Saturday, 12 October 2024

माझ्या कविता

This poem for dear Darshan

11-feb-2025

*महाकुंभ 2025...*


झाले त्रिवेणी 'दर्शन',

भाग्याचा हा क्षण,

मोक्षाचे आरक्षण,

आपोआप ||


महाकुंभ जे येती

आस्थे ची डुबकी घेती,

सहज ची घडती,

अमृत स्नान ||


144 वर्षानंतर,

श्रद्धालु चे अंतर,

साक्षात शिवशंकर,

जैसा देखा ||


बम बम भोले,

मन देह डोले,

मुखी शब्द आले,

हर गंगे ||


महाकुंभ यात्रावास,

सज्जनांचा सहवास,

मन प्रसन्न, पूर्ण आस,

समाधान ||


# शीघ्रकवी



🙏🏻❤️


घ्या कवीता 14- Jan-2025


आली संक्रांती,

करुया सुधारणा

सवय सूक्ष्म क्रांती,


सकारात्मक बदल

व्यक्तीगत आचरण,

तो सूर्य उत्तरायण ।।


आकांक्षांचे पतंग,

आणि ध्येयाचा चंग,

उत्साहाचा वारा,

निराशेला ना थारा ।।


तीळगूळ स्नेह,

प्रेममय मन देह ।।


तीळगुळ घ्या

गोड बोला...

तीळगुळ घ्या

गोड बोला...


# राजेश्वर

--------------------------------


नववर्ष स्वागत...


उलटले कॅलेंडरचे पान,

गाऊ नववर्षाचे गान ।।


काळाचे चक्र फिरले,

आणि एक वर्ष सरले,

जल्लोश आतषबाजी,

गतक्षणांची आठव ताजी।।


मी तोच, तुम्ही तेच,

नववर्ष हे,जग तेच.

फक्त काळाची मोजणी,

नको चुकांची टोचणी।।


नवी आशा,नवी स्वप्ने,

नवे संकल्प मनी जपणे,

नवनवीन शिकत राहूया,

नवा प्रांत,नवे जग पाहूया।।


राहू आहार विहार दक्ष,

आरोग्यावर असो लक्ष,

लाभो सर्वा सुख आरोग्य,

सर्वांचेच उजळो भाग्य।।


हेच मनोगत,

नववर्ष स्वागत ।।


# राजेश्वर 

01-जानेवारी-2025

-----------*-----------*----------


30-Oct-2024


 दिवाळी


दारात रांगोळी,

अभ्यंग आंघोळी ।।


फटाक्यांचे आवाज,

आणि  दिव्यांचे राज ।।


फराळाचे ताट,

असे काठोकाठ ।।


आकाशकंदील रंगीत,

दिवाळीपहाट संगित ।।


वाजू दे मनात गंधार,

होऊ दे तेजोमय मन,

जावो मनातील अंधार ।।


---राजेश्वर

----------------------------------

12-Oct-2024

शुभ दसरा

झेंडूंची रास,

फूलांचा वास,

नविन भास,

सण हा खास,

आला दसरा ।।


गरब्या ची लय,

आदिशक्ती जय,

दृष्टावर सृष्टाचा, 

आज शुभविजय,

जयश्रीराम जय,

आला दसरा ।।


आपट्याची पाने,

हे सोने नाणे,

आज लूटावे,

विचारांचे सोने,

शुभेच्छा दसरा ।।


# राजेश्वर

----------------------------

07-Sept-2024

घ्या कविता (अभंग form)


ज्याची सर्वा ओढ,

आला भव्य सणेशु,

आला प्रिय गणेशु,

विराजला।।


घरोघर लगबग,

सर्वत्र उत्सव,

सर्वत्र उत्साह,

संचारला।।


रांगोळ्या गुलाल,

सजली आरास,

फूलांची रास,

सजावट।।


दणाणले जयघोष,

स्तोत्रघोष आरती,

आसमंत भारती,

मंत्रमय।।


नैवेद्याचा दरवळ,

मोदकांचा स्वाद,

तृप्त घेता आस्वाद,

सर्वजण।।


आता आहे चालणार,

ढोल ताशे जल्लोश,

रोज  आरती जोश,

दहा दिस।।


# राजेश्वर


--------------------------

सुपारी          10-April-2024

महा नव निर्माण

झाले,

महा 'नमो' निर्माण !



चांगला मुद्दा

धरसोड वृत्ती

भोंगा,टोल,

त्याची आवृत्ती


शाह भेटले

दूपारी आज ।

लाज टाक रे

सुपारीबाज ।।



बिनशर्त पाठींबा (?!)

पोराला द्यायला,

खासदार बेंच ।


बापाला कळले

जगात नसतो

कधी फ्री लंच ।।

-------------------------------

गुढी पाडवा 🚩    09-April-2024


चैत्राची पालवी,

मरगळ घालवी ।।


कोकीळ कूजन,

श्रीराम पूजन ।।


तारीख रचली,

अयोध्या सजली ।।


मंदिर नवे,

चैतन्य सवे ।।


मंदिर मालकी,

रामाची पालखी ।।


गुढ्या तोरणे,

नयन पारणे ।।


आला मधूमास,

संपला वनवास ।।

--------------------

पक्षांतर               09-April-2024


74 हे त्यांचे वय,

मनी-मॅग्नेट सवय ।।


सावित्री जिंदाल ।

काँग्रेस मधे ,

गळली नाही दाल ।।


देशातील सर्वात

श्रीमंत महीला....

काय पाहीजे

असेल हिला ?!


29 अब्ज डाॅलर्स,

2800 कोट रुपया ।

म्हणजे किती अंबानी

नका विचारु कृपया ।।


गुंतवणूक असो,

उर्जा,इंफ्रा,सिमेंट,

पेंट आणि लोखंड ।


अमेरीका ते चिली

युरोप आणि युए ई

कारोबार अखंड ।।


केला प्रवेश

मोदी परीवार ।

काय पूढची चाल

काय विचार ।।


# राजेश्वर

-----------------------------


डीलर झाले लिडर ।

भित्रे झाले नीडर ।।


झाले भाजपा-वासी,

 धरला भगवा दामन ।।

दाग अच्छे है...,

दागी झाले पावन ।।


नानांचा रिक्रृटमेंट ड्राईव्ह,

चर्चा हाॅटेल स्टार फाईव्ह ।।

नेत्यांना करा अगवा,

व द्या हाती भगवा !!


कालचा जो चोर, 

आजचा अर्थमंत्री।।

काल जमीन-चोर,

आज थोर लोकतंत्री ।।


पहायचय अजून फार ।

मिशन चारसो पार ।।

--------------------------



No comments:

Post a Comment