरीतच एवढा बदल झालाय कि न मागणा-या माणसाला काहीच मिळत नाही व त्याला काही नकोच असेल असे गृहीत धरले जातं .

आयुष्य म्हणजे तरी काय असते?
 …आशा  अपेक्षांची शृंखलाच  ना ?

हसरतें ही हसरते है,और क्या है 
जिंदगी का दूसरा ,ये भी नाम है !!
 
अलाद्दीनची गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी वाचलीच आहे,अलाद्दीनला जादूचा दिवा सापडतो व तो घासल्यावर त्यातून राक्षस सेवेस हजार होतो व म्हणतो ,"माग काय हवे ते" अलाद्दीन मागतो व त्याला ते मिळते .
लक्षात घ्या, त्याने  मागितले नसते तर  जवळ जादूचा दिवा असुनही त्याला काही मिळाले नसते !!

आपल्या सर्वांच्या आयुष्यातही एक "अलाद्दिन फॅक्टर" असतो पण आपण मागण्यात कमी पडतो म्हणून आपल्याला बरच काही मिळत नाही. कॅनफील्ड आणि हॅन्सन यांच्या मते समस्या आपल्या मानसिक जडणघडणी मध्ये
असते.लहानपणी आपण काय शिकलो ते, संकोच,भीती,स्वाभिमान,मर्यादित अपेक्षा, काय उपलब्ध आहे (मेनू) हे माहित नसणे किंवा स्वत:ला काय हवे ,तेच माहित नसणे.

आपण मागत नाही कारण,

१) Menu card च वाचलं नाही !! ,अज्ञान: काय मिळणे शक्य आहे हे माहित नसणे,काय मागावे हे न कळणे, स्वत:ला काय पाहिजे तेच न कळणे .

२) मर्यादित विचार व चुकीचे समज:आपली जडण घडण , शाळेतून, सभोवतीच्या संस्कारातून आपण अल्पसंतुष्ट होत जातो. नातेसंबंधात सुद्धा आपण म्हणतो त्याचे प्रेम असेल तर मला मागण्याची जरूर पडू नये वगैरे.

३) भीती :नकाराची भीती ,आपण मुर्ख ,बावळट दिसू हि भीती,लाजिरवाणी स्थिती होईल हि भीती.

४) स्वत:ची किंमत कमी असणे: माझ्या गरजा फारश्या महत्वाच्या नाहीत असे वाटणे.

५) स्वाभिमान: मागण्यामुळे आपण दुर्बल दिसू, दुसर्यांच्या नजरेतून उतरू  असे वाटणे .

अलाद्दिन फॅक्टर समजल्यावर वरील अडचणींवर तुम्ही मात करल.स्वत"च्या मर्यादित विचारातुन बाहेर पडून कणखर व्हाल व तुमच्या योग्यतेच्या गोष्टींची अपेक्षा कराल .वेगवेगळ्या परिस्थितीत प्रभावी पद्धतीने कसे मागावे हे तंत्र तुम्हाला कळेल . एकदा प्रभावी पद्धतीने रिक्वेस्ट करण्याच्या तंत्रावर प्रभुत्व मिळविले कि त्यानंतर तुमचे आयुष्यच बदलून जाईल असे लेखकांचे म्हणणे आहे .त्यांचे म्हणणे आहे कि"अलाद्दिन फॅक्टर" तुमच्या आत्मविश्वासात भर घालेल व तुम्ही तुमच्या लायकीच्या, योग्यतेपेक्षा कमी गोष्टीला कधीही मान्यता देणार नाहि.

Aladdin factor : By Jack Canfield and Mark Hansen

Saturday, 21 March 2015

Applying economics concept in nutrition !

समजा एखाद्याचं रोजचं income रु.2400 आहे व ते त्याला संध्याकाळी मिळते.दिवसभराच्या खर्चासाठी तो कर्ज घेतो.संध्याकाळीपगार मिळाल्यावर तो कर्जाची परतफेड करतो.
त्याचा खर्च वाढत चाललाय.कधीरु.4000 कधी 4500 तर कधी रु.3500

आता त्याच्यावर कर्ज वाढत चाललय वर व्याजही वाढत चाललय.
तो थोडं जास्त काम करुन आणखी 200 रुपये मिळवतोय तरी त्याला दिसतयं की साठलेलं कर्ज फेडणं मुष्कीलही नही नामुमकीन है.

तो निराश होतो .जास्त काम करुन 200-300 रुपये मिळवण्याचा हुरुप त्याला रहात नाही.

आता जस्ट चेंज द करंसी !!
जे काही रुपये वगैरे आहे त्या ऐवजी कॅलरीज म्हणूया. आता काय दिसतयं?
साधारणत: शरीर दिवसाला 2400 कॅलरीज खर्ज करते असे मानले तर रोज आपण आहारातून जे कर्ज घेतो त्यातले 2400 शरीर खर्च करत  असेल तर राहीलेल्या कॅलरीज चरबी किंवा फॅट मधे रुपांतरीत करुन साठवते.
(हे मानले की शरीराचे चयापचय /metabolism ही एक गुंतागुंतीची complex प्रक्रिया आहे, तरी समजून घेण्यासाठी आपण सोपा विचार करतोय...)
आता बरोबर 2400 चा आहार घ्यायला आपण काही तराजु किंवा वजनकाटा व तक्ते घेऊन जेवायला बसत नाही मग काय करायचे?

बॅक टू ओरीजनल करंसी, आता दुसरी कंसेप्ट....
समजा एका हातात एक,दोन रुपयांच्या 30 नोटा आणि दुसर्या हातात पन्नास रुपयांच्या 2 नोटा धरुन अजाण मुलाला ,तुला कोणत्या हातातल्या नोटा पाहीजे विचारले तर मूल जास्त दिसणार्या
एक,दोन रुपयांकडे जाण्याची शक्यता अधीक आहे.

आपणही nutrition बाबत त्या मूलासारखेच अजाण आहोत. रंग, वास आणि चव या गोष्टींकडेच आपण झेपावतो. त्या अन्नातून आपल्याला काय पोषणमुल्ये मिळणार आहेत याचा आपण कधीच
विचार करत नाही.
त्यामुळे आपण नीकस अन्न खातो.पोषणमुल्यांऐवजी कॅलरीज मिळवतो.

व्यायाम हा extra income सारखा असतो त्याने खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आधार मिळतो.

शेवटी ताळेबंद. ज्या प्रमाणे बॅंक मॅनेजरला रोजचा बॅलेंसशीट रोज जुळवावा लागतो तसेच nutrition चा ताळेबंद रोजच जुळवावा लागतो मग खूप लोड येत नाही.तरी कधी जास्त कॅलरीज चे कर्ज झाले तर पुढच्या दिवशी कमी कर्ज ( आहार ) घेउन भरपाई करावी.