नाटक रीव्हू
होल बाॅडी मसाज
लेखक: डॉ. हर्षवर्धन श्रोत्री
दिग्दर्शक: किरण यज्ञोपवीत
कलाकार: गिरीष कुलकर्णी ,
overall rating ⭐⭐⭐⭐⭐
आम्ही आसनस्थ झालो.
काही सेलीब्रीटीज सुद्धा आलेत असा अंधारात भास झाला. (आदीनाथ कोठारे ,राहूल रानडे).
मायकल अँजेलोने मानवी बॉडी ची (अँनाटोमी कळण्यासाठी) बॉडीचे डिसेक्शन केलं होतं,कारण मसल कळल्याशिवाय माणसाच्या पोर्ट्रेट चित्रामधे जिवंतपणा येत नाही, तसं तर स्वामी दयानंद यांनी पण अंतरंग कळण्यासाठी डेड बॉडीचं डिसेक्शन केले होते. आपल्या नाटकाचा हिरो पण एक चतुर्थ श्रेणी असा वॉर्डबाॅय आहे की जो डाॅक्टरांच्या आदेशाने डेड बाॅडीचे डिसेक्शन करतो.
माँर्गमध्ये काम करताना डेड बॉडीची असह्य दुर्गंधी सहन करण्यासाठी अपरीहार्यपणे दारूचे सेवन केले, आणि ही दारू अति झाल्यामुळे मेंदू पण कन्फ्युज होतो आणि सत्य काय आणि कल्पक काय अशी भ्रामक स्थिती निर्माण होते आणि त्यात डिसेक्सन करणारा जर बॉडीच्या प्रेमात पडला आणि परत भ्रामक सिझोफ्रेनिक कंडिशन मध्ये त्याने विचार केला तर काय होऊ शकतं....याचा अचाट नाट्यप्रयोग आहे.
हे 'माईल स्टोन' नाटक आहे आणि पाहताना असं वाटत जायचं की असं काही भारतीय रंगभूमीवर आलचं नाही,आपण काहीतरी निर्माण होणारा इतिहास बघतोय कारण पूर्वी जसं सखाराम बाईंडर हे नाटक गाजलं होतं आणि त्यावर कोर्टाची बंदी वगैरे सगळे त्यावेळी झालं होतं आता त्यामानाने आपण जरा निर्ढावलो आहोत,त्यामध्ये बरीचशी आपली मनस्थिती पण समावेशक झालीय आणि टीव्हीवर ओटीपी सिरीयल बघून आपण पण बरेच आता तयार झालो आहोत तर हे एक बोल्ड नाटक आणि पाहिलेच पाहिजे असे नाटक आहे.
कथेचा कॅनव्हास खूप मोठा आहे नाटक काही बोल्ड संवादाकडून चक्क महाराजांच्या अभंगवाणी पर्यंत असं मोठा झोका घेतं.
स्टोरी सांगण्याचं पाप मी करणार नाही, कुठलाही रसभंग किंवा सस्पेंस घालवणार नाही.
My appeal,
please go to the Box in next opportunity and watch 'full body massage'
"It will broaden your senses!"
script : dynamic, fast, happening, bold and spiritual.अशी ही incredible story चे श्रेय डॉ. हर्षवर्धन श्रोत्री यांना जातं. मी त्यांना भेटून हे इतकं उत्कट झालय की सत्यकथा असल्यासारखं वाटतयं असं म्हटलं, त्यांनी होकारार्थी मान डोलावली.
direction: किरण यज्ञोपवीत दृष्यअदृष्य पणे प्रत्येक सीन मधे वावरतात, पात्रांची entry-exit, कुणी किती पावलं कुठल्या दिशेने चालायचं, spot light कधी, music...एकतारीने स्वर...कधी वाढत, कधी diminishng कधी जायचे, प्राॅपर्टी चा minimum उपयोग हे व लक्षात न आलेले अनेक पैलू हे दिग्दर्शकाचे यश आहे.
stage light and dark: impressive 👍🏻
casts : very appropreate portray by all.👍🏻👍🏻
acting :सर्वांचीच कामे उत्तम ,
बायकोच्या भूमिकेत रुचिका भुजबळ यांनी चांगली छाप पाडली आहे.
लीली ची स्वप्नमय भूमिका रिद्धी खांडरे ( /खंडारे) हिने अप्रतिम केली आहे, खूप challenging आव्हानात्मक bold आणि अमर्याद patiance (आपली entry येईपर्यंत शांतपणे AC च्या थंडीत पडून रहाण्याचे धैर्य कुठून आणतेस रिद्धी?!) , तिचा अभिनय, looks फार विलोभनीय आहे...deserves loud applaud 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻.
श्रीकांत यादव (रफिक खाटीक) यांचा अभिनय एका सीनमधे , गिरीष यांच्या 'वरचढ' (अक्षरश:) ठरला, पाॅवरफूल presence...खूप talented .
गिरीष कुलकर्णी छा गये, संवाद, मोनोलाॅग्ज (स्वगत), देहबोली आणि भूमीकेचे detailing दाखवणे अगदी कहर आहे. big congratulations.
अशक्य,अचाट,अचंबीत....झालो आहे 🙏🏻
---------------------------------------------------
Natak (Theatre)
WHOLE BODY MASSAGE
Credits
Produced by: Maharashtra Cultural Centre, Pune
Cast and Crew:
Writer: Dr. Harshawardhan Shrotri
Director: Kiran Yadnyopavit
Music: Gandhar Sangoram
Set design: Kiran Yadnyopavit
Light design: Sanket Parakhe
Costumes: Smita Taware
Production team: Siddhant Basutkar, Amol Tapare
Backstage Management: Manaswi Pendharkar, Gayatri Tambe-Deshpande and others
Cast
Vijay Shinde: Girish Kulkarni
Rafik: Shrikant Yadav
Tukaram: Abhijeet Dhere
Lilly: Riddhi Khandre
Vijay’s wife: Ruchika Bhujbal
Dr. Aniruddha Rao: Kiran Yadnyopavit
Head Sir: Vinayak Lele
Danny: Dnyanaratna Ahivale
Ramdin: Amol Tapare
overall rating ⭐⭐⭐⭐⭐
------------------------------------------------------
--राजेश मोराणकर rajeshmorankar@gmail.com