Monday, 29 June 2015

काय लिहावे

काय लिहावे
हा प्रश्न प्रत्येकाला कधी ना कधी पडलाच असतो. समर्थ रामदास म्हणून गेले
'दिसामाजी काहितरी ते लिहावे,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे '.
दुसरी ओळ तर आपण पाळतोच.2 इंग्शिश,4 मराठी एखादा हिंदी पेपर वाचतोच त्याशिवाय ई-मल्स ,आॅफिस मटेरियल्स व अनेक इतर.
(एवढं वाचायची खरचं गरज नाही)

मोठ्या हौसेने ब्लाॅग सुरु केला.धडाक्यात 23 पोस्ट टाकल्या आणि मग काय लिहायचे असा खडखडाट झाला.
आपण कधी चित्र काढतो पण ते खास वाटत नाही. कधी गायचा प्रयत्न केला तर गाणं रंगत नाही.
का असं होतं?
मग त्या चित्राला आकाश काढलं, जमीन / हिरवळ काढली ,वस्तुंना ठळक बाॅर्डर काढली कि त्याला उठाव येतो.
गाण्याचं म्हणावं तर तेच, पार्श्वसंगीतामुळे गाण्याला भरीवपणा येतो,उणीवा झाकल्या जातात.त्यामुळे कॅराओकेवर गायला चांगले वाटते.

लिखाणाचे काय?
तेच.
एक मध्यवर्ती कल्पना असते, विचार असतो आणि लेखक वाचकांना त्या दिशेला वाहुन न्यायचा प्रयत्न करत असतो.
मग?
काहि नाही, विचारांच्या इंधनाची टाकी 'रिझर्व' लेव्हलच्या खाली जाऊनही गाडी एव्हढी हाणली आहे.
आज पुरे,थांबतो.


No comments:

Post a Comment