Note :मला शेतीचा काही म्हणजे काहीच अनूभव नाही.
1) SILC सकाळ इंटरनॅशनल लर्नींग सेंटर,पुणे येथे "शेवगा लागवड" हा दोन दिवसांचा कोर्स केला.
2) बहूगुणी शेवगा
3) शेवगा च का ??
उत्तरासाठी पहा video.
https://youtu.be/kdeSgrW4ve4
4) काॅट्रॅक्ट फार्मींग:
आमच्या ओळखीचे स्नेही श्री. करवंदे यांच्या पोलीहाऊस च्या बाजूला 10 गुंठे जागा मोकळी होती.
5) खर्चा चा हिशोब:
a) Rs.56,000/--
b) Rs.2000/-- (JCB)
c)Rs.4800/--
11 July 2019,400 रोपे कांचन नर्सरी (उरळी कांचन) येथून आणली.(shevga :coimbatore pkm1)
d) Rs.1500
आधारासाठी 300 बांबुच्या काठ्या (3feet) आणल्या.
e) Rs.5000/--
Gandulkhat 300 kg Rs 3000
Drip material , rotavetar,etc Rs 2000
f)
g) Rent and maintenance charges for periods October to March are due . The details are as under
Rent Rs 3000 per month
Labor and maint Rs 6000 per month. The total Rs 54000
RS.1,23,300
----------------------------------------
01-Nov-2019
अपेक्षा पेक्षा काहीच वाढ नाही.
शेवग्याला पाणी कमी लागते, पाऊस जास्त झाला हे कारण असावे असे समजून गप्प राहीलो.
--------------------------------------------------
श्री.करवंदे यांनी हरबरा हे आंतरपीक घ्यावे असे सुचवले, yes Try करुया.
----------------------------------------
22-Dec-2019
प्रश्न: शेवगा 6-8 फूट झालाय,शेंडा छाटणी कधी करायची ??please सल्ला द्यावा ही विनंती.
मला वाटतं शेतकामगाराचे हात शेंगेपर्यंत पोचले पाहिजेत,त्यामूळे आताच शेंडे मारावेत(छाटावेत)
-------------------------------------------------
Payment from April To September-2020, 6 months.
Rs 54000 paid on 04- May-2020
आतापर्यंत खर्च : Rs.1,77,300
---------------------------------------------------
07 May 2020
-------------------------
23-July- 2020 photos
आणि हे कोरोना ची जागतिक महामारी आली,
मी आठ महिने परदेशात कामानिमीत्त अडकलो होतो,
श्री.करवंदे यांना दिवाळीत भेटू असे मेसेज दिले होते,
दिवाळीत आलो तर ते अत्यंत आजारी असल्याचे कळले, वाटलं
ते बरे होऊन भेटतील, पण नियतीच्या मनात वेगळेच असावे,
अचानक,श्री करवंदे गेल्याची धक्कादायक बातमी कळली.
ते माझे मित्र,तत्वज्ञ,वाटाड्या होते, god-father होते, त्यांचे शेती व जिवनातील गप्पांबरोबर खूप प्रेरणा मिळत होती.
"उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई,
भेगाळल्या भुईपरी जीणं, अंगार जीवाला जाळी,
भेगाळल्या भुईपरी जीणं, अंगार जीवाला जाळी,
हरवली वाट, दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला"
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला"
अशी मनाची अवस्था झाली, सोन्यासारख्या माणसांना देव का अकाळी नेतो ?!!
पण show must go on या उक्ती प्रमाणे आता त्यांना गुरु मानून एकलव्यासारखं पुढे जायचं ठरवलं आहे.
Payment from April To September-2020, 6 months.
Rs 54000 paid on 04- May-2020
आतापर्यंत खर्च : Rs.1,77,300
Rs 54000 paid on Jan-2021
आतापर्यंत खर्च : Rs.2,31,300
(2 Lakh 31 thousand only)
----------------------------------------------------
12-Feb- 2021
पहिल्यांदा शेवगा शेंगा लागलेल्या दिसताहेत.
2 अडीच किलो असतील का?
आता जरा व्यावहारीक ताळेबंद मांडतोय,
90 झाडं जगलीत.
90 kg जर शेवगाशेंगा मिळाल्या तर
90 * Rs.60 = Rs.5400 मिळतील.
महीन्याला Rs.9000 ( 9 हजार) खर्च करतोय.
शेतीतज्ञांचा सल्ला घेतला पाहीजे.
----------------------------------------------------
12-Feb- 2021
मित्रांना WA post लिहीली.
for my शेवगा adventure,
some product started showing up.
2 kg शेवगा may sell @ Rs.60 / kg
( we buy @ Rs.160/kg, आपल्याला कळत नाही कारण आपण 4-5 च घेतो.)
so i wl get Rs.120
i spent so far Rs.2,30,000
मला शेवगा सव्वा लाख / kg पडतोय
( तेवढ्यात 2 kg चांदी येईल)
बहूत बेइंसाफी है!!
but beer factory also has initial beer cost Rs.20,000 / bottle
later on cost drops to 20 paise.)
मी आता दो राहे वर उभा आहे
यात continue करावे. की झाले तेवढे पुरे म्हणून
कंत्राटी शेतीला good bye रामराम करावे?
-------------------------------------------------
01-March-2021
निर्णय झाला.
stop loss वर शिक्कामोर्तब केले.
आणि ह्या कंत्राटी शेतीतून बाहेर पडलो.
भावना काय आहेत?
ना खेद ना खंत.
जे केले ते सोचसमझकर केले.
400 पैकि 90 झाडं जगली, वाढली.
काही किलो शेंगा हि आल्या. हि यशाची बाजू.
पण शेंगांचं नियोजन, त्या कोवळ्या असतांना काढून बाजारात विक्री करणे, छाटणी करुन फांद्यांना मर्यादेत ठेवणं. सतत नुकसानीत Rs.9000 /महिना खर्च करत रहाणं परवडलं नाही. ही अपयशाची बाजू.
its okay. No worries.
सध्या एवढेच.
------------------------------
Very well written kaka, thank you for the kind words.
ReplyDelete- Ashwin Karvande
I mean it,yr dad was my friend philosopher and guide.
DeleteThank you for reading 💞🙏🏻
Nicely written.Hope current status is good in all aspects.
ReplyDelete