बिन मांगे मोती मिल जाये
मांगे मिले न भिक...
काळ बदलला कि समाजातील विचारधारा पण बदलतात.वर दिलेल्या ओळी पूर्वीच्या काळातील विचार मुल्य दाखवतात ,ज्यावेळी मागणं कमीपणाचे लक्षण मानले जात होते. पण आता एकंदरीतच एवढा बदल झालाय कि न मागणा-या माणसाला काहीच मिळत नाही व त्याला काही नकोच असेल असे गृहीत धरले जातं .
आयुष्य म्हणजे तरी काय असते?
…आशा अपेक्षांची शृंखलाच ना ?
हसरतें ही हसरते है,और क्या है
जिंदगी का दूसरा ,ये भी नाम है !!
अलाद्दीनची गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी वाचलीच आहे,अलाद्दीनला जादूचा दिवा सापडतो व तो घासल्यावर त्यातून राक्षस सेवेस हजार होतो व म्हणतो ,"माग काय हवे ते" अलाद्दीन मागतो व त्याला ते मिळते .
लक्षात घ्या, त्याने मागितले नसते तर जवळ जादूचा दिवा असुनही त्याला काही मिळाले नसते !!
आपल्या सर्वांच्या आयुष्यातही एक "अलाद्दिन फॅक्टर" असतो पण आपण मागण्यात कमी पडतो म्हणून आपल्याला बरच काही मिळत नाही. कॅनफील्ड आणि हॅन्सन यांच्या मते समस्या आपल्या मानसिक जडणघडणी मध्ये
असते.लहानपणी आपण काय शिकलो ते, संकोच,भीती,स्वाभिमान,मर्यादित अपेक्षा, काय उपलब्ध आहे (मेनू) हे माहित नसणे किंवा स्वत:ला काय हवे ,तेच माहित नसणे.
आपण मागत नाही कारण,
१) Menu card च वाचलं नाही !! ,अज्ञान: काय मिळणे शक्य आहे हे माहित नसणे,काय मागावे हे न कळणे, स्वत:ला काय पाहिजे तेच न कळणे .
२) मर्यादित विचार व चुकीचे समज:आपली जडण घडण , शाळेतून, सभोवतीच्या संस्कारातून आपण अल्पसंतुष्ट होत जातो. नातेसंबंधात सुद्धा आपण म्हणतो त्याचे प्रेम असेल तर मला मागण्याची जरूर पडू नये वगैरे.
३) भीती :नकाराची भीती ,आपण मुर्ख ,बावळट दिसू हि भीती,लाजिरवाणी स्थिती होईल हि भीती.
४) स्वत:ची किंमत कमी असणे: माझ्या गरजा फारश्या महत्वाच्या नाहीत असे वाटणे.
५) स्वाभिमान: मागण्यामुळे आपण दुर्बल दिसू, दुसर्यांच्या नजरेतून उतरू असे वाटणे .
अलाद्दिन फॅक्टर समजल्यावर वरील अडचणींवर तुम्ही मात करल.स्वत"च्या मर्यादित विचारातुन बाहेर पडून कणखर व्हाल व तुमच्या योग्यतेच्या गोष्टींची अपेक्षा कराल .वेगवेगळ्या परिस्थितीत प्रभावी पद्धतीने कसे मागावे हे तंत्र तुम्हाला कळेल . एकदा प्रभावी पद्धतीने रिक्वेस्ट करण्याच्या तंत्रावर प्रभुत्व मिळविले कि त्यानंतर तुमचे आयुष्यच बदलून जाईल असे लेखकांचे म्हणणे आहे .त्यांचे म्हणणे आहे कि"अलाद्दिन फॅक्टर" तुमच्या आत्मविश्वासात भर घालेल व तुम्ही तुमच्या लायकीच्या, योग्यतेपेक्षा कमी गोष्टीला कधीही मान्यता देणार नाहि.
Aladdin factor : By Jack Canfield and Mark Hansen
No comments:
Post a Comment