Tuesday, 13 March 2018

नाटक: सोळा एके सोळा लेखक:विवेक बेळे , Must see पाहिलेच पाहीजे असे नाटक

नाटक: सोळा एके सोळा
लेखक:विवेक बेळे
Impression : Must see पाहिलेच पाहीजे असे नाटक.
11 मार्च ला बालगंधर्व ला पाहिले.


एकीकडे tv serials ला चिकटलेले प्रेक्षकवर्ग तुझ्यातजीव रंगला
दुसरीकडे उघडा सलमान व दिपीका कतरीना यांच्या चित्रपटाचे आकर्षण सोडून नाटकासाठी प्रेक्षक खेचणे हे आव्हान आहे,त्यातच bold web serials पहाणा-यांना खेचून नाटकाला आणायचं म्हणजे नाटकातही bold element हवा.

अशात प्रेक्षकांना जास्त "नाटकळत" न ठेवता लेखक विवेक बेळे, दिग्द. , निर्माते यांनी है नवीन नाटक आणले आहे.

नाटकळत  !!! नवीन शब्द, वाह वाह.
बेळेंचाच शब्द,प्रेक्षकांना नाटकळत ठेवू नका...

निशा,तिचा  पो कमीश्नर बाप/निशाचा bfअनीकेत/न दिसलेली अनिकेतची आई व निशाची rival भूमी.
स्टोरी सांगून रसभंग करण्याचे पाप मी करणार नाही,
आजकाल घरोघरी असतं तेच टीनएजर्स / friendship/ facebook/ mobile chatting/fb breakup /लोक काय म्हणतील?? मोबाईलला चिकटून रहाणे आणि पालकांनी चिंताक्रांत होणे वगैरे.

म्हणजे तेच आलू टमाटर प्याज पण
treatment वेगळी,
म्हणूनच dish  वेगळी , चटकदार, खमंग व मस्त.

आजकालच्या मुली आरशात पाहिल्यासारखे दुस-यांच्या मतामधे स्वत:ची प्रतिमा बघतात,त्यामुळे त्या fb च्या likes dislikes व comments ला अवास्तव महत्व प्राप्त झालयं.
रात्रीबेरात्री मोबाईलमधे मित्रमैत्रीणी आपल्याविषयी काय म्हणताहैत हे चेक करणाररे मुलं पाहून पालक अस्वस्थ होऊन मोबाईल काढून घ्यावा म्हंटले तर
ते ही अशक्य झालय.


काय संवाद आहे हा,

" प्रेक्षक जेव्हा डोळ्यात प्राण आणून नाटक बघतात, तेव्हा नाटककार / director यांना वेगळाच high येतो,
तो intemacy पेक्षाही उच्च असतो."





विवेक बेळे प्रेक्षकांची नस जाणतात हे माहिती होते पण ते एवढा तर्कशुध्द  interestingव कल्पक analysis करु शकतात हे माहीत नव्हते !

नाटक जोरात चाललयं हे प्रतिकात्मक दाखवण्यासाठी चक्क car चा speedometer दाखवण्याची त्यांची idea कसली भन्नाट आहे,त्यामुळे कुठे नाटकाने वरचा gear टाकलाय व भरधाव वेग घेतलाय,प्रेक्षक गुंतत गेलाय हे कळते.

70% प्रेक्षक स्त्रिया असतात,त्या तिकिट काढतात म्हणून पुरुष नाटकाला येतात,बसल्यावरही नाटक  कुठले माहित नसते,तिकीटावर नाव वाचतात.

दिग्दर्शकाला प्रेक्षकांतला एक sample प्रेक्षक पाहिजे असतो म्हणजे लोकांच्या सरासरी  आवडीनिवडीचा लिटमसपेपर टेस्ट  करुन त्या sample subject कडे सातत्याने monitor करुन त्याप्रमाणे स्टेज वरील नाटक live कमी जास्त edit करायचं ही theme.
(या आधी कुणीच असा विचार केला नसावा.)

ज्याप्रमाणे एकादा detective समोरच्याची हालचाल व देहभाषेवरुन त्याच्या मनात काय चाललय व कृती काय असेल याचे ठोकताळे बांधतो तसैच किंवा त्याहीपेक्षा सरस पद्धतीने दिग्दर्शक प्रेक्षकाच्या reaction चा अंदाज व्यक्त करतो ,आनंद इंगळेने ते अफलातून व्यक्त केलेय.

"नाटक हे प्रेक्षकाला अंधारात ठेवून सादर करण्याची कला आहे"

"शेवटचा सीन लिहितांना नाटककाराने त्याचे पावित्र जपलेच पाहिजे"

"शेवट लिहीतांना लेखकाच्या डोळ्यात पाणी आले नाही तर प्रेक्षकांकडून काय अपेक्षा करणार"

हे संवाद चमकदार तर आहे पण बेळे यांची नाटकावर असलेली कमालीची निष्टा दाखवते.

नाटक पडले तर पडू दे म्हणणा-या लेखीके ला,
"तसं बोललीस तर थोबाड फोडीन"
म्हणणारा मनस्वी दिग्दर्शक,
" थेअटरमधल्या रिकाम्या खुर्च्या पाहतांना काय होतं ते मी अनुभवलय"
हे ही सांगतो.


एक शेवट दाखवून नंतर अनेक वेगळ्या शक्यता दाखवतांना ते प्रेक्षकांना भूलभूलैय्यात टाकून नाटकात twist हुकूमी आणू शकतो याची प्रचिती देतात.

सर्व कलाकारांनी सुंदर काम केलय.
Especially आनंद इंगळे अगदी छा गये है, दिग्दर्शक व लेखक यांना काय पाहिजे ते, ते अचूक पोचवतात,आनंद च्या timing व पंचेस ला प्रेक्षकांनी instant दाद दिली.

हा सर्व वेगळाच form आहे.
its like making of a नाटक.

interval मधे वडा खातांना मी बायकोजवळ चिंता व्यक्त केली,
हे नाटक analytical आहे, बौद्धीक चाल,प्रतिचाल आहे,प्रेक्षक कसे receive करतील?
इतके हुशारीने लिहीलेल्या, direct केलेल्या, सादर केलेल्या नाटकाला जर कोमट टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर मला ते आवडणार नाही.

नाटकाच्या शेवटी कडक टाळ्यांची पावती देत प्रैक्षकांनी मला खोटं ठरवलं !
मला आवडलं ते!!






No comments:

Post a Comment