Saturday, 3 March 2018

Seed infosys institute ?



येवोत द्रोणाचार्य कितीही,
काळ आता डरणार नाही,
दान आता अंगठ्याचे,
यापुढे करणार नाही !


Sinhgad institute ची कथा आपण पेपर मध्ये वाचतोच आहोत.
शिक्षक/ प्रोफेसर्स/ स्टाफ चा पगार सव्वा वर्षापासून दिला नाही, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय वगैरे...


मी Python (programing language) शिकण्यासाठी Seed infotech मधे admission घेतली, Rs.12,000/--- भरले.

Sat- sun असा weekend (9:00 am ते 04:00 pm) तीन weekend classes होते.
काल ,Saturday ला 9:30 am ते 01:00 pm C and C++ revision घेतली, okay.

उद्याचा class बद्दल sms करुन सांगू म्हणाले.
संध्याकाळी sms आला,

Hi Student,
There will be off tmrw for Ur Python Weekend batch.
Thanks.
- Yogesh, SEED.

मी संतापलो,जर तुमच्या कडे faculties नव्हत्या तर course सुरु का केला??

मी Seed infosys institute ? मध्ये गेलो, noise केला, refund मागीतला.

त्यांनी टोलवाटोलवी केली,शेवटी तुषार (coordinater) ला भेटलो, त्याला स्पष्ट सांगीतले मला Seed बद्दल respect होता म्हणून मी शिकण्यासाठी आलो, but Im disapponted, Seedinfotech पण सिंहगड institute सारखी सडली आहे का?
मला course certificate च्या कागदामधे interest नाही,शिकण्यामधे आहे.

त्याने उद्या दुस-या batch मधे accomodate करतो सांगितले,
मी Sunday 4 march 2018 ला  9.00 to 10:00 am थांबून वाट पाहीली, python class चे कोणीही आले नाही.

आता मला सिंहगड institute मध्ये विद्यार्थ्यांना कसे वाटत असेल याचा अनुभव आला.

शिक्षणमहर्षी तुम्हाला शिक्षण देण्यासाठी बसले नसून धंदा करण्यासाठी बसले आहेत.

गंदा है पर,
धंदा है यह !!

तुमच्याकडून fees घेऊन ते पैसे इतरत्र जमीनीत गुंतवणे,नवीन institute काढणे,शिक्षक / विद्यार्थी बसू दे बोंबलत,ते काहिही करु शकत नाहीत हा आत्मविश्वास शिक्षणमहर्षींना असतो.

उपाय : विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा एकलव्य बना.
online ढीगभर paid corses आहेत, ते घ्या, शक्य असेल ते download करा म्हणजे offline आपल्याला suitable त्या वेगाने अभ्यास करा, स्वत: च्या notes काढा. शक्य असेल ती परिक्षा external द्या.
Teaching is learning !!
एखादा विषय इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करा,शिकणारा अनेक प्रश्न उपस्थित करेल,त्याची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला अजून अभ्यास करावा लागेल.
interveiw ला जा.
कमी पगारात काम मिळवा,काम शिकून घ्या,job hopping करा.
एकदा काम चांगले करता आले की मोबदला हक्काने वाढवून मागा.
"हकसे मांगो.
काम मात्र जीव तोडून करा.''

शक्य असल्यास contracter बना, स्वयंउद्योजक बना.

No comments:

Post a Comment