Thursday, 11 May 2017

गरजू मुलांसाठी त्या दोघांनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ चप्पल. श्रीयांस भंडारी आणि रमेश धामी. ‘ग्रीनसोल’.



Thanks to Loksatta
पूर्वी वापरायला चप्पलचा एक जोड लोकांना मिळायचा नाही, पण आता मात्र प्रत्येकांकडे किमान दोन जोड तरी असतातच. ही संख्या वाढतही जाऊ शकते. म्हणजे बघा ना घरी घालायची चप्पल वेगळी, ऑफिसमध्ये बूट, जिमिंगसाठी शूज, ड्रेसवर सँडल किंवा हायहिल्स वगैरे वगैरे. या चप्पलचा घरात एवढा ढिग होता की काहींना चप्पल ठेवलायला वेगळं कपाटच बनवून घ्यावं लागतं. जर एक माणूस चप्पलचे एवढे जोड वापरत असेल तर कल्पना करा जगभरात चप्पलचे किती जोड वापरले जात असतील. आता हे गणित काही हातांच्या बोटांवर मोजणे शक्य नाही. पण याची आणखी एक वेगळी बाजू कदाचित तुम्हाला माहिती नसेल. या चप्पलमुळे कचऱ्यात आणखी भर पडत चालली आहे. दरवर्षी जसा लाखो टन प्लॅस्टिकचा कचरा तयार होतो, तसा लाखो करोडो टन जुन्या चप्पलचाही कचरा तयार होतो.
तेव्हा दोन भारतीय तरूणांनी या जुन्या चप्पलचा पुनर्वापर करून टिकाऊ आणि पर्यावरणस्नेही जोड तयार केले आहेत. या तरूणांचे नाव श्रीयांस भंडारी आणि रमेश धामी. ‘ग्रीनसोल’ ही त्यांची संस्था. टाकाऊ चप्पलपासून ही संस्था नवीन, टिकाऊ अशा चप्पल तयार करते. विशेष म्हणजे गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी या चप्पल तयार करण्यात येतात. तसेच या चप्पल परवडणाऱ्या दरातही बाजारात उपलब्ध आहेत. २०१३ पासून या दोन्ही मित्रांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. देशातल्या कानाकोपऱ्यातून ते जुन्या, टाकाऊ चप्पल गोळा करतात आणि त्यापासून नवीन चप्पल तयार करतात. या दोन मित्रांच्या अनोख्या उपक्रमाचे रतन टाटांपासून अमेरिकेच्या माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामांपर्यंत सगळ्यांनीच कौतुक केलं आहे.
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.
First Published on May 11, 2017 1:12 pm
Web Title: Greensole Refurbishes Old Shoes And Make New Shoes For Needy School Kids

No comments:

Post a Comment