Monday, 25 June 2018

पूजा एक उपचार कि आनंदोत्सव ?







अध्याय 9,श्लोक 26



पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति |

तदहं भक्तयुपहृतमश्र्नामि प्रयतात्मनः ||




पत्रम् – पत्ती; पुष्पम् – फूल; फलम् - फल; तोयम् – जल; यः – जो कोई; मे – मुझको; भक्त्या – भक्तिपूर्वक; प्रयच्छति – भेंट करता है; तत् – वह; अहम् – मैं; भक्ति-उपहृतम् – भक्तिभाव से अर्पित; अश्नामि – स्वीकार करता हूँ; प्रयत-आत्मनः – शुद्धचेतना वाले से |

भावार्थ

यदि कोई प्रेम तथा भक्ति के साथ मुझे पत्र, पुष्प, फल या जल प्रदान करता है, तो मैं उसे स्वीकार करता हूँ |


आता यावर माझे interpretation.
पूजा करतो म्हणजे काय करतो आपण?
decoration !
फूलांची सजावट
आणि अगम्य भाषेत बडबडणे...

पूजा केली होती कलावतीदेवींनी..
फूले वाहतांना त्यांनी पाकळ्यांची बाजू मूर्तीच्या बाजूला करुन देठ आपल्याकडे केले होते !
कुणी असे का केले विचारल्यावर
त्या म्हणाल्या
"देवाला देठ टोचतील ना..." !

आहे आपल्यात अशी 'मनाची कोमलता'
जर असेल तर पूजा करा.

स्तोस्त्र...
चापलूसी नाही का ती?
तू छान आहेस
सूंदर आहेस
शक्तीशाली आहेस
आणखी काय काय आहेस

त्यापेक्षा मला तुझ्या सानिध्यात आल्यावर शांतता मिळले,
मी छान होतो
मी सुंदर होतो
संकटं झेलायला,
अपयश पेलायला
मी शक्तीशाली होतो

हे चिंतन (मराठीत) जास्त चांगले नाही का!

अपराधी भावना:
रोज एखादा पूजा करतो
एखादे दिवशी राहिली
तर अपराधी भावना ग्रासते
आता काही वाईट होईल का
मन अशांतीने भरतं
ही पूजा?


पूजा करा
पण ती देवाला नको तर स्वत:ला खूष करण्यासाठी करा.

जे मिळालय त्याबद्दल कृतज्ञता माना,
काही मागण्याचा प्रश्न कुठे येतो,

विवेकानंदांना नोकरी नव्हती,
घरच्या परीस्थितीने गांजून गेले,

रामकृष्णांनी सांगितले,
"जा, पाहिजे ते माग कालीमातेकडे"

विवेकानंद गाभा-यात गेले,
आणि 3 वेळा काही न मागताच परत आले,

चौथ्या वेळा जा असा आग्रह केल्यावर
विवेकानंद म्हणाले,
"एवढ्या मोठ्या शक्तीपुढे स्वत:साठी मागणे फारच तुच्छ वाटत".

So पूजा is time for relaxation.
कर्मकांडात अडकू नका.
अपराधी राहू नका.

करावीशी वाटली तर पूजा ही करा.
तो आनंदोत्सव होऊ दे
उपचार नको.

घाबरु नका
तो भाई (गुंडा नाही)
तो बंधू आहे.सखा आहे

तूम्ही हो बंधू
सखा त्वमेव
त्वमेव सर्वम्
मम देवदेव.

No comments:

Post a Comment