Tuesday, 20 March 2018

*_लेखक - श्रीराम दांडेकर* : समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण

*🤔😤 येत्या दहा/ पंधरा वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी सत्य आहे, कारण जगरहाटी कोणी थांबवू शकत नाही.*

*या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे , पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे , फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे., मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे.*

*अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे , स्वतःची गैरसोय असूनही पाहुणे मंडळींच पाहुणचार करणारे, पर्यटनाबरोबरच तीर्थयात्रा करणेही न विसरणारे ,आपापले सण लक्षात ठेवून साधेपणे साजरे करणारे, अमावस्या, एकादशी, अधिक महिना लक्षात ठेवणारे, भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी त्याच्यावर सोडणारे (आणि त्यामुळे कठीण परिस्थितीतही मनःस्वास्थ्य टिकवणारे ). व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा, तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे आणि फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि गरजेपुरतेच अन्न खाणारे.*

*असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. आपल्या आजूबाजूला किंवा घरात असे कोणी असतील तर त्याची चौकशी करा, काळजी घ्या. कारण ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबर जाईल.*

*समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण जगातून नाहीशी होईल. त्यानंतर फक्त राहील,,,,,,, स्वार्थ, अविश्वास, चैन , असंवेदनशील मने , भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे अगत्य !!!!!*  😩😢

*_लेखक - श्रीराम दांडेकर_*

Tuesday, 13 March 2018

नाटक: सोळा एके सोळा लेखक:विवेक बेळे , Must see पाहिलेच पाहीजे असे नाटक

नाटक: सोळा एके सोळा
लेखक:विवेक बेळे
Impression : Must see पाहिलेच पाहीजे असे नाटक.
11 मार्च ला बालगंधर्व ला पाहिले.


एकीकडे tv serials ला चिकटलेले प्रेक्षकवर्ग तुझ्यातजीव रंगला
दुसरीकडे उघडा सलमान व दिपीका कतरीना यांच्या चित्रपटाचे आकर्षण सोडून नाटकासाठी प्रेक्षक खेचणे हे आव्हान आहे,त्यातच bold web serials पहाणा-यांना खेचून नाटकाला आणायचं म्हणजे नाटकातही bold element हवा.

अशात प्रेक्षकांना जास्त "नाटकळत" न ठेवता लेखक विवेक बेळे, दिग्द. , निर्माते यांनी है नवीन नाटक आणले आहे.

नाटकळत  !!! नवीन शब्द, वाह वाह.
बेळेंचाच शब्द,प्रेक्षकांना नाटकळत ठेवू नका...

निशा,तिचा  पो कमीश्नर बाप/निशाचा bfअनीकेत/न दिसलेली अनिकेतची आई व निशाची rival भूमी.
स्टोरी सांगून रसभंग करण्याचे पाप मी करणार नाही,
आजकाल घरोघरी असतं तेच टीनएजर्स / friendship/ facebook/ mobile chatting/fb breakup /लोक काय म्हणतील?? मोबाईलला चिकटून रहाणे आणि पालकांनी चिंताक्रांत होणे वगैरे.

म्हणजे तेच आलू टमाटर प्याज पण
treatment वेगळी,
म्हणूनच dish  वेगळी , चटकदार, खमंग व मस्त.

आजकालच्या मुली आरशात पाहिल्यासारखे दुस-यांच्या मतामधे स्वत:ची प्रतिमा बघतात,त्यामुळे त्या fb च्या likes dislikes व comments ला अवास्तव महत्व प्राप्त झालयं.
रात्रीबेरात्री मोबाईलमधे मित्रमैत्रीणी आपल्याविषयी काय म्हणताहैत हे चेक करणाररे मुलं पाहून पालक अस्वस्थ होऊन मोबाईल काढून घ्यावा म्हंटले तर
ते ही अशक्य झालय.


काय संवाद आहे हा,

" प्रेक्षक जेव्हा डोळ्यात प्राण आणून नाटक बघतात, तेव्हा नाटककार / director यांना वेगळाच high येतो,
तो intemacy पेक्षाही उच्च असतो."





विवेक बेळे प्रेक्षकांची नस जाणतात हे माहिती होते पण ते एवढा तर्कशुध्द  interestingव कल्पक analysis करु शकतात हे माहीत नव्हते !

नाटक जोरात चाललयं हे प्रतिकात्मक दाखवण्यासाठी चक्क car चा speedometer दाखवण्याची त्यांची idea कसली भन्नाट आहे,त्यामुळे कुठे नाटकाने वरचा gear टाकलाय व भरधाव वेग घेतलाय,प्रेक्षक गुंतत गेलाय हे कळते.

70% प्रेक्षक स्त्रिया असतात,त्या तिकिट काढतात म्हणून पुरुष नाटकाला येतात,बसल्यावरही नाटक  कुठले माहित नसते,तिकीटावर नाव वाचतात.

दिग्दर्शकाला प्रेक्षकांतला एक sample प्रेक्षक पाहिजे असतो म्हणजे लोकांच्या सरासरी  आवडीनिवडीचा लिटमसपेपर टेस्ट  करुन त्या sample subject कडे सातत्याने monitor करुन त्याप्रमाणे स्टेज वरील नाटक live कमी जास्त edit करायचं ही theme.
(या आधी कुणीच असा विचार केला नसावा.)

ज्याप्रमाणे एकादा detective समोरच्याची हालचाल व देहभाषेवरुन त्याच्या मनात काय चाललय व कृती काय असेल याचे ठोकताळे बांधतो तसैच किंवा त्याहीपेक्षा सरस पद्धतीने दिग्दर्शक प्रेक्षकाच्या reaction चा अंदाज व्यक्त करतो ,आनंद इंगळेने ते अफलातून व्यक्त केलेय.

"नाटक हे प्रेक्षकाला अंधारात ठेवून सादर करण्याची कला आहे"

"शेवटचा सीन लिहितांना नाटककाराने त्याचे पावित्र जपलेच पाहिजे"

"शेवट लिहीतांना लेखकाच्या डोळ्यात पाणी आले नाही तर प्रेक्षकांकडून काय अपेक्षा करणार"

हे संवाद चमकदार तर आहे पण बेळे यांची नाटकावर असलेली कमालीची निष्टा दाखवते.

नाटक पडले तर पडू दे म्हणणा-या लेखीके ला,
"तसं बोललीस तर थोबाड फोडीन"
म्हणणारा मनस्वी दिग्दर्शक,
" थेअटरमधल्या रिकाम्या खुर्च्या पाहतांना काय होतं ते मी अनुभवलय"
हे ही सांगतो.


एक शेवट दाखवून नंतर अनेक वेगळ्या शक्यता दाखवतांना ते प्रेक्षकांना भूलभूलैय्यात टाकून नाटकात twist हुकूमी आणू शकतो याची प्रचिती देतात.

सर्व कलाकारांनी सुंदर काम केलय.
Especially आनंद इंगळे अगदी छा गये है, दिग्दर्शक व लेखक यांना काय पाहिजे ते, ते अचूक पोचवतात,आनंद च्या timing व पंचेस ला प्रेक्षकांनी instant दाद दिली.

हा सर्व वेगळाच form आहे.
its like making of a नाटक.

interval मधे वडा खातांना मी बायकोजवळ चिंता व्यक्त केली,
हे नाटक analytical आहे, बौद्धीक चाल,प्रतिचाल आहे,प्रेक्षक कसे receive करतील?
इतके हुशारीने लिहीलेल्या, direct केलेल्या, सादर केलेल्या नाटकाला जर कोमट टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर मला ते आवडणार नाही.

नाटकाच्या शेवटी कडक टाळ्यांची पावती देत प्रैक्षकांनी मला खोटं ठरवलं !
मला आवडलं ते!!






Tuesday, 6 March 2018

आनंद कल हो ना हो....

आनंद कल हो ना हो....

(लेखाचा उद्देश आपण वर्षानुवर्ष जे काही वाचतो व विसरतो, त्याचे conclusive सारांशरुप पहाणे,विचार व कृतीस प्रवृत्त करणे हा आहे)

पुर्वीचा मूव्ही 'आनंद' व हल्लीचा 'कल हो ना हो' मधे हिरो कँसरग्रस्त दाखवलेत.
आम्हाला एक संदेश कळला की जिंदादिल जगायचं असतं.

पण आम्हाला हा संदेश कळला नाही कि कँसर होण्याची कारणे काय,कँसर होऊ नये म्हणून जिवनशैलीत काय बदल करायला पाहिजेत.

का?

कारण हा रोग दुस-या कुणाला तरी होतो,आमचा काही संबंध नाही.

हॅलो,असा विचार करणे म्हणजे वाघ दिसल्यावर वाळूत तोंड खुपसणा-या शहामृगासारखे ठरेल,आणि आता वाघ दिसत नाही म्हणजे तो नाही असे समजणा-या शहामृगासारखे ठरेल.

आमच्या employer कंपनीने आम्हाला एक पुस्तक दिले,

Never be sick again
Health is a choice, learn how to choose it

by Reymond Francis

Title वाचून मी थक्क झालो,कुणी इतक्या खात्रीने कसे सांगू शकतो,

मी ते पुस्तक वाचले ( i was deeply absorbed in that book)

त्यात त्यांनी हेच सांगीतलेय कि आपण म्हणजे आपल्या पेशी.
पेशींना nutrition मिळेल तेच खा.

सर्वांला हे माहितच आहे की  (गर्भावस्थेपासून) पेशींचे सतत विभाजन होते,नविन पेशी जन्माला येतात. या अर्थाने काही आठवड्यांनंतर आपण संपूर्णपणे नवीन असतो (तरीही जुन्याच नावाने ओळखले जातो !! jokes apart)

नवीन पेशी ही जुन्या पेशीची डिट्टो काॅपी असावी लागते,त्यात सर्व प्रोग्रॅम पास आॅन ,हस्तांतरीत होतो.
यातील माहिती किती टेराबाईट असेल याची आपण तुच्छ मानव कल्पना करु शकत नाही, कारण माहीती फक्त तुमचीच नसून तुम्हारे बापजादे आणि त्यांचे पूर्वज यांचीही असते !
(new addition :One sperm cell contains 37.5 MB of DNA information, and one ejaculation is equivalent to transmitting 57.9 GB of information (a total of 62 MacBook Pro laptops).from Quoraanswer)

म्हणून तर आपण म्हणतो ,
"पोरीने डोळे अगदी so and so यांचे घेतलेत"
किंवा
" तू कोकणस्थ आहेस हे नको सांगू, ते चेह-यावर दिसतेच आहे"

ही वरकरणी दिसणारी माहिती, आत असणा-या अनंत माहीतीत,
"पेशींनो आता मरा !"
ही देशील instruction असते.

आणि ज्या पेशी बगावत करतात,"मरत नाही जा" म्हणतात,
तिथचं समस्या सुरु होते.
मग कँसर ची गाठ आणि वेगाने वाढ.

वर म्हटल्याप्रमाणे सतत विभाजन होते,नविन पेशी जन्माला येतात आणि
xerox copy defective आली तर पेशीतला प्रोग्रॅमही भ्रष्ट स्वरुपात हस्तांतरीत होतो,आणि मग अशा बंडखोर पेशी जन्माला येतात आणि अनिर्बंध वाढतात.

कँसर प्राचीन आहे,
पुर्वी लोक साथींच्या आजाराने,क्षय,मलेरीया अशा रोगांनी अल्पायुषातच मरायची,त्यामुळे कँसरला संधीच मिळायची नाही.

मी internet वर डायनासोर ला cancer झाल्याचे जिवाश्म fossil बद्दल माहीती नजरे खालून गेल्याचे मला चांगलं आठवतय.


आधूनिक कँसरची कारणे काय असावीत
* pestcides कीडनाशकांचा अतीवापर.
हरीतक्रांती ( लोकसंख्यावाढ ला उत्तर)
अन्नाचे उत्पादन वाढवण्यासाठी हे करावेच लागले.

अन्नातून आपल्या पोटात pesticides जातात.
काही pesticides पाण्यातून झीरपत drinking water source मधे जातात.
कालांतराने आपल्या पेशींचा प्रोग्रॅम हलवतात.

Living greens organics, jaipur
ह्या टेरेस गार्डन किट supply करणा-या कंपनीच्या intetveiw मधे त्यांनी स्पष्ट सांगीतले कि नातेवाईकांचे कँसर ने मृत्यू पाहिल्यावरच त्यांना टेरेस गार्डन किट supply चा व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली.

http://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-dr-arjun-kumbhar-article-100748


* रंग / preservatives / additives
प्रक्रियाकेलेले अन्न आकर्षक दिसण्यासाठी हे उत्पादक वापरतात, त्यानेच उत्पात होतो.
यात कोल्ड्रींक्र आलीच.

* जिवनशैली : उशीरा पर्यंत जागणे, मध्यरात्री खाणे, वेग अडवणे (बराच वेळ  वाॅशरुम ला न जाणे), उशीरा उठणे, सतत भयग्रस्त वा संतप्त /उद्वीग्न रहाणे, सतत इर्शा,जलन,उशीरा पार्टीज करणे, प्रमाणाबाहेर drinks घेणे, तंबाखू सेवन वगैरे वगैरे वगैरे.


* अनुवंशीकता heridity

http://m.lokmat.com/nagpur/one-lakh-fifty-thousand-patients-breast-cancer-2015/



* मी drive करतांना रेडीओवर ऐकले,
एका आयुर्वेदतज्ज्ञाची मुलाखत सुरु होती, ते म्हणाले,
" हल्ली काही आजार कँसर मधे "परिवर्तीत" transforming होत आहेत, उदा. मधूमेह,"
दुर्दैवाने पूर्ण मुलाखत ऐकू शकलो नाही.

ही नवीनच माहिती मिळाली.

* तणाव stress
( माहितीच्या अतीरेकाने देखील काहींना तणाव येऊ शकतो.
म्हणून junk food जसे आरोग्याला घातक आहेत तसेच junk news देखील आरोग्याला घातक आहेत हा माझा original विचार आहे.खुशाल timesofindia app delit करा )

तणाव हा आधुनिक जिवनाचा अविभाज्य भाग झालाय.
आॅफिसमधला deadlines चा तणाव समजू शकतो.
विद्यार्थ्यांना अभ्यास,परिक्षा,admission,प्रवास, interveiws, carrier, jobs चा तणाव असतो.( hormons changes चा तणाव वेगळाच)
घरातही सास- बहू तणाव असतोच.
आर्थीक तणाव,बजेट ची जुळवाजुळवी.

हा कबख्त तणाव शरीराची केमीस्ट्री बिघडवतो, मुन्नाभाई म्हणतो तसा "केमीकल लोच्या" निर्माण करतो.

 Problems पासून पळण्यासाठी काहीजण शराब जवळ करतात, liver overtime काम करते, शेवटी काम न झेपल्याने enlarged liver / fatty liver वगैरेप्रकार निर्माण होतात.

आता मला माझ्या original phylosophy विचाराबद्दल सांगायचं आहे,
ह्याला मी नाव दिलय,
" Please Open windows,
let wind flow,
let sun shine "

मी एकदा मुलांच्या रुम मधे बघितलं तर
खिडक्या बंद होत्या,
अंधारहोता म्हणून (दिवसा) lights लावले होते.
गरम होते म्हणून पंखा व AC सुरु होता.
मी पडदे सारले,खिडक्या उघडल्या तर रुम सुंदर प्रकाशाने उजळून निघाली, शुध्द हवेच्या झूळकेमुळे प्रसन्न झाली.
lights, पंखा, AC बंद करावे लागले.

हे पाहूनच मला वरील phylosophy सुचली.

Now we will globalize above phylosophy...

शहरात काय होतय,
कचरा वाढतोय,अस्वच्छता वाढतीय,
त्याला लागून रोग वाढताहेत
हा कचरा दुसरीकडे,दुस-या गावात  (उरळीकांचन)* नेऊन टाकतात,
का?
तेथे रहाणारी माणसं नाहीत का?

माॅल मधलं शाॅपींग किंवा pizza घरी मागवला तरी पॅकींग चा खूप कचरा घरी येतो, ( लोकांना आकर्षक पॅकींग मुळे प्राॅडक्ट खरेदी करण्याची भूल पडते)
ही शाॅपींग टाळली व आठवडे बाजारात कापडी पिशवी नेऊन शाॅपींग केली तर बरेचसे कच-यावर नियंत्रण मिळेल असे वाटते.

या कच-याची विल्हेवाट कशी लावायची?हा मोठा प्रश्ण आहे.
थर्मोकोल,पॅकींगप्लॅस्टीक ची विल्हेवाट कशी लावायची हे मी सांगू शकत नाही.

पण ओला कचरा,अन्न व किचनवेस्ट प्रत्येकाने घरी कंपोस्ट युनिट केलेच पाहिजे.त्याला जोडून टेरेस गार्डन असावी म्हणजे कंपोस्ट खताचा वापर व घरची भाजी मिळेल.
pesticides मधून काहीअंशी सुटका मिळेल.
यातून खूप उर्जेची बचत होईल.
( जशी वरील lights, पंखा, AC बंद केल्यामुळे झाली)

कँसर वर preventive उपाय काय असू शकतो?

एक सांगावसं वाटतं, आम्हाला complicated ideas चांगल्या कळतात,
पण सोप्या गोष्टी कळत नाहीत !!
Its too simple to understand.

माझ्या मते ज्ञान हे मर्यादित असते,
आणि माहीती अमर्याद असते.
तर माहीती information च्या महापुरा वाहून जाऊ नका.

शाळेत शिकलो ते च ज्ञान वापरु या.
1.पाणी भरपूर पिणे
2. रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर जागे होणे.
3. थोडा व्यायाम करणे, 24 तासात 24 मिनीटे तरी brisk walking करणे.
4. साधा आहार घेणे.
    back to भाजी भाकरी.
ऋजूता दिवेकर म्हणते जे तुमची आजी खात होती तेच खा ( bcoz you are genetically designed for it)

आहारात carbohydrates कमी करुन proteins वाढवा.
साखर बंद करा कारण साखर कँसर ला पोसते अशी एक विचारधारा आहैे.

5. ताण तणावांचे नियोजन करा.

6. परफेक्शनीस्ट चा नाद सोडा.
    Even God is not perfect
    असं सुश्मीता म्हणालीय, डोळ्यातल्या minor squint वर इलाज करणार नाही कारण देवही परफेक्ट नाही व हिच त्याची सुंदरत: आहे.

7. लोग क्या सोचेंगे ?
हा विचार मनातुन काढा, कुणालाही तुमचा विचार करायला वेळ नाहीये.

शायर म्हणतात,

दुनिया के निगाहोंमें,
भला क्या है बुरा क्या,
ये बोझ अगर दिल से,
उतर जाये तो अच्छा.

8.नियमीत medical check up.

9. Last but not least,
   छंद hobby जोपासा,
   anything जे तुम्हाला आनंद देते,
    त्यासाठी वेळ काढा च.
वाचकहो आपणास काही additions सुचवायचे असतील तर please feel free to suggest, i will add it in this post.

 Life's Good.
 Live to the fullest.

New addition :
Kerala's noted oncologist and Dr. P.V. Gangadharan, who is fondly referred to as ‘Saint with a Stethoscope’ says:

(1) Avoid sugar. Cancer does not spread without sugar. Cancer will die on its own without sugar.

(2) Take a full lime and squeeze it into luke warm water. Take this for one to three months before breakfast. Maryland college of medicine says this is 1000 times more effective than chemotherapy.

(3) Take three spoons of organic or virgin coconut oil early morning and in the night to keep cancer at bay.

Make one of these choices, but be sure to avoid sugar.

I have been trying to spread this message for the last two years. Be sure to forward this important message. Avoid cancer.
Dr. P. V. Gangadharan
https://www.google.co.in/amp/s/www.deccanchronicle.com/amp/lifestyle/viral-and-trending/010717/a-road-less-travelled.html



Saturday, 3 March 2018

Seed infosys institute ?



येवोत द्रोणाचार्य कितीही,
काळ आता डरणार नाही,
दान आता अंगठ्याचे,
यापुढे करणार नाही !


Sinhgad institute ची कथा आपण पेपर मध्ये वाचतोच आहोत.
शिक्षक/ प्रोफेसर्स/ स्टाफ चा पगार सव्वा वर्षापासून दिला नाही, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय वगैरे...


मी Python (programing language) शिकण्यासाठी Seed infotech मधे admission घेतली, Rs.12,000/--- भरले.

Sat- sun असा weekend (9:00 am ते 04:00 pm) तीन weekend classes होते.
काल ,Saturday ला 9:30 am ते 01:00 pm C and C++ revision घेतली, okay.

उद्याचा class बद्दल sms करुन सांगू म्हणाले.
संध्याकाळी sms आला,

Hi Student,
There will be off tmrw for Ur Python Weekend batch.
Thanks.
- Yogesh, SEED.

मी संतापलो,जर तुमच्या कडे faculties नव्हत्या तर course सुरु का केला??

मी Seed infosys institute ? मध्ये गेलो, noise केला, refund मागीतला.

त्यांनी टोलवाटोलवी केली,शेवटी तुषार (coordinater) ला भेटलो, त्याला स्पष्ट सांगीतले मला Seed बद्दल respect होता म्हणून मी शिकण्यासाठी आलो, but Im disapponted, Seedinfotech पण सिंहगड institute सारखी सडली आहे का?
मला course certificate च्या कागदामधे interest नाही,शिकण्यामधे आहे.

त्याने उद्या दुस-या batch मधे accomodate करतो सांगितले,
मी Sunday 4 march 2018 ला  9.00 to 10:00 am थांबून वाट पाहीली, python class चे कोणीही आले नाही.

आता मला सिंहगड institute मध्ये विद्यार्थ्यांना कसे वाटत असेल याचा अनुभव आला.

शिक्षणमहर्षी तुम्हाला शिक्षण देण्यासाठी बसले नसून धंदा करण्यासाठी बसले आहेत.

गंदा है पर,
धंदा है यह !!

तुमच्याकडून fees घेऊन ते पैसे इतरत्र जमीनीत गुंतवणे,नवीन institute काढणे,शिक्षक / विद्यार्थी बसू दे बोंबलत,ते काहिही करु शकत नाहीत हा आत्मविश्वास शिक्षणमहर्षींना असतो.

उपाय : विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा एकलव्य बना.
online ढीगभर paid corses आहेत, ते घ्या, शक्य असेल ते download करा म्हणजे offline आपल्याला suitable त्या वेगाने अभ्यास करा, स्वत: च्या notes काढा. शक्य असेल ती परिक्षा external द्या.
Teaching is learning !!
एखादा विषय इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करा,शिकणारा अनेक प्रश्न उपस्थित करेल,त्याची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला अजून अभ्यास करावा लागेल.
interveiw ला जा.
कमी पगारात काम मिळवा,काम शिकून घ्या,job hopping करा.
एकदा काम चांगले करता आले की मोबदला हक्काने वाढवून मागा.
"हकसे मांगो.
काम मात्र जीव तोडून करा.''

शक्य असल्यास contracter बना, स्वयंउद्योजक बना.