Thursday, 20 June 2024

लोक मांजर का पाळतात !??

लोक मांजर का पाळतात ?                                  एक मानसशास्त्रीय मागोवा....


बऱ्याच वर्षापासून मला हा प्रश्न पडलाय लोक मांजर का पाळतात? कुत्र्याचं समजू शकतो कुत्रा वफादार असतो घराची राखण करतो पण मांजर काय करतं, मांजर काहीच करत नाही ,कुत्र्याचं असं आहे की कुत्र्यावर प्रेम केलं तर , मालकावर जीव लावतो,कुत्रा मालकासाठी जीव देतो !!


तरीही लोक मांजर का पाळतात या प्रश्नावर मी अनेक वर्षे विचार करतोय आत्ताच मी रत्नागिरीला गेलो होतो तिथं बोलताना असं कळलं की रत्नागिरीत 27 लाख रुपयांची  मांजरं लोकांनी विकत घेतली आहेत मांजराचे खाणं विकत घेतले त्यामुळे पुन्हा तो जुना विषय वर आला की लोक मांजर का पाळतात. मांजर काहीही सर्विस देत नसतानाही लोक मांजरावर एवढे पैसे का खर्च करतात आणि दुसरं म्हणजे आता लोकांना आपलं देशी मांजर चालत नाही आता पर्शियन ( instagram वर photo टाकायला बरं) ते आणखी गल्ले लठ्ठ आणि जास्त आहार खाणार आणि जास्त महाग असतं तरी लोक त्याच्यावर पैसे खर्च करतात आणि ते मख्खपणे घरात वावरत असतं त्याच्या चेहऱ्यावर थोडाही gratitude आणि कणभर ही कृतज्ञता नसते ते मस्तपैकी घरातल्या सोफ्यावर लोळत असतं गादीवर लोळत असतं आणि खाण्याची वेळ झाली की ते आपलं म्याऊ करून थोडसं घुटमळतं आणि खाणं मिळालं की दूध मिळालं की ते पिऊन घेतो आणि थँक्स वगैरे काय व्यक्त करायचा प्रश्नचं  नसतो आणि निवांतपणे मांजर वावरत असतं आणखी एक गंमत म्हणजे मांजर कधीही घड्याळ बघत नाही( i mean unlike कोंबडा, मांजराला दिवसरात्र असे काहीही पडलेले नसते) वेळ आणि मांजर याचा काहीही संबंध नाही मांजर निवांत वेळ घालवत असतं किंबहुना मांजराचा आयुष्य म्हणजे निरुद्देश वेळ घालवणं असतं.

 तर असं असूनही लोक मांजर का पाळतात ? why ???


आता दुसरा विषय म्हणजे जगात एवढी गुन्हेगारी, एवढा क्राईम एवढा द्वेष असूनही ,माझं दृढ विश्वास आहे स्ट्रॉंगली बिलिव्ह करतो की जगात प्रेम जास्त आहे आणि एवढं जास्त आहे की प्रेम वाटून शिल्लक राहिलेले . माझा असा विश्वास आहे की जगात अथांग  प्रेम ' un-used  शिल्लक आहे मग या शिल्लक राहिलेल्या प्रेमाचं काय करायचं. तर जगात जसं समुद्राचं पाणी अथांग आहे अमर्याद आहे तसेच  जगात न वापरलेले प्रेम अमर्याद आहे तर या प्रेमाचं काय करायचं या प्रेमाला कुणीतरी रिसिव्हर पाहिजे म्हणजेच या प्रेमाला बिनशर्त स्वीकारणारा कोणीतरी पाहिजे आणि गंमत म्हणजे नुसता स्वीकारणारा पाहिजे. त्याची रिटर्न गिफ्ट म्हणून पुन्हा प्रेम करणारा नकोय कारण प्रेम आधीच खूप जास्त झालंय ना त्यामुळे फक्त स्वीकारणारा पाहिजे, निमुटपणे स्वीकारणारा पाहिजे आणि इथेच कळीचा मुद्दा आहे की मांजर निमुटपणे तुमचं प्रेम स्वीकारतं, तुमचं प्रेम सहन करतं बर्दाश्त करतं आणि काहीच करत नाही काहीच प्रतिक्रिया देत नाही.

शायर म्हणतात,

तेरे जहाँ मे ऐसा नही के प्यार ना हो,तेरे जहाँ मे ऐसा नही के प्यार ना हो,जहा उम्मीद हो इसकी वहा नही मिलता....कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता

तर जिथून अपेक्षा आहे तिथून प्रेम मिळत नाही, ज्यांच्यावर प्रेम करायचे आहे ते प्रेम स्वीकारत नाहीत....काय करायचे या un-used शिल्लक प्रेमाचे ???

मांजर निमुटपणे तुमचं प्रेम स्वीकारतं, तुमचं प्रेम सहन करतं बर्दाश्त करतं आणि काहीच करत नाही काहीच प्रतिक्रिया देत नाही हेच पाहिजे असतं लोकांना.

---------------------------

आता तिसरा मुद्दा हे मी सांगतो हे visiulize करण्यासाठी.. पूर्वीचं आठवा की पूर्वी घरोघर सुट्टे पैसे खूप साठलेले असायचे. एखादा डबा असायचा आणि त्याच्या ढिगभर सुटे पैसे साठलेले असायचे आमच्या घरी पण डब्यात खूप सुटे पैसे साठलेले होते.

कारण काय व्हायचं बाहेर जाताना मी सुट्टे पैसे घेऊन जायला विसरायचो, नोटा खर्च करायचो आणि समज ते 70 पैशाची काही वस्तू घेतली तर 30 पैसे सुट्टे परत यायचे कधीतरी काहीतरी वीस पैशाचा घेतल तर 80 पैसे सुटे घ्यायचे असे मी घरी घेऊन यायचो.पण पुन्हा  बाहेर जाताना सुटे पैसे घेऊन जायचे विसरायचो त्यामुळे घरात सुट्टे पैसे वाढतच चालले होते तर हे visiualize करा हेच तुम्ही समजा की तुम्हाला सुटे पैसे खपवायचे आहेत तर तुम्ही कुणाला तरी सुट्टे पैसे दिल्यावर त्यांनी परत तुम्हाला सुट्टे पैसे देऊ नये इथेच मांजराचं महत्व लक्षात येतं की मांजर प्रेम स्वीकारताना तुम्हाला रिटर्न प्रेम देत नाही आणि हेच आपल्याला पाहिजे आहे, सुट्टे पैसे संपवायचेत तसेच जगात असलेले हे अथांग शिल्लक प्रेम लोकांना संपवायचेआहे, तिथे कोणीतरी स्वीकारणारा पाहिजे आणि मांजर हे करतं. म्हणून लोक मांजर पाळतात की मला प्रेम कोणाला तरी द्यायचे आणि त्याच्या बदली मला प्रेम नकोय त्यांनी फक्त प्रेम मुकाट्याने स्वीकारलं पाहिजे मांजर मुकाट्याने प्रेम स्वीकारतं हा मांजराचा गुण आहे म्हणून लोक मांजर पाळतात अशा conclusion मी आलो आहे.

so my dear watson, this is opened and closed case. विषय संपला आहे.                      उत्तर सापडलं आहे .

----राजेश मोराणकर

--------------------------------------------------------

No comments:

Post a Comment