Saturday, 8 June 2024

नकळत सारे घडले (शुभारंभचा प्रयोग) impression: पाहीलेच पाहीजे असे नाटक. प्रयोग, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे, 8-June-2024)





  अलीकडेच ‘मित्रम्हणे’ पॉडकास्टला सौमित्र पोटेंच्या मुलाखतीत आनंद इंगळे  म्हणाले, “अलीकडचा सिनेमा प्रचंड बदलला आहे. कारण, काम करणारी पिढी सुद्धा तुफान हुशार आहे. आजच्या काळातला सिनेमा हा जास्त हुशार आहे. आजही माझा असा दावा आहे की, आपल्याकडे सिनेमात जेवढे विषय येतात त्याला प्रेक्षकांची साथ लाभत नसेल पण, आपल्या सिनेमांचे विषय हे खरंच खूप छान असतात. तरुण मुलं इतक्या सुंदर स्क्रिप्ट घेऊन येतात, त्यावर लिखाण करतात मग, चित्रपटासाठी काम करतात खरंच सिनेमात खूप बदल झालाय.”

-------------------------------------------
आज (8- जून-2024) ला मित्रमंडळींसह 
नकळत सारे घडले हे नाटक पाहीले.

आनंद इंगळे बटूमामा,
भाचा राहूल (प्रशांत केणी), 
दुबईत असणा-या बहीणीच्या मुलाचा केअरटेकर म्हणून बटूमामा जबाबदारी घेतो. 
राहूल ला  कसेतरी MBA चा अभ्यासक्रम पास कर हा त्याचा आग्रह असतो.

पण ,भाचा हमारा ऐसा काम करेगा"
मगर ये तो कोई ना जाने
कि मेरी मंज़िल है कहाँ...."

कारण भाच्या ला फिल्ममधे काम करण्याचा किडा चावलेला असतो, त्या वेडात तो अभ्यासाकडे दूर्लक्ष करतो.
मैत्रीण त्याचा फिल्म चा ध्यास समजण्याचा प्रयत्न करते व काॅलेजचा अभ्यास सोडू नको असं सांगण्याचा प्रयत्न करत असते.

बटूमामा जून्याकाळचा व त्यात अध्यात्मिक महाराजांचा भक्त असल्याने भाच्याचे फिल्मी वेड वेळोवेळी पाणउतारा करुन हाणून पाडतो.
 दोन पिढीतील 'जनरेशन-गॅप' मुळे संघर्ष निर्माण होतो.

इथचं श्वेता पेंडसे ची एंट्री होते. ह्या मुलाला हळूवार समजावून घेऊन सही मार्ग दाखवण्यासाठी councilling ची गरज आहे हे तिला कळते. आणि ते ही भाषण न देता संवादातून पटवून देण्याची गरज आहे हे तिला वाटते.
प्रत्येक वेळी भाचा चूक नसतो, त्यामुळे हालात चे टक्केटोणपे खाऊन पक्के झालेले बटूमामा यांच्या विचारांचे ही परीवर्तन करावं लागणार हे अवघड काम तिच्या डोक्यावर पडतं.

भाचा फिल्मस्टार होतो का? बटूमामा आपली जबाबदारी पार पाडतात का? मैत्रीणीची support-service कामी येते का? 
जाननेके लिये पाहिलचं पाहीजे हे नाटक.

घरोघरी आपल्याला हा संघर्ष पहायला मिळतो,
मुलांमधे उर्जा असते, talent असतं, काही नवीन करायचं असतं...
दूसरीकडे पालक त्यांचे शुभचिंतक असले तरी, स्वत: काढलेल्या कष्टप्रद आयुष्याच्या अनूभवातून मूलांना नवीन वाटेचा धोका पत्करु देत नाहीत, मुलं फसतील अशा भितीने पालक मुलांना नेहमी ओरडतात, हतोत्साहीत करतात,नकारात्मक टोमणे मारतात.
मग संवाद तूटतो व मुलं एकाकी होतात.

हे नाटक कुणा एकाचं बरोबर अशी बाजू न घेता, संवादातून surgical-operation करुन तूटलेली नाती पुन्हा स्थापन करण्याची प्रेरणा देतं.पालक व मुलांमधे प्रेम असतचं, हे नाटक त्या प्रेमाचा पुनर्शोध लावून देतं.

impression: आनंद इंगळे छा गेलेत. सहजसुंदर वावर, सूक्ष्म अभिनय, देहबोली, कष्टमय आयुष्यातून आलेला stubbornness , प्रसंगनिष्ट विनोद ...संवाद नसतांनाही reactions...खूपच काबील-ए-तारीफ आहेत....जबरदस्त.

दोनच दिवसांपूर्वी " 38 कृष्णव्हिला" हे नाटक पाहिले होते, त्यातल्या श्वेता पेंडसे यांचा प्रभाव अजून ओसरला नव्हता तेवढ्यात ह्या नाटकात भारी काम पाहीलं... खूप pleasent वावर, संवादफेकीची उत्तम timing..   councilling करतांना संयम , आणि चूक दाखवून देणे, दूस-याचं कष्टमय संघर्षाला दाद देण्याचा उमदेपणा त्यांनी छान दाखवला.

राहूल (प्रशांत केणी) याने आपले काम खूप impressive केले, तरुणांचा स्वप्नाळूपणा, बेफिकीरपणा तर कधी भाबडेपणा आणि मामावरचे प्रेम त्याने अचूक दाखवले. ह्या मुलाची निवड भूमिकेसाठी एकदम perfect आहे.

मैत्रीणीच्या तनिषा वर्दे भूमिकेत हीने खूप छान काम केले आहे, तरुणाई culture असूनही मामासाठी प्रेमाने मदत करण्याची भावना योग्य दाखवली.मित्रासाठी support देण्याची friendship आणि संवाद नसतांनाही चेह-यावर reactive भाव उत्तम दाखवले.
आनंद इंगळे/ श्वेता पेंडसे असूनही काही दडपण न घेता सहज काम केले.
तनिषा वर्दे , प्रशांत केणी ह्यांना रंगमंचावर दिर्घ करीयर आहे.

संगीत : अशोक पत्कींचं पार्श्वसंगीत खूप fresh आणि प्रसंगाला अनूरुप आहे.
(एखाद्या गीताचा विचार व्हावा)

दिग्दर्शन : विजय केंकरे ...नाम ही काफी है.
" you caught me napping..." ह्या dialogue मधे (दोनदा) दिग्दर्शकाचा presence आहे !!

लेखक : विषय / खोली / नाट्यमयता / संघर्ष / वाद आणि problem solving या सर्वच विषयात लेखक शेखर ढवळीकर यांनी बाजी मारलीय.
हे नाटक चालेल, विषय evergreen आहे.

---------------------------------------
Rating : ★★★★
राजेश मोराणकर

---------------------------------------
प्रेक्षकांनी टाळ्यांची पावती दिल्यावर 
आनंद इंगळे यांचं निवेदन video 👇🏻




No comments:

Post a Comment