अ परफेक्ट मर्डर
काल (10 मार्च 2024) संध्याकाळी टिळक स्मारक मंदिरमधे हे नाटक पाहीले.
impression : A must see Natak.
(मी हे नाटक दोन वर्ष चेस करत होतो,पण कंबख्त तारखा जुळत नव्हत्या, प्रयोग पुण्यात असायचा तेव्हा नेमका मी पुण्याबाहेर असायचो so long cherished Natak...आखिर मील ही गया !)
सुबोध पंडे स्टेजवर का आणले नाही ??
भट्टी मस्त जमलीय....मजा आ गया.
अनिकेत विश्वासराव छा गये. अतिशय देखणा दिसलाय, स्टायलीश, वीथ किलर स्माईल उत्तम संवादफेक, जबरदस्त वावर स्टेजवर.
❤️👌🏻👌🏻👍🏻👍🏻
कॅप्टन करमरकर सुबोध पंडे...परफेक्ट स्क्रीनटेस्ट, परफेक्ट पात्रनिवड ,उत्तम अभिनय आणि उत्तम रिअॅक्सन्स 100% न्याय. 👍🏻👍🏻
---------------------------------------------
मीरा (प्रिया मराठे) शानदार लूक्स, देहबोली, उत्तम रिअॅक्सन्स, 👌🏻👌🏻
सर्व अटायर्स शोभून दिसले.पण एक इनोसंट लूक कॅरी केला....
'कितनी मासूम लग रही हो तुम,
तुमको जालीम कहे वोह झूटा है....'
-----------------------------------------------
इंस्पे. शिंदे योग्य काम केलय.
मीरा च्या लेखक मित्राची भूमीका अतिशय संयतपणे केली, विचारांची उडान दाखवत त्यांनी ते थ्रीलर लेखक का आहेत, खूपच convincingly portrate केले आहे. गुणी कलाकार. 👍🏻
या नाटकातला खरा हिरो "स्टोरी"आहे, आल्फ्रेड हिचकाॅच चा थ्रीलर म्हणजे अतिशय हूषारीने गुंफलेले कथानक आहे,हे मराठीत रुपांतर करण्यात लेखक 100% यशस्वी झालेत.
आता पुलीस डिटेक्टीव्ह इन्स्पेक्टर घारगे
....पुष्कर श्रोत्री यांनी जेव्हाजेव्हा एंट्री घेतली तेव्हातेव्हा प्रेक्षकांचा ताबा घेतला, ग्रामीण भाषेचा लहेजा, सूक्ष्म तपशीलाची विचारणा, गावठी शैली तरीही अदब व ऐटीकेटस् ,इतरांच्या प्रायव्हेसीचा आदर, स्मार्ट ,निरीक्षण व घटना re-construct करण्याचा अट्टाहास हे सर्व पुष्कर यांनी छान दाखवले आहे.❤️👌🏻👌🏻👍🏻
प्रसंगनिष्ट विनोद मस्त, त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद उस्फूर्त होता.
Before i forget,
lemme appreciate music / playback song...'सावल्या ssss
प्रकाशातल्या सावल्या'
रहस्याचा effect ह्या ओळींनी गडद होत होता.
क्लायमॅक्स वेगळ्याच उंचीवर नेले त्यासाठी सर्व कलाकार/ लेखक / दिग्दर्शक /नेपथ्य/ प्रकाश, sound engineers असे सर्वाचे अभिनंदन.
एक उत्तम थ्रीलर अनूभव.
A must see नाटक
अ परफेक्ट मर्डर
नाटक housefull होते. 10 मार्च 2024.
प्रेक्षकांनी कडक टाळ्यांची पावती देत standing ovation दिली. दर्दी गर्दी.
myRating : ⭐⭐⭐⭐⭐
❤️👏🏻👏🏻👏🏻👏🏻
-----------------------------------------------
हे नाटक नऊ वेळा (9 times) पहाणारे प्रेक्षक आहेत 😳😳 त्या जोडप्याचा परीचय करुन दिला गेला.
🤔👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
------------------------------------------
__राजेश मोराणकर
WA 0097455029913
rajeshmorankar@gmail.com
No comments:
Post a Comment