Thursday, 25 May 2017

Theatre Reveiw : नाटक : वाय ....Impressive

काल 24 मे 17 ला ज्योत्स्नाभोळे सभागृहात (पुणे) हे नाटक पाहिले.



impressive सादरीकरण !

मला महत्व वाटतं हे नाटक येण्याच्या timing चं आजच आपण पेपर मधे मँचेस्टर वाचतो आणि संध्याकाळी हे analytical नाटक बघतो हा एक दुर्मीळ योगायोग म्हणावा का.

श्रीरंग गोडबोले यांची रंगमंचावर सादरीकरणकरण्या च्या माध्यमावर जबरदस्त हुकूमत आहे,ह्या fusion प्रकाराला काय म्हणतात माहीत नाही पण स्टेज आणि जरुर तेथे स्क्रीन वापरुन ते स्टोरी गतिमान पध्दतीने मांडतात, यात कल्पकता असते,त्यामुळे खूप उठाव येतो. (या साठी खूप planning / assistance व कलाकारांची शिस्त लागत असावी)

स्टोरी काय आहे सांगून मी पुढचा प्रयोग पहाणा-यांचा रसभंग करु इच्छीत नाही.ते स्टेजवर पहाण्यातच थ्रील आहे.

आपल्याभोवती घडत असणा-या घटनांचा तो calidoscope आहे. आपल्याला या विषयी काहीतरी मत असायला हवे, आजकाल कट्ट्यावर तरुणाई यावर चर्चा करते का माहीत नाही, कुणीतरी सुमार जस्टीन येतो, तिथे तरुण आणि उच्चभ्रू गर्दी करतात ते music ची समझ असते म्हणून नाही तर happening ठिकाणी आम्ही होतो हा selfi social मिडीयावर टाकायला.
मग तो जस्टीन काही तासातच करोडो रुपये खेचून जातो....ते ही lip singing करुन.

आपली संकृती विसरुन आपण पाश्चात्य झालो म्हणून दुसरीकडे काही कडव्या भारतीय संस्था जहालवादी झालेल्या असतात,स्वत: पडद्यामागे राहून गुरू सारखे हस्तक निर्माण करुन भाबड्या तरुणांचा प्याद्यासारखा वापर करतात.

दाभोळकर / पानसरे/कलबुर्गी यांच्या सारख्या विचारवंताच्या हत्येचा (राजकर्ते बदलूनही) तपास लागत नाही, हे आपण बघतो आहोत, त्यावर candle मार्च करणा-याचा एक वर्ग आहे,तसेच याचा मागोवा घेणा-या पत्रकार आहेत, वर्षानुवर्ष तपास करणारे पोलीस आहेत.
हे सर्व रोज पेपरमधे वाचून नीर्विकारपणे पान पलटणा-या आपल्या मनोवृत्तीला हलवण्यासाठीच या नाटकाचे प्रयोजन असावे.

Tv वरच्या वांझोट्या चर्चा ही व्यंगात्मक दाखवल्याच आहेत,त्या जेवतांना पहाणारे प्रेक्षक यात हलके विनोदी पंच छान मारलेत.

नाटकाचा कॅनवास मोठा आहे, वरील सर्व विषय एकत्र बांधण्यासाठी ऐक प्रेमकथा,दोन कुटुंबे , काॅलेज, गुरु ची संघटना अशा अनेक समांतर गोष्टींची खुबी ने केलेली गुंफण व  प्रभावी  स्टेजस्क्रीन   सादरीकरण म्हणजे नाटक वाय.
वाय या अक्षराप्रमाणे दो-राहे वर उभ्या असणा-या तरुणाची ही गोष्ट आहे.

नाटकातील संगीत व गाणी खूप प्रभावी आहेत त्याबद्दल त्रय (हिृृषिकेश-सौरभ-जसराज ) चे खूप अभिनंदन.
एका गाण्यातले शब्द मात्र खटकले ,
( गो xx,गो xx,  तुझी गरज नाय !)
गाणं अंगावर येते...aggresive rap song आहे,चाल/rythm व गायन भन्नाट आहे. मी मागच्या पिढीचा प्रतिनिधी असल्याने शब्द खटकले, सध्याचे टीनएजर जर अशी भाषा बोलतात का ? goodness! पण संहिता script सेंसाॅर वाचते का??
कि गाणं नंतर अॅड केलं.

नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या कोमट टाळ्यांचा प्रतिसादाची मला चीड आली,सणसणून टाळ्यांचा गजर ह्या पुणेकरांना करता येत नाही का!
किती research, किती planning, किती मेहनत,coordination लागतं,त्याची कदर व्हायलाचं हवी.
मला वाटतं याचं एक ट्रेनिंग प्रेक्षकांना सुरवातीला दिले पाहिजे.
कमी आवडलं = कमी टाळ्या डेमो
जास्त आवडल = जास्तटाळ्या डेमो
डोक्यावर घ्यावसं वाटलं = loud applaud

before i forget,
राजेश देशमुख यांच वेळोवेळी केलेलं निवेदन खूप दमदार झालं,आवाज छान लागला,शब्दोच्चार स्पष्ट व अर्थवाही वाटले.

सारळकर देवेंद्र चा स्टेजवर चा वावर,अभिनय सहजसुंदर होता, just effortless !
राधीकाचं पाठांतर amazing आहे (काही शब्द डोक्यावरुन गेले ,जर्मन होते का?)  घराची काळजी करणारी,मुलाचे दोष झाकणारी गृहीणी तिने छान उभी केली.

गुरु खूप झोकात उभा केला ( त्याचे असीस्टंट ही झकास रंगवले आहेत)
पत्रकारमधे रमेश भाटकर चा भास होतो.
देवयानी ने कला व कँडल संस्कृती बरोबर पोचवली
अरु चं काम छान झालं, काहीवेळा असणारे बोल्ड संवाद व movements करतांना तिचा ease खूपच काबील-ए-तारीफ आहे.
राग व हतबलता तिने perfect दाखवलीय.

शेवटी आपला हिरो,
घराघरात असे मुलं असतात,अंगात अमर्याद क्षमता पण दिशा माहित नाही,म्हणाल तर उद्धट पण आदर्श / गाॅडफादर मिळाला तर नतमस्तक होतात,यांना लूझर म्हटले तर खचतात,हिरो म्हटले तर उभारी घेतात.
गरज आहे मोहात न अडकता सारासार विचार करण्याची,कोणत्याही बाजूला अतिरेकी न झुकता मध्यममार्ग धरण्याची.
(रेगे फिल्म ची आठवण होते)

पलू (अंजनेय) पत्रकाराला समजवायला घरी येतो, तो प्रसंग माझ्यामते नाटकातला highlight प्रसंग आहे तिघांनीहि संवाद व त्यांच्या reactions खूप छान केल्यात, तिघेही आपल्याजागी बरोबर आहेत, या प्रसंगात ते तिघं / स्क्रीप्ट / direction यांना full marks.
शेवटी शॅडोग्राफीमध्ये,

" पिस्तुल तुझ्या हातात आहे,ट्रिगर दाबण्याचा अवकाश की..."

छा गये.
deserved laud appluad !










Tuesday, 23 May 2017

Charty with difference :दानवीर जानकी सेठ



मी रिक्षा त बसलो,पर्वतीहून मयूरकाॅलनीत सोलॅरीसजवळ जायला सांगितले.
2:45 pm 23 मे 2017



रिक्षावाला म्हणाला रस्ता सांगा,
"खरं तर मी फक्त पेशंट ला सवारी देतो"
"आता पेशंटला घेऊन आलो होतो,आणि मी पेशंटकडून मी फक्त अर्धे भाडे घेतो" !

माझ्या तार्कीक मनाला हे पटेना...

अर्धे भाडे ?
"हा...बाकी अर्धे भाडे एक मारवाडी सेठ देतो " !!

नवलचं

"हा, पेशंटचे भाडे रु.260 झाले, 130 घेतले, नंतर सेठ कडे जायचे, म्हणायचं, रु 260 झाले होते,
एक शब्द नाही,लगेच रु 130 देणार"

मी ऐकतचं राहिलो.

"बरं त्यांच काही फार मोठा धंदा नाही, छोटंस दुकान आहे, त्यांची मुलं ही त्यांच्या सारखी च दानी आहेत".


एकीकडे खा खा खात सुटलेली भ्रष्टाचारी राजकारणी मंडळी.
दुसरीकडे जानकीसेठ सारखी व्रतस्थ लोक !
कदाचित यांच्यामुळे दुनियेचा नैतिक तोल सावरला जात असेल.

काहिही संबंध नसलेले पेशंट काही रिक्षावाले हाॅस्पीटलला पोचवतात,त्यांच्याकडून अर्धेभाडे घेतात.

मग,
जानकीसेठ समोर उभे रहातात.

जानकीसेठ प्रश्नार्थक पहातो,
जे काही रिक्षाभाडे रक्कम ऐकतो,त्यावर विश्वास ठेवतो,
मारवाडी बुद्धी /हात चालतात,
क्षणार्धात अर्धेभाडे देतो,
काहीच न घडल्यासारखे दुस-या कामाकडे वळतो


Friday, 12 May 2017

पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम ! 12मे 2017

ही घ्या सकारात्मक बातमी

करीष्मा चौक, पुणे,रात्रीचे 8:15 वाजलेले (22 मे 2017) ,तशात पाऊस पडतोय,सिग्नल खराब,कामावरुन येणा-या वाहनांची गर्दी आणि पावसाची पर्वा न करता हातात फ्लोरोसेंट दर्शक दिवे घेऊन वाहतूक नियंत्रण करणारे दोन वाहतूक पोलीस .
त्यांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम !
---राजेश मोराणकर

चारोळी

घ्या नवी कोरी चारोळी.

भाजपाप्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिवराळ वाचावीर बद्दल,

          दानवे
काम करीती जानवे,
अन् बरळती दानवे,
का फोडीती  वादा नवे,
काय बोलावे मग मानवे ?

Thursday, 11 May 2017

गरजू मुलांसाठी त्या दोघांनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ चप्पल. श्रीयांस भंडारी आणि रमेश धामी. ‘ग्रीनसोल’.



Thanks to Loksatta
पूर्वी वापरायला चप्पलचा एक जोड लोकांना मिळायचा नाही, पण आता मात्र प्रत्येकांकडे किमान दोन जोड तरी असतातच. ही संख्या वाढतही जाऊ शकते. म्हणजे बघा ना घरी घालायची चप्पल वेगळी, ऑफिसमध्ये बूट, जिमिंगसाठी शूज, ड्रेसवर सँडल किंवा हायहिल्स वगैरे वगैरे. या चप्पलचा घरात एवढा ढिग होता की काहींना चप्पल ठेवलायला वेगळं कपाटच बनवून घ्यावं लागतं. जर एक माणूस चप्पलचे एवढे जोड वापरत असेल तर कल्पना करा जगभरात चप्पलचे किती जोड वापरले जात असतील. आता हे गणित काही हातांच्या बोटांवर मोजणे शक्य नाही. पण याची आणखी एक वेगळी बाजू कदाचित तुम्हाला माहिती नसेल. या चप्पलमुळे कचऱ्यात आणखी भर पडत चालली आहे. दरवर्षी जसा लाखो टन प्लॅस्टिकचा कचरा तयार होतो, तसा लाखो करोडो टन जुन्या चप्पलचाही कचरा तयार होतो.
तेव्हा दोन भारतीय तरूणांनी या जुन्या चप्पलचा पुनर्वापर करून टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही जोड तयार केले आहेत. या तरूणांचे नाव श्रीयांस भंडारी आणि रमेश धामी. ‘ग्रीनसोल’ ही त्यांची संस्था. टाकाऊ चप्पलपासून ही संस्था नवीन, टिकाऊ अशा चप्पल तयार करते. विशेष म्हणजे गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी या चप्पल तयार करण्यात येतात. तसेच या चप्पल परवडणाऱ्या दरातही बाजारात उपलब्ध आहेत. २०१३ पासून या दोन्ही मित्रांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. देशातल्या कानाकोपऱ्यातून ते जुन्या, टाकाऊ चप्पल गोळा करतात आणि त्यापासून नवीन चप्पल तयार करतात. या दोन मित्रांच्या अनोख्या उपक्रमाचे रतन टाटांपासून अमेरिकेच्या माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामांपर्यंत सगळ्यांनीच कौतुक केलं आहे.
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.
First Published on May 11, 2017 1:12 pm
Web Title: Greensole Refurbishes Old Shoes And Make New Shoes For Needy School Kids