Sunday, 5 July 2015

नवीन दासबोध






whatsapp वर हे आधुनिक श्लोक पावले ! कवी चे नाव नव्हते .


II मनाचे श्लोक - आजच्या युगातले, II

विषय- लाइफ स्टाईल मॅनेजमेंट
(रामदास स्वामींची क्षमा मागून)

वॉटसएप
         मना सज्जना, हाती वॉट्‌सएप नकोरे
         उतू दूध जाई, कुकर शिट्टी मारे
         पती दावी क्रोध, भुकेलेली पोरे
         बुडे बोट संसार, व्यसन नाही बरे  II
व्यायाम-
         प्रभाते मनी देह हा जागवावा,
         पांघरुणात लोळून, वाया न जावा
         नमस्कार घालावे , सूर्यासी दहा
         दिवस जातो आनंदे, मित्रांनो पहा II 
फास्ट फूड-
         मना सांग पा, जेवणा काय झाले ?
         पोळी भाजी सोडोनी, बर्गर मिळाले
         चढे चरबी अंगा, ड्रेस तंग सगळे
         वजन काटा पाहूनी, मिटुन घेई डोळे II
बैठी जीवन शैली-
         घरी यावे ऑफीस मधूनी उशिरा
         टीवी बघत खावा, फास्ट फूड कचरा
         सकाळी ना होई, मलाचाही निचरा
         कुठुन येई शक्ति, आरोग्यास विसरा II


अध्यात्म-
        नको रे मना, लागू भोंदूच्या नादी
        नको अंधश्रद्धा, नको घेऊ उदी
        सद्गुरु खरा तो, मनाचा विवेक
        नको घालवू वेळ, हृदय सांगे ऐक II
   
मद्य-
        मना सज्जना मद्य, भयंकर पाश
        घरा राख रांगोळी, होई सर्वनाश
        नको तो सुधाकर, नको तोच प्याला
        सुरुवातीस एक, मग घरीच मधुशाला II

धूम्रपान-
        मना सांग का ओढिशी धूम्रकांडी
        फुफ्फुसास भोके, आरोग्यही सांडी
        हृदयास झटके, व्यसन हाचि रोग
        आयसीयूत नेई, कर्माचाच भोग II

टेन्शन-
         विचारी मना तूची शोधुनी पाहे
         टेन्शन किती या आयुष्यात आहे
         उद्याचे कसे हो, मना जाळी चिंता
         प्याला अमृताचा, तोही भासे रिता
         किती हवा पैसा, नको धावू मागे​
         आयुष्य निसटले, आता व्हावे जागे II


कर्ज़-
         नको रे मना, काढू भले मोठे कर्ज
         गिळे जसा अजगर, दया माया वर्ज्य
         पोखरी मनास, आनंदा सुरुंग
         जितेपणी नको तो , सोनेरी तुरुंग II

            II   जय जय रघुवीर समर्थ II


त्या अज्ञात कवीला प्रणाम केला .मला हा फाॅर्म आवडला मी ही पेटलो आणि अगदी
जोर लावून खालील ओळी लिहील्या...


पाणी पिणे
तहान लागताच पिणे फक्त पाणी
कोला मिरिंडा वा थंडा नको कोणी
जला नेच शांत होती मूत्रपिंडे
विषके फेकूनी शुध्द रक्त हिंडे

साखर
मना सज्जना सांगतो बोल खरे
गरज ना मानवा खाणे ती साखरे
पर्यावरण नाश,एक किलो साखर
साठी लागे पाणी द्वि सहस्त्र लिटर

मॅगी
नको रे मना वाचवू दोन मिनीटे
पौष्टिक खाणे करा पूर्वतयारी नीटे
अजीनोमोटो तयामाजी वीषे
कमी म्हणोनी मिसळीती शिसे

अभ्यास
विचारी मना नको होऊ परिक्षार्थी
विषय समजूनी हो तू विद्यार्थी
सिलॅबस ची चौकट दे तू फेकोनी
ज्ञान आणि माहिती फरक घे जाणोनी

वजन
वाढता वाढे, नुपयोग फारसा
होतो हैराण टाळतोच आरसा
व्हावे तू चल,व्हावे अन्नसाक्षर
कॅलरीचा हिशोब अन् चाला झरझर

आनंद
आनंद नाही विकत बाजारात
आनंद नाही पिकत हजारात
आनंदी रहाणे असे फक्त एक सवय
रोजच्याच गोष्टीत शोधायला हवंय

Attitude / मानसीकता
मना सज्जना हार मानु नको रे
माघार ही, ठार मानु नको रे
एक म्हणे हे होणे नाही
दुजा म्हणे हे होणे पाही.
होणे, न होणे तुमचीच प्रकृती
जशी मानसीकता, तशीच कृती

creativity / सर्जनशीलता
व्यायामी जसे पुष्ट होतात स्नायु 
कल्पकता वाढे  ताण देता उपायु
करताच मनविचार घर्षण
घडतेच नवकल्पनेचे दर्शन
पडताच नवकल्पनेचे बीज
चमकून जाते आकाशी वीज.

------राजेश 

No comments:

Post a Comment