Wednesday, 4 November 2020

rajesh addition to poetry

 नेट प्रॅक्टीस म्हणा,

रियाझ म्हणा, सराव म्हणा,

 मी WA वर जे काव्य मिळते,कल्पकतेला ताण देवून त्या मीटर मधे स्वत: ची भर घालत असतो, असे कितीतरी तयार करुन delit केले.

आता विचार करतोय ,साठवूया. बघा कसं वाटतं.

*ढाई अक्षर* 

ढाई अक्षर का वक्र,

और ढाई अक्षर का तुण्ड।

ढाई अक्षर की रिद्धि,

और ढाई अक्षर की सद्धि।

ढाई अक्षर का शम्भु,

और ढाई अक्षर की सत्ती।



ढाई अक्षर के ब्रह्मा

और ढाई अक्षर की सृष्टि।

ढाई अक्षर के विष्णु

और ढाई अक्षर की लक्ष्मी।

ढाई अक्षर के कृष्ण

और ढाई अक्षर की कान्ता।(राधा रानी का दूसरा नाम)


ढाई अक्षर की दुर्गा

और ढाई अक्षर की शक्ति।

ढाई अक्षर की श्रद्धा

और ढाई अक्षर की भक्ति।

ढाई अक्षर का त्याग

और ढाई अक्षर का ध्यान।


ढाई अक्षर की तुष्टि

और ढाई अक्षर की इच्छा।

ढाई अक्षर का धर्म

और ढाई अक्षर का कर्म।

ढाई अक्षर का भाग्य

और ढाई अक्षर की व्यथा।


ढाई अक्षर का ग्रन्थ,

और ढाई अक्षर का सन्त।

ढाई अक्षर का शब्द

और ढाई अक्षर का अर्थ।

ढाई अक्षर का सत्य

और ढाई अक्षर की मिथ्या।



ढाई अक्षर की श्रुति

और ढाई अक्षर की ध्वनि।

ढाई अक्षर की अग्नि

और ढाई अक्षर का कुण्ड।

ढाई अक्षर का मन्त्र

और ढाई अक्षर का यन्त्र।


ढाई अक्षर की श्वांस

और ढाई अक्षर के प्राण।

ढाई अक्षर का जन्म

ढाई अक्षर की मृत्यु।

ढाई अक्षर की अस्थि

और ढाई अक्षर की अर्थी।


ढाई अक्षर का प्यार

और ढाई अक्षर का युद्ध।

ढाई अक्षर का मित्र

और ढाई अक्षर का शत्रु।

ढाई अक्षर का प्रेम

और ढाई अक्षर की घृणा।


*जन्म से लेकर मृत्यु तक*

*हम बंधे हैं ढाई अक्षर में।*

*हैं ढाई अक्षर ही वक़्त में,*

*और ढाई अक्षर ही अन्त में।*

 *समझ न पाया कोई भी*

*है रहस्य क्या ढाई अक्षर में।*

 🚩भारतीय संस्कृति संघ🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

---------------------------------------------------------

हि घ्या rajesh addition


ढाई अक्षर WA *पोस्ट*

 ढाई अक्षर चा *दोस्त*।

आणि ढाई अक्षर ची *गोष्ट*

 ढाई अक्षर चा *गर्व*

आणि ढाई अक्षर चा *धर्म*

ढाई अक्षर हे *प्रेम*

आणि ढाई अक्षर चे *वर्म*।

ढाई अक्षर हे *कर्म*

आले ढाई अक्षर मधे *सर्व*।


कबीर यांचा दोहा प्रसिद्ध आहे

"पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, 

पंडित भया न कोय,

ढाई आखर प्रेम का, 

पढ़े सो पंडित होय"

ह्याच point वर ह्या post वर *ढाई* अक्षरं (अडीच अक्षरं) घेऊन comments केली असावी असं वाटतं मला.🙏🏻

***********************************************

25-Dec-2020

WA वर ही post पावली,

एक दिवस तु मरशील

सर्व जण रडतील

उद्या सर्व हसतील

परवा पोटभर जेवतील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...* 


एक दिवस पैसा अडका

स्वतः चा कपडा लत्ता

काजु बदाम भत्ता

इथेच सर्व सोडशील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*


एक दिवस सोन्या चांदीने

भरलेली आलमारी

वातानुकूलित चार चाकी

इथेच सर्व सोडुन जाशील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*


एक दिवस बगीचाने

भरलेली तुझी शेती

धान्याने भरलेली पोती

गळ्यातला सोन्याचा मोती

इथेच सर्व सोडुन जाशील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*


एक दिवस तुझा तो 

आलिशान बंगला

सोन्यासारखी बायको

हिर्‍या सारखे पोरं

सर्व इथेच सोडून जाशील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*


*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*

🙏🏻🙏🏻💞🙏🏻🙏🏻


*म्हणून तर स्वत: साठी कघीतरी जगा, मनाला आवडेल तसच वागा*


वाचलं आणि खूप पटलं

स्तब्ध बसलो,

या ओळी लिहील्या


rajesh addition..

होतील धूसर आठवणी
संपतील तुझ्या साठवणी
देवाघरी जेव्हा पाठवणी
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*

तुझं ते गोड हसणं
तुझं ते देखणं दिसणं
होईल सराव तुझं नसणं
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


आठव फक्त पडता दृष्टी
नाही आठवणींची वृष्टी
दृष्टी आड असते सृष्टी
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


जगण्याची असते कमाल
श्वास तोवर च धमाल
धन्याचा आपण हमाल
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


विकेल तुझे सामान
एकदा सुटताच दामन
कसला मान न सन्मान
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


म्हणून ठेव याचे भान
नसेल माहीती तर जाण
वाच गीते चे तत्वज्ञान
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


--------------**------------***------------**--------------06- Feb-2021

उषास्वप्न---

होता आयुष्यावरी प्रहार 

झाला दुःखाशी  करार

घुसमटे श्वास माझा 

दुभंगले आरपार....


उलघाल विस्फोटाची

सरे मनाची ती हाय

माझ्या  वेदनेला फुटो

आता अक्षरांचे पाय


संपले शब्दांसंगे भांडण

अर्थाच्या काथ्यासवे कांडण

माझ्या सोबत वावरणारे एकाकीपण 

अंधाराच्याही सावलीतले भीषण


आकाश मोकळे झाले 

किरण डोकावे पहिले

खोल मनाच्या दरीत 

उषास्वप्न  विसावले

      सौ.छाया फडणीस. 5/2/2021.

rajesh addition

पुन्हा त्याच्या सह नांदणं

जरी असे तिथे भांडण

पुन्हा नवस्वप्न मांडणं

छायागीत हे भावले !


---शीघ्रकवी

---------------------------****----------****-----------------



हि घ्या addition

आठवणींच्या इतक्या लाटा,

कधी मोजल्या नाहीत,

काटे तुडवलेल्या पायवाटा,

कधी मोजल्या नाहीत.

आयुष्य संपत आलं,

पण हिशेब कधी केला नाही


मित्रांबरोबर किती झोकले,

स्वैर प्याले

कधी मोजले नाहीत,

आपल्यांशीच किती

वैर झाले,

कधी मोजले नाहीत

आयुष्य संपत आलं,

पण हिशेब कधी केला नाही


आयुष्य धुंदीत जगलो

किती कमावले

कधी मोजले नाहीत

अथक केलेल्या कामांनी

किती दमवले

कधी मोजले नाहीत

आयुष्य संपत आलं,

पण हिशेब कधी केला नाही.


जमाखर्च लिहीणे माझं

काम नाही

चित्रगुप्त असो यमधर्म वा

राम पाही !!


---शीघ्रकवी राजेश्वर


.---------------------****----------****-----------------

      *“मैत्री नको तोडूस”*

                  (..डॉ. स्वप्नील मानकर )


हा आहे खूप फटकळ !

तो आहे फारच खडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


नातेवाईकांसारखा तो !

आयता नसतो मिळत !!

मित्र कमवावा लागतो !

असंच मन नसते जुळत !!

हृदय वेगळे असले तरी !

स्पंदने सोबत धडकतात !!

दोघांच्या ही मनामध्ये !

समान विचार चालतात !!

सॉरी,थँक्सला थारा नसे!

मानाकरिता नको अडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


तू जातो निराशेत कधी !

भकास वाटते सारे रान !!

रडण्यास मिळता खांदा !

निवळतो मनावरील त्राण !!

जिथे कुणी कामी पडेना !

तिथे मित्र हजर असतो !!

आपल्यावर होणारे वार !

लीलया झेलत दिसतो !!

कठीण संकटांना मुळी !

तू एकटा नको भिडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


वादविवाद जेव्हा होतो !

स्वतःहून सॉरी म्हणावे !!

चूक कुणाचीही असो !

आपणच नमते घ्यावे !!

वाद करून जिंकल्यास !

बक्षीस थोडीच मिळते !!

अबोला जास्त लांबला !

की त्याचे महत्व कळते !!

छोड ना यार जाने दे !

चिंध्या नको फाडुस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


जीवन एकदाच मिळते !

मनसोक्त घ्यावे जगून !!

मैत्रीला मात्र काळजात !

आजन्म ठेवावे जपून !!

जात, पात, धर्म, लिंग !

या पलिकडले हे नाते !!

सर्व नात्याहूनी जगात !

सर्वश्रेष्ठ समजले जाते !!

तोडण्यापूर्वी कर विचार !

नंतर एकटा नको रडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


👌🏻👌🏻

rajesh addition,


'व्हिटामीन M मैत्रीत मिळते !

मनसोक्त घ्यावे मागून !!

नाती जन्माने  मिळतात !

मैत्र-जीवाचे शोधावे जागून !!

राजकीय मत, कर्म, भिन्न !

या पलिकडले हे नाते !!

सर्व नात्याहूनी जगात !

दोस्ती-गीत गायले गाते !!

सोडण्यापूर्वी कर विचार !

चूक, बरोबर यात नको पडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*'

---------------------------------------------------

*मनपाखरु*


रात  चांदण्यात वाहते ग

डोळ्यात माझ्या  तू नाहते ग !


अशी कशी तुझी न्यारी रंगत  ग

गालांवर चुंबनांची पंगत  ग !


गालावरच्या तुझ्या  खळीत ग

ओठांची माझी होडी तरते ग !


अंगांगावर इंद्रधनु फिरते ग

वेडे फुलपाखरु कसे झुलते ग !


रंगबाव-या हिरव्या माझ्या मनी

पारिजातकासम तू  फुलते ग !


  कवी प्रदीप  गुजराथी,        

      मोबा. 9422270490

खरचं प्रदिप खूप छान गीत 👌🏻👍🏻👍🏻


rajesh addition


*श्वासाचे मोरपीस फिरते गं*

*मनात उधाण भरती गं !*


*पापणीत स्वप्न रंगविभोर गं*

*भास की सत्य समोर गं !*


*नजरेत बांधणं किती गं*

*बेभान चांदण-मिठी गं !*

        ------------------------------









No comments:

Post a Comment