Thursday, 31 December 2020

"पाहीले न मी तुला, तू मला न पाहीले"

 मधाळ आवाजाच्या सुरेश वाडकरांच्या आवाजात आवाज मिसळून गाण्याचा आनंद वर्णनीय, आणि जर हे share करता आले तर क्या बात है ( Thanks too starmaker app)


आपल्या passion च्या मागे धावणारा माणूस आणि कटी-पतंग च्या मागे धावणारे अजाण बेभान मूल यात फारसा फरक नसतो !

रेडीओवरची गाणी अतिशय curiously ऐकण्याचा माझा अनूभव 55 वर्षांचा आहे !!
माझा पहीला concert वयाच्या पाचव्या वर्षी घरातचं  झाला, ऐकमेव प्रेक्षक होती ...अक्का-आज्जी तिने नंतर सांगितले, गाणं होतं
' ये मेरा प्रेमपत्र पढकर,
 तुम नाराज ना होना,
 तुम मेरी जिंदगी हो...)




दोन वर्षांपूर्वी भूतान टूरवर निसर्गाच्या धूंद वातावरणात, रेडीओवरील गाण्यावर, मागच्या सीटवर मस्तीत बसलेल्या एका सामान्याच्या गळ्यातून काही अतिसामान्य टूकार आलाप निघून गेले...

पुढच्या सीटवर एक उच्चपदस्थ बसला होता जो स्वत: गाणारा असून गाण्याचा शौकीन अभ्यासू होता, काही काळ बर्दाश्त केल्यावर त्याच्यातला रत्नपारखी व मेंटाॅर जागा झाला (असावा), ह्या गारगोटी ला थोडे पैलू पाडले तर गारगोटी असला तरी किरण योग्य angle ले पडले तर (नकली) ही-यासारखा चमकू शकेल...
तो वळून मागच्या सीटवर मस्तीत बसलेल्याला म्हणाला,

"तू starmaker app वर गा, तिथं शेकडो हौशी गायक गातात"

सहा महीने असेच गेले,
संकोची स्वभाव व भीडस्त भाव यामुळे low profile राहीलो, मग विचार केला आता 75% लाकडे गेली तरी कसली लाज कसला संकोच ?!
आता मी तेच करणार जे मला पाहीजे.

मला गाणं कसंं आलं? असं विचारलं तर
चित्रकार हेबर यांच च उत्तर देईन

" ब्राॅडकास्ट हवेत नेहमीच होतं,
आज तुमच्या हातात रेडीओ आला,तुम्ही ट्यून केला आणि तुम्हाला संगीत ऐकू आलं !! "

म्हणजे मी केव्हाच तयार होतो,
apps आज माझ्या हातात आलीत.
( तुम्ही ही असा शोध घ्या आपला hobby छंद शोधा ज्यात जीव हरवून जाईल)


एकदा त्याला त्या वाक्याची आठवण झाली,

"तू starmaker app वर गा, तिथं शेकडो हौशी गायक गातात"
आणि तो सुटला....
(त्या रत्नपारखी ने बर्दाश्त करुन उत्तेजन  दिले कारण   आवाज
 मोकळा होण्यासाठीच याला शंभरएक गाणी लागतील हे तो जाणून होता...)
हा पडेल आवाजात गात सुटला,
    त्या दिवशी मी 99 वे गाणे record करुन सोडले.



nurvous ninety तून बाहेर पडण्यासाठी  एकचं गाणं पाहीजे,

ह्या एकला चलो मार्गावर, शंभरावे गाणे कसे पाहीजे....
सारे जग वैरी झाले तरी पर्वा नाही,
आम्ही पण काही कमी नाही ...वगैरे
आहे का असं काही गाणं????

हो अगर दुष्मन दुष्मन,
जमाना गम नाही,
कोई आये, कोई आये,
हम किसी के कम नही !!

साल 2020-21 च्या पडझडीतही काय मिळवले तर हेच.
( तो रत्नपारखी आहे श्री.सुहास कडलास्कर )

Suhas Kadlaskar. Ex Vice President Corporate Affairs & Human Resource. Mercedes-Benz India


मला यात दोन गोष्टी दिसतात,
1. प्रवासाचा रोडमॅप माहित असणं
   ( म्हणजे गाण्याची चाल, interlude music, कुठं शब्द सुरु होतात, थांबतात वगैरे,
ह्याचा काही प्रश्न नाहीये, कारण दिर्घकाळची श्रवणभक्ती.)

2. प्रत्यक्ष drive. हा तुमच्या infrastructure वर अवलंबून असतो, चांगली car -up-down smooth ride आणि खराब car-bumpy ride.ड्रायव्हर चे कौशल्य ही एक बाब पण आहे.

इथं आवाज आणि त्याची मर्यादा,
यात खूप सुधारणेची गरज आहे,
जिंदगी पडी है, होईल हळूहळू सुधारणा.

आज 20- March-2022 ला माझ्या गाण्यांचा score
starmaker वर    एकट्याची (solo) 110 गाणी
Smule         वर     द्वंद्वगीते (duets) 441 गाणी.

best is yet to come.
सर्वोत्तम गाणं अजून यायचय.
(कदाचित कधीच येणार नाही.....its a journey and Not a destination !!)

कशासाठी गातो मी?
excitement...adrenaline gush साठी.
प्रत्येक गाण्याआधी मी nurvous असतो,
(सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति।

वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।। अर्जूनाची अवस्था...)

पोटातून गर्रर्रर्रर्र असा आवाज येतो.

मी super-alert असतो.
नंतर recorded गाणं check करतांना,
फक्त कान जिवंत असतात, मी कुणाचाच नसतो.

नशा!!




नशा ये प्यार का नशा है
ये मेरी बात यारो मानो
नशे में यार डूब जाओ
रहो ना होश में दीवानो
के जबसे मैंने तुमको दिल ये दे दिया
मीठा मीठा सा दर्द ले लिया

नज़र से यूँ मिली नज़र
दीवाना मैं हो गया
असर ये क्या हुआ असर
कहाँ ये मैं खो गया
बेहेके बेहेके कदम, बेहेका बेहेका है मन
छा गया छा गया मुझपे दीवानापन

नशा ये प्यार का नशा है
ये मेरी बात यारो मानो
नशे में यार डूब जाओ
रहो ना होश में दीवानो.


-------------------------------***------------------------



Thursday, 24 December 2020

पुण्यात पुन्हा रानगवा.....Dec 2020

 



काही दिवसांपूर्वी पुण्यात (दुस-यांदा) *रानगवा* (gaur) दिसला होता,


त्यावर हि कविता


पुन्हा झाला गवगवा,

पुन्हा आला रानगवा


पुन्हा जनता कावली

पुन्हा मिडीया धावली

पुन्हा तसवीर दावली

टिव्हिवर


गवा मनुष्यहद्दीत आला

कि मनुष्यअतिक्रमणवाला

एकच गौंधळ झाला

खरे काय


विकासाचा धरबंद

की आधीच्या चा हा भाईबंद

कुणाचा याशी संबंध

कोण जाणे


जंगलचे हे गवे

घेऊन येतील थवे

प्रश्नचिन्ह हे नवे

उपस्थीत


अभयारण्याच्या आता

भूतदयेच्या बाता

हे पशुपतीनाथा

कर काही...


--शीघ्रकवी राजेश

Thursday, 26 November 2020

प्रकाशराव बोंगाळे यांना कौतुक पत्र Appreciation letter to shri.Prakashrav Bongale

 

प्रकाशराव बोंगाळे यांना कौतुक पत्र

---शुभेच्छुक: राजेश मोराणकर / मिताली मोराणकर



परवा संध्याकाळी आपल्या नव्या घरी पावलो,
आपल्या पाहूणचाराने भारावलो,
त्यावेळी मनात उमललेली शब्द-सुमनांची ही भावमाला...


तेरे घर के सामने,
एक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने

एक घर बनाऊंगा...

घर का बनाना कोई, आसान काम नहीं
दुनिया बसाना कोई, आसान काम नहीं
दिल में वफ़ायें हों तो, तूफ़ां किनारा है
बिजली हमारे लिये, प्यार का इशारा है
तन मन लुटाऊंगा, तेरे घर के सामने
दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने...

कहते हैं प्यार जिसे, दरिया है आग का
या फिर नशा है कोई, जीवन के राग का
दिल में जो प्यार हो तो, आग भी फूल है
सच्ची लगन जो हो तो, पर्बत भी धूल है
तारे सजाऊंगा, तेरे घर के सामने
दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने...

कांटों भरे हैं लेकिन, चाहत के रास्ते
तुम क्या करोगे देखें, उल्फत के वास्ते
उल्फत में ताज़ छूटे, ये भी तुम्हें याद होगा
उल्फत में ताज़ बने, ये भी तुम्हें याद होगा
मैं भी कुछ बनाऊंगा ,
तेरे घर के सामने ,
दुनिया बसाऊंगा, तेरे घर के सामने...

प्रकाशराव, आपण स्वत:ला दिलेला शब्द
राखलात, एक impressive म्हणजे 'लय भारी ' घर बांधलतं.
great achivement.
अभिनंदन.



विप्रो चे owner अझीम प्रेमजी म्हणाले होते,
' यश दोनदा दिसतं,
एकदा स्पप्न पहातांना,
दुस-यावेळा प्रत्यक्ष...'

तुमच्या यशाकडे पाहून हे पटतं.
तुमच्या घराकडे पाहून अनेकांना मनात हेच वाटलं असेल, पण त्यांना शब्दात कसं सांगायचं हे कळलं नसेल, काहींनी ते चेह-यावरील आनंदात व्यक्त केलं असेल, काहींनी पाठीवर शाबासकी ची थाप देवून ते पोचवलं असेल. तर काहींनी मनातल्या मनातचं 'लय भारी काम केलं सा ' म्हटलं असेल.
आम्हाला मात्र हे खुल्लं म्हणावस वाटतय,
" लय भारी, प्रकाशराव , आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, we are proud of you.
तुमच्या अथक प्रयासामुळे हे 'प्रयास ' वास्तवात आले, त्रिवार अभिनंदन"

एखादा इव्हेंट करायचा म्हणजे तीन तीन दिवस खपून तयारी करायची त्यासाठी पूर्ण फॅमिलीला कामाला लावायचे यातीत कष्ठाची आम्हाला जाणिव आहे, 
पाय-यांवर देखणी रांगोळी काढायची आणि जपायची सोपे नाही.

ती रांगोळी आणि ती फूलांची आरास पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.

ते स्टार्टर आणि जेवण इतके अप्रतिम होते, शब्दात सांगता येणार नाही, चिकन, तांबडा-पांढरा आणि बिरयाणी आजपर्यंत ची सर्वात बेस्ट होती. हे सर्व नियोजन करण्याचे कष्ट आम्हाला कळले.

सारांश, आम्ही बेहद खूष झालो येवून.धन्यवाद.

प्रकाशराव आपल्याला व परीवाराला असेच यश मिळत राहो ही शुभेच्छा.

--राजेश मोराणकर













-------------*-------------*----------*-------------*--------







Wednesday, 25 November 2020

Kuchh kehta hai coconut tree, kya kehta hai ?

25 Nov 2020

 आज मुळशी हून येतांना मला एक झाड दिसलं.

तसे साताठ लोक बसले होते त्या हाॅटेलात.

कुणाला नाही दिसलं,

मलाच दिसलं.

इतरांना ते असं दिसलं


मला मात्र ते झाड ,काहीतरी संदेश देतयं असं वाटतं

मी पुढे झालो, झाडाचा zoom up photo घेतला.

काय subtitle द्यायचं ते विनासायास मनात आलं.


Seedhi sapat zindagi, bawal ho gayi,
ek Corona aanese se, zindagi sawal ho gayi,

on this complaint of us,

i thought  🤔 This tree tells something


"This is just a ' detour ' of life,
And NOT end of life...!! "














Saturday, 14 November 2020

suhas sardeshmukh report in loksatta ऊसतोडणीला सुरुवात.. कष्टाच्या चरकात ६० हजार विद्यार्थी

 

Best report.


Thanks to suhas sardeshmukh and loksatta

copy and paste from loksatta 10-Nov-2020

ऊसतोडणीला सुरुवात.. कष्टाच्या चरकात ६० हजार विद्यार्थी

संकटात जगण्याचं बळ एकवटून संपानंतर ऊसतोडणीसाठी मजूर पुन्हा फडामध्ये गेला





सुहास सरदेशमुख

करोना विषाणूचे अस्तित्व अद्याप कायम  असले तरीही केवळ मुखपट्टया लावून दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेली तोबा गर्दी प्रत्येक शहरात दिसते आहे. टाळेबंदीने आक्रसून गेलेला अर्थव्यवहार गती घेताना गावोगावी उसाच्या फडातही मजुरांची हालचाल सुरू झाली. उसाच्या फडात हाडं गोठविणाऱ्या थंडीतही मजुरांनी तोडणी केली, मोळया बांधल्या आणि दुपारीच मालमोटार भरायला हाती घेतली. मग पोराबाळांना केला उसाचा बिछाना. तान्ह्यला खेळवायला, विंचू काटय़ातून रक्षण करायला मोठा भाऊ होता.

संकटात जगण्याचं बळ एकवटून संपानंतर ऊसतोडणीसाठी मजूर पुन्हा फडामध्ये गेला. या क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिलांचे कष्ट  अधिकच. पण घरात अंधार नको असेल आणि दीपावली करायची असेल तर  फडात राबायला हवे हे पुन्हा एकदा ठरले आणि पुन्हा तोडणी सुरू झाली.  या वर्षी ६० हजाराहून अधिक विद्यार्थी पुन्हा एकदा उसाच्या फडात गेले.

ऊसतोडणीच्या क्षेत्रात साधारणत: सहा लाख मजूर आहेत. सर्वाधिक स्थलांतर बीड जिल्ह्यातून होणारे. या वर्षी करोना विषाणूचे भय असले तरी त्यावर मात करत मजुरांनी प्रवास केला. काही जण वाटेतच गेले अपघातात. संप काळात कोणी तरी मालमोटारीला आग लावून दिली. रस्त्यावरचा फाटका संसारही जळून गेला. पुन्हा सारे उभे केले. मुकादमांनी कोयत्याची उचल दिली. नवरा बायकोची जोडी म्हणजे एक कोयता. त्याचा दर वाढावा म्हणून संप झाला. त्यातून छुपे राजकारण झाले. मोठे नेते हातवारे करून तावातावाने दृकश्राव्य माध्यमातून भांडले.  मुखेड तालुक्यातील एका छोटय़ा गावात कर्नाटकातून मजूर आलेले. त्यांना राज्यातील या राजकारणाचा ठावठिकाणा नव्हता. त्यांनी पहाटेच काम सुरू केले. पण आता गावोगावी मजूर पोहचले आहेत.  उसाची मोळी तशी २५-३० किलोची पण मालमोटारीपर्यंत  वाहतूक करताना ती लपकते.  श्रमाचं मोल शब्दात मावणार कसे, असा  या महिलांचा सवाल आहे.

विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?

मुलांच्या क्षेत्रात बीड जिल्ह्यात काम करणारे दीपक नागरगोजे म्हणाले,‘ या कष्टाच्या जगण्याचे मोजमाप असे नाही. पण जी पिढी फडात राबते आहे त्यापेक्षाही त्यांच्याबरोबर येणारे विद्यार्थी ही नेहमीच चिंतेची बाब आहे. जगण्याच्या धबडग्यात ६० हजार मुलांचे काय होणार या प्रश्नाचा गुंता आता करोनामुळे आणखी वाढला आहे.

Wednesday, 4 November 2020

rajesh addition to poetry

 नेट प्रॅक्टीस म्हणा,

रियाझ म्हणा, सराव म्हणा,

 मी WA वर जे काव्य मिळते,कल्पकतेला ताण देवून त्या मीटर मधे स्वत: ची भर घालत असतो, असे कितीतरी तयार करुन delit केले.

आता विचार करतोय ,साठवूया. बघा कसं वाटतं.

*ढाई अक्षर* 

ढाई अक्षर का वक्र,

और ढाई अक्षर का तुण्ड।

ढाई अक्षर की रिद्धि,

और ढाई अक्षर की सद्धि।

ढाई अक्षर का शम्भु,

और ढाई अक्षर की सत्ती।



ढाई अक्षर के ब्रह्मा

और ढाई अक्षर की सृष्टि।

ढाई अक्षर के विष्णु

और ढाई अक्षर की लक्ष्मी।

ढाई अक्षर के कृष्ण

और ढाई अक्षर की कान्ता।(राधा रानी का दूसरा नाम)


ढाई अक्षर की दुर्गा

और ढाई अक्षर की शक्ति।

ढाई अक्षर की श्रद्धा

और ढाई अक्षर की भक्ति।

ढाई अक्षर का त्याग

और ढाई अक्षर का ध्यान।


ढाई अक्षर की तुष्टि

और ढाई अक्षर की इच्छा।

ढाई अक्षर का धर्म

और ढाई अक्षर का कर्म।

ढाई अक्षर का भाग्य

और ढाई अक्षर की व्यथा।


ढाई अक्षर का ग्रन्थ,

और ढाई अक्षर का सन्त।

ढाई अक्षर का शब्द

और ढाई अक्षर का अर्थ।

ढाई अक्षर का सत्य

और ढाई अक्षर की मिथ्या।



ढाई अक्षर की श्रुति

और ढाई अक्षर की ध्वनि।

ढाई अक्षर की अग्नि

और ढाई अक्षर का कुण्ड।

ढाई अक्षर का मन्त्र

और ढाई अक्षर का यन्त्र।


ढाई अक्षर की श्वांस

और ढाई अक्षर के प्राण।

ढाई अक्षर का जन्म

ढाई अक्षर की मृत्यु।

ढाई अक्षर की अस्थि

और ढाई अक्षर की अर्थी।


ढाई अक्षर का प्यार

और ढाई अक्षर का युद्ध।

ढाई अक्षर का मित्र

और ढाई अक्षर का शत्रु।

ढाई अक्षर का प्रेम

और ढाई अक्षर की घृणा।


*जन्म से लेकर मृत्यु तक*

*हम बंधे हैं ढाई अक्षर में।*

*हैं ढाई अक्षर ही वक़्त में,*

*और ढाई अक्षर ही अन्त में।*

 *समझ न पाया कोई भी*

*है रहस्य क्या ढाई अक्षर में।*

 🚩भारतीय संस्कृति संघ🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

---------------------------------------------------------

हि घ्या rajesh addition


ढाई अक्षर WA *पोस्ट*

 ढाई अक्षर चा *दोस्त*।

आणि ढाई अक्षर ची *गोष्ट*

 ढाई अक्षर चा *गर्व*

आणि ढाई अक्षर चा *धर्म*

ढाई अक्षर हे *प्रेम*

आणि ढाई अक्षर चे *वर्म*।

ढाई अक्षर हे *कर्म*

आले ढाई अक्षर मधे *सर्व*।


कबीर यांचा दोहा प्रसिद्ध आहे

"पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, 

पंडित भया न कोय,

ढाई आखर प्रेम का, 

पढ़े सो पंडित होय"

ह्याच point वर ह्या post वर *ढाई* अक्षरं (अडीच अक्षरं) घेऊन comments केली असावी असं वाटतं मला.🙏🏻

***********************************************

25-Dec-2020

WA वर ही post पावली,

एक दिवस तु मरशील

सर्व जण रडतील

उद्या सर्व हसतील

परवा पोटभर जेवतील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...* 


एक दिवस पैसा अडका

स्वतः चा कपडा लत्ता

काजु बदाम भत्ता

इथेच सर्व सोडशील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*


एक दिवस सोन्या चांदीने

भरलेली आलमारी

वातानुकूलित चार चाकी

इथेच सर्व सोडुन जाशील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*


एक दिवस बगीचाने

भरलेली तुझी शेती

धान्याने भरलेली पोती

गळ्यातला सोन्याचा मोती

इथेच सर्व सोडुन जाशील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*


एक दिवस तुझा तो 

आलिशान बंगला

सोन्यासारखी बायको

हिर्‍या सारखे पोरं

सर्व इथेच सोडून जाशील

*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*


*सांग ना स्वतः साठी*

*तु कधी जगशील...*

🙏🏻🙏🏻💞🙏🏻🙏🏻


*म्हणून तर स्वत: साठी कघीतरी जगा, मनाला आवडेल तसच वागा*


वाचलं आणि खूप पटलं

स्तब्ध बसलो,

या ओळी लिहील्या


rajesh addition..

होतील धूसर आठवणी
संपतील तुझ्या साठवणी
देवाघरी जेव्हा पाठवणी
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*

तुझं ते गोड हसणं
तुझं ते देखणं दिसणं
होईल सराव तुझं नसणं
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


आठव फक्त पडता दृष्टी
नाही आठवणींची वृष्टी
दृष्टी आड असते सृष्टी
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


जगण्याची असते कमाल
श्वास तोवर च धमाल
धन्याचा आपण हमाल
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


विकेल तुझे सामान
एकदा सुटताच दामन
कसला मान न सन्मान
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


म्हणून ठेव याचे भान
नसेल माहीती तर जाण
वाच गीते चे तत्वज्ञान
इथेच सर्व सोडशील
*सांग ना स्वतः साठी*
*तु कधी जगशील...*


--------------**------------***------------**--------------06- Feb-2021

उषास्वप्न---

होता आयुष्यावरी प्रहार 

झाला दुःखाशी  करार

घुसमटे श्वास माझा 

दुभंगले आरपार....


उलघाल विस्फोटाची

सरे मनाची ती हाय

माझ्या  वेदनेला फुटो

आता अक्षरांचे पाय


संपले शब्दांसंगे भांडण

अर्थाच्या काथ्यासवे कांडण

माझ्या सोबत वावरणारे एकाकीपण 

अंधाराच्याही सावलीतले भीषण


आकाश मोकळे झाले 

किरण डोकावे पहिले

खोल मनाच्या दरीत 

उषास्वप्न  विसावले

      सौ.छाया फडणीस. 5/2/2021.

rajesh addition

पुन्हा त्याच्या सह नांदणं

जरी असे तिथे भांडण

पुन्हा नवस्वप्न मांडणं

छायागीत हे भावले !


---शीघ्रकवी

---------------------------****----------****-----------------



हि घ्या addition

आठवणींच्या इतक्या लाटा,

कधी मोजल्या नाहीत,

काटे तुडवलेल्या पायवाटा,

कधी मोजल्या नाहीत.

आयुष्य संपत आलं,

पण हिशेब कधी केला नाही


मित्रांबरोबर किती झोकले,

स्वैर प्याले

कधी मोजले नाहीत,

आपल्यांशीच किती

वैर झाले,

कधी मोजले नाहीत

आयुष्य संपत आलं,

पण हिशेब कधी केला नाही


आयुष्य धुंदीत जगलो

किती कमावले

कधी मोजले नाहीत

अथक केलेल्या कामांनी

किती दमवले

कधी मोजले नाहीत

आयुष्य संपत आलं,

पण हिशेब कधी केला नाही.


जमाखर्च लिहीणे माझं

काम नाही

चित्रगुप्त असो यमधर्म वा

राम पाही !!


---शीघ्रकवी राजेश्वर


.---------------------****----------****-----------------

      *“मैत्री नको तोडूस”*

                  (..डॉ. स्वप्नील मानकर )


हा आहे खूप फटकळ !

तो आहे फारच खडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


नातेवाईकांसारखा तो !

आयता नसतो मिळत !!

मित्र कमवावा लागतो !

असंच मन नसते जुळत !!

हृदय वेगळे असले तरी !

स्पंदने सोबत धडकतात !!

दोघांच्या ही मनामध्ये !

समान विचार चालतात !!

सॉरी,थँक्सला थारा नसे!

मानाकरिता नको अडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


तू जातो निराशेत कधी !

भकास वाटते सारे रान !!

रडण्यास मिळता खांदा !

निवळतो मनावरील त्राण !!

जिथे कुणी कामी पडेना !

तिथे मित्र हजर असतो !!

आपल्यावर होणारे वार !

लीलया झेलत दिसतो !!

कठीण संकटांना मुळी !

तू एकटा नको भिडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


वादविवाद जेव्हा होतो !

स्वतःहून सॉरी म्हणावे !!

चूक कुणाचीही असो !

आपणच नमते घ्यावे !!

वाद करून जिंकल्यास !

बक्षीस थोडीच मिळते !!

अबोला जास्त लांबला !

की त्याचे महत्व कळते !!

छोड ना यार जाने दे !

चिंध्या नको फाडुस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


जीवन एकदाच मिळते !

मनसोक्त घ्यावे जगून !!

मैत्रीला मात्र काळजात !

आजन्म ठेवावे जपून !!

जात, पात, धर्म, लिंग !

या पलिकडले हे नाते !!

सर्व नात्याहूनी जगात !

सर्वश्रेष्ठ समजले जाते !!

तोडण्यापूर्वी कर विचार !

नंतर एकटा नको रडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*


👌🏻👌🏻

rajesh addition,


'व्हिटामीन M मैत्रीत मिळते !

मनसोक्त घ्यावे मागून !!

नाती जन्माने  मिळतात !

मैत्र-जीवाचे शोधावे जागून !!

राजकीय मत, कर्म, भिन्न !

या पलिकडले हे नाते !!

सर्व नात्याहूनी जगात !

दोस्ती-गीत गायले गाते !!

सोडण्यापूर्वी कर विचार !

चूक, बरोबर यात नको पडूस !!

            *क्षुल्लक कारणासाठी !*

            *यार मैत्री नको तोडूस ..!!*'

---------------------------------------------------

*मनपाखरु*


रात  चांदण्यात वाहते ग

डोळ्यात माझ्या  तू नाहते ग !


अशी कशी तुझी न्यारी रंगत  ग

गालांवर चुंबनांची पंगत  ग !


गालावरच्या तुझ्या  खळीत ग

ओठांची माझी होडी तरते ग !


अंगांगावर इंद्रधनु फिरते ग

वेडे फुलपाखरु कसे झुलते ग !


रंगबाव-या हिरव्या माझ्या मनी

पारिजातकासम तू  फुलते ग !


  कवी प्रदीप  गुजराथी,        

      मोबा. 9422270490

खरचं प्रदिप खूप छान गीत 👌🏻👍🏻👍🏻


rajesh addition


*श्वासाचे मोरपीस फिरते गं*

*मनात उधाण भरती गं !*


*पापणीत स्वप्न रंगविभोर गं*

*भास की सत्य समोर गं !*


*नजरेत बांधणं किती गं*

*बेभान चांदण-मिठी गं !*

        ------------------------------









Monday, 26 October 2020

Thanks to "Brown Leaf" :Aditi Deodhar

 

मी कधीहि कुठेहि असलो तरी रस्त्याच्या कडेला, टेकडीवर तसेच घरांच्या छपरावर,शेडच्या पत्रांवर साठलेला वाळलेला पाचोळा दिसला की अक्षरशा हाव सुटते, शुध्द सोने च हे, ठासून भरलेले N,P K हे (nitrogen,phosperous pottassium) . पाठीवर एखादी bag असती तर हा पाचोळा कोंबून भरुन बाल्कनी गार्डन साठी नेला असता,काय करता येईल ह्या पाचोळ्याचे नियोजन? असा विचार नेहमी येतो,

त्यात मी हा लेख वाचला, आसूरी आनंद झाला. मी ही त्यात सामिल होणार आहेच. ही कल्पना सुचली आणि वाढवली यासाठी आदिती देवधर यांचे आभार,लेखाबद्दल   संपदा सोवनी व लोकसत्ता टीम चे आभार---राजेश मोराणकर WA 0097455029913


Thanks to Loksatta 25-Oct-2020

copy n paste

वाळलेल्या पानांचे सोने

पर्यावरणासाठी जनजागृती करणाऱ्या आदिती आहेत आजच्या दुर्गा. 




संपदा सोवनी

घराच्या भोवती भरपूर झाडे असणे ही आनंददायी गोष्ट असली तरी वाळलेल्या पानांच्या विल्हेवाटीचा मोठाच प्रश्न उभा राहतो. ही पाने जाळावी तर त्या पानांमधील अन्नद्रव्ये फु कट जातात, शिवाय धुरामुळे प्रदूषण निर्माण होते ते वेगळेच. म्हणूनच देशात एकही वाळलेले पान जाळले जाऊ नये, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून पुण्याच्या आदिती देवधर यांनी २०१६ मध्ये ‘ब्राऊन लीफ’ हे व्यासपीठ सुरू के ले. आज चार हजारांच्या वर लोक त्यात जोडले गेले असून एक चळवळ तयार झाली आहे.  हा उपक्रम सुरू झाल्यापासून २०१९ पर्यंतच्या तीन वर्षांत ५० हजार पोती वाळलेली पाने जाळली जाण्यापासून वाचवण्यात ‘ब्राऊन लीफ’ला यश आले आहे. पर्यावरणासाठी जनजागृती करणाऱ्या आदिती आहेत आजच्या दुर्गा.

आदिती देवधर

पुण्याच्या आदिती देवधर यांचे शिक्षण खरे तर गणित या रूक्ष समजल्या जाणाऱ्या विषयातले. उच्चशिक्षणानंतर आदिती यांनी सहा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम के ले आणि नंतर तीन वर्षे एका सामाजिक संस्थेत याच विषयातील सल्लागार म्हणूनही काम के ले. उत्सुकता म्हणून आदिती यांनी २०१२-१३ मध्ये प्रकाश गोळे यांच्या ‘इकॉलॉजिकल सोसायटी’ संस्थेतून नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनासंबंधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण

के ला. निसर्ग संरक्षणाविषयीच्या आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनेक गोष्टी त्यानंतर त्यांच्या विशेषत्वाने लक्षात येऊ लागल्या, काही गोष्टी खुपायला लागल्या. शहरातील नद्यांची स्थिती आणि वाळलेली पाने ठिकठिकाणी जाळली गेल्यामुळे होणारे प्रदूषण या दोन प्रश्नांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले. आणि त्यांनी त्यालाच आपल्या कामाचे लक्ष्य बनवून वाळलेल्या पानांचे सोने बनवणारी ‘ब्राऊन लीफ’ ही संस्था स्थापन के ली आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंत ५० हजार पोती वाळलेली पाने जळण्यापासून वाचली आहेत.

आदिती यांच्या इमारतीच्या आवारात एक मोठा ‘वावळ’ वृक्ष होता. त्याच्या गळालेल्या पानांचा मोठा ढीग साचतो हे पाहून आदिती यांनी तो जाळू नका, म्हणून संबंधितांना सांगितले. पण जाळले नाही, तर या पानांचे काय करता येईल, याचे उत्तर त्या वेळी त्यांच्याकडेही नव्हते. मग त्यांनी समाजमाध्यमांवर यासंबंधी मदत मागितली आणि अनेकांनी अनेक पर्याय सुचवले. त्यातच घरी सेंद्रीय भाजीपाला पिकवण्या-या सुजाता नाफडे यांनी ही वाळलेली पाने आपण खत म्हणून वापरु शकू असे सांगितले . नाफडे यांनी फुलवलेली बाग पाहून आदिती यांच्या विचाराला दिशा मिळाली आणि त्यांनी बागकाम करणाऱ्या इतर लोकांशीही बोलून माहिती घ्यायला सुरुवात के ली. गच्चीवर बाग करणाऱ्यांना मातीची कमतरता भासत असल्यामुळे वाळलेल्या पानांचा त्यांना चांगला उपयोग करून घेता येतो. मात्र रस्त्याच्या कडेला ढिगाने आढळणाऱ्या वाळलेल्या पानांमध्ये गुटख्याच्या पुडय़ा आणि प्लास्टिकसारखा कचरा असल्याने के वळ स्वच्छ वाळलेली पाने कु ठे मिळतील, हा प्रश्न असतोच, हे आदिती यांच्या लक्षात आले. मग आदिती यांनी वाळलेल्या पानांची विल्हेवाट लावू इच्छिणारे आणि वाळलेली पाने हवी असणारे अशा लोकांचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप के ले, तसेच एक संकेतस्थळ आणि

फेसबुक पानही सुरू केले. आदिती यांना अनपेक्षितरीत्या प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि व्हॉटस्अ‍ॅपवरून वाळलेल्या पानांच्या माहितीची देवाणघेवाण ठरू लागली. यात आर्थिक व्यवहार नसून वाळलेली पाने साठलेल्यांनी ती पोत्यांत भरून ठेवायची आणि पाने हवी असलेल्यांनी ती घेऊन जायची असे काम सुरू झाले आणि ‘ब्राऊन लीफ’ हे व्यासपीठ तयार झाले. ज्या लोकांनी बागेसाठी इतरांकडून वाळलेली पाने नेली होती, त्यांनी आपल्या बागेतील फळाफु लांचे फोटो समाजमाध्यमांवर टाकायला सुरुवात के ली आणि त्यातून इतर मंडळींना प्रेरणा मिळत समविचारी लोकांची ‘ब्राऊन लीफ कम्युनिटी’ घडू लागली. त्यात बागकामाचा अनुभव असलेल्या लोकांबरोबरच वनस्पतीशास्त्रातील काही तज्ज्ञ सहभागी झाले. त्यांचा सल्लाही नवीन लोकांना मिळू लागला.

साठलेली वाळलेली पाने दुसऱ्यांना देणे, या पानांपासून स्वत:च खत बनवणे आणि जमिनीत ओलावा राहावा यासाठी त्यावर वाळलेल्या पानांचा थर पसरवून ‘मल्चिंग’ करणे या तीन गोष्टींबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यास आदिती यांनी सुरुवात के ली. त्यासाठी त्यांनी एक मार्गदर्शनात्मक ‘गाइड’ तयार के ले. ते अनुभवी व्यक्तींकडून तपासून घेऊन संके तस्थळावर ‘पीडीएफ’ स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिले. याच गाइडमधील विषय घेऊन एक व्हिडीओ मालिका तयार करून तीही संके तस्थळावर पाहायला मोफत उपलब्ध के ली. घरच्या घरी किं वा सोसायटीत खत तयार करण्याबद्दल लोकांच्या मनात खूप शंका असतात. अनेकदा काही तरी चूक होते, कचऱ्याचा वास येतो आणि अशा कारणांनी अनेक लोक त्याकडे वळत नाहीत. त्यांच्यासाठी ‘ब्राऊन लीफ’च्या गाइड आणि व्हिडीओज्मुळे शंकानिरसन होऊ लागले. कचऱ्यापासून खत करताना पिंजऱ्यासारखी रचना वापरण्यासारखे काही उपयुक्त पर्याय या गाइडमुळे लोकांसाठी सोपे झाले. पर्यावरणपूरक बागकामाची नुकतीच सुरुवात के लेल्या लोकांना प्राथमिक स्वरूपात पावले टाकताना या मोफत साहित्याचा उत्तम उपयोग होतो.

सध्या ‘ब्राऊन लीफ’चे तीन व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप सुरू असून पुण्यात या व्यासपीठाद्वारे ६५० सदस्य एकमेकांच्या संपर्कात असतात, तर फे सबुकवर ३,५०० लोक संपर्कात आहेत. पुण्याबाहेरीलही काही उत्साही मंडळी या उपक्रमात सहभागी झाली आहेत.

फे ब्रुवारी २०१६ मध्ये उपक्रम सुरू झाल्यापासून २०१९ पर्यंतच्या तीन वर्षांत ५० हजार पोती वाळलेली पाने जाळली जाण्यापासून वाचवण्यात ‘ब्राऊन लीफ’ला यश आले आणि त्यानंतरही उपक्रम सुरूच आहे. या उपक्रमाबद्दल आदिती व्याख्याने, वेबिनार्स आणि स्वतंत्र मार्गदर्शनही देतात. ज्या लोकांना गाइड आणि व्हिडीओ मालिका पाहिल्यानंतरही आणखी वेगळे मार्गदर्शन हवे असते, त्यांच्यासाठी आदिती या सशुल्क अभ्यासक्रमही घेतात.

पुण्याप्रमाणेच इतर शहरांमध्येही लोकांनी त्यांच्या स्तरावर ही संकल्पना राबवावी यासाठी आदिती जनजागृती करतात. वाळलेल्या पानांचा निसर्गातच वापर करून घेण्यासाठी समविचारी लोकांचे गट करून कसे व्यासपीठ उभारावे आणि ते कसे उत्तम चालवता येईल, याविषयी सध्या आदिती आणखी एक गाइड लिहीत असून भविष्यात या विषयीचे प्रारूप उभे करण्यासाठी त्या सध्या प्रयत्नशील आहेत.

पर्यावरण रक्षणात हातभार लावण्यासाठी फार मोठी पावले टाकणे सर्वाना शक्य नसले, तरी नागरिक आपल्या कु टुंबाच्या स्तरावर वाळलेल्या पानांची योग्य विल्हेवाट नक्की लावू शकतील किं वा त्यापासून खतही करू शकतील. सोपेपणा आणि सर्वसमावेशकता असलेले आदिती देवधर यांचे ‘ब्राऊन लीफ’ व्यासपीठ वाढावे आणि त्यामुळे अनेकांना पर्यावरणपूरक बागकामाची प्रेरणा मिळावी, हीच सदिच्छा.

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा

सहप्रायोजक :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

पॉवर्डबाय :  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.

यश कार्स

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

संपर्क – आदिती देवधर

‘ब्राऊन लीफ’, पुणे

ईमेल – pune.brownleaf@gmail.com

दूरध्वनी -७३५००००३८५

Sunday, 27 September 2020

सारा' माल तुम्हारा, मैने बाँध लिया है पॅकेटमें तेरे नए शौककी नई अदा, हम इनहेल करेंगे पलभरमें

 'सारा' माल तुम्हारा, मैने बाँध लिया है पॅकेटमें

तेरे नए शौककी नई अदा, हम इनहेल करेंगे पलभरमें

तेरे नये रूप की नयी मजा, टिव्ही देखा करेंगे पल पल में 

देख के तेरी सूरत, कट जाता हैं ,टाईम पल में जीवन का बोरींग,

बाॅलीवूड की तुम मूरत,तुम को पा कर सफल हुआ हैं मेरा ये लाॅकडाऊन 

चमकी मेरी किस्मत की रेखा, इन कॅमेरों के जगमग में 


हम और पास आयेंगे, हमे और पास NCB लायेगा 

दुनिया को नज़र आयेंगे हम जब जब हेड लाईन होगा 

आयी ऐसी बेला, एक पल को भी मुझे अकेला छोड़ ना रणवीर तुम 

पास ही रहना, वकील देना, मिडीया के हलचल में 


Monday, 21 September 2020

What an idea sir-ji ..." Ticket to Nowhere !! "

 

ब्लाॅग रायटर चे काम काय तर बसल्याजागी कल्पनेची उंची उडान भरणे !!

आपली car ब-याच दिवसात दिवसात चालली नसेल तर आपण car battery चार्ज होण्यासाठी काय करतो, car बाहेर काढून एक फेर फटका मारुन येतो,आपल्याला कुठेच जायचं नसतं,फक्त battery चार्ज करुन car जागेवर पार्क करतो.

कोवीड 19 मुळे हवाई व्यवसायाचं कंबरडं मोडलयं.थोडी flights सूरु आहेत.पण बरीचशी जाग्यावर उभी आहेत. बोंबलायला problem हा आहे कि ठरावीक काळात ठरावीक उड्डान-तास केली नाहीत तर पायलट चे flying licence रद्द होऊ शकते.विमान पण पार्क करण्यासाठी बनवलेले नसते तर उडण्यासाठी असते.

यावर उपाय म्हणून मी कसम से तीन महीन्यापूर्वी मित्रांमधे बोललो होतो,
" त्यांनी flights तास दिड तास उडवून पुन्हा जिथे होती तिथं पार्क करावीत".


मंडळींनी हसण्यावारी नेलं,
'मजाक अच्छा कर लेते हो वगैरे.'

आज मला पश्चाताप होतोय मी तोंडाची वाफ दवडण्याऐवजी ह्यावर का नाही लिहीलं?
(कपाळावर हात मारल्याची emoji)

आता तुम्ही म्हणाल, क्या हुआ?.

हे वाचून मला असूरी आनंद झाला, की ह्यातल्या अर्ध्या कल्पनेवर मी विचार केला होता.

काही sharp minds एक mind blowing कल्पना घेवून आलेत म्हणे.
'Ticket to nowhere'
कहर म्हणजे its selling like hot cakes.


प्रकार काय आहे,
"विमानात बसवणार, उडणार, तासभर फिरवून पुन्हा आहे तिथ चं land करणार !!! "

ठिक आहे एअरलाउन्स ची मजबूरी आहे.
पण हे तिकिट buy करणारे कोण आहेत,
ज्यांच्या कडे इतका वेळ, पैसा आणि उत्साह आहे ??
fact is strenger than fantacy !
(They tapped the ppls 'travel starvency' असं म्हणूू कि दुनिया झूकती है झूकानेवाला चाहीये म्हणू ?)



(एक गाणं पण होतं वाटतं,

A ticket to nowhere

song lyrics


The train is comin' at 6:05

And I'll be gettin' on it to take a long ride
Back to an apartment so empty inside
With loneliness the only thing that's waiting

I bought my ticket today
I just paid for one way
The price was too high for returning

I have spent all my love
Getting none in return
I bought a ticket to nowhere today


But now she's found the kind of love
That she's been needing

I bought a ticket to nowhere today
I bought a ticket to nowhere today
I bought a ticket to nowhere today
I bought a ticket to nowhere today
I bought a ticket to nowhere today
)


आता हे वाचा

https://viewfromthewing.com/taiwans-airlines-are-offering-flights-to-nowhere-and-they-sell-out-instantly/

copy paste

Taiwan’s Airlines Are Offering Flights To Nowhere, And They Sell Out Instantly

The two major Taiwanese airlines, Star Alliance member EVA Air and SkyTeam’s China Airlines, are running flights to nowhere in August. Both carrier’s flights instantly sold out.

Taiwan has been one of the real Covid-19 success stories, although the World Health Organization under China’s thumb has refused to recognize this. Even the Johns Hopkins tracking dashboard asterisks Taiwan, with fewer than 500 cases and only 7 deaths. Part of the price of their early lockdown is that they’ve cut themselves off from the rest of the world for longer than most.

For instance there are currently just 5 weekly flights between Taipei and Shanghai. (There are six Beijing flights per week, Hong Kong however now has more than daily service across three airlines.)

In June Taipei’s near-empty regional Songshan airport offered pretend flights where people could come to the airport and pretend to leave the country, boarding a plane and then getting back off.

Now the nation’s – and yes I’m calling Taiwan that – two main carriers have taken things a step further, “taking passengers around the nation for several hours before landing at the same airport.”

  • EVA Air offered this August 8 only, their local Father’s Day
  • China Airlines offered it for both August 8 and August 15

The China Airlines flights include meals at the airport lounge prior to flight and afternoon tea on board. This was limited to children between the ages of 6 and 10 along with their parents, and coach tickets for one child and a parent sold for $205 (an additional parent cost $122.50), while business class for a child and parent sold for $272.

The EVA Air flight is operated by a Hello Kitty aircraft. Inflight meals are branded by a Michelin three star chef. Coach cost $180, while business class sold for $214.



Low cost carrier Tigerair Taiwan reportedly is operating a similar sold out flight on August 6 including “Michelin meals and champagne.”

The Tigerair pleasure flight, which will hover over Taiwan and Japan’s Kyushu island, is priced at NT$8,888. The flight is limited to only 90 passengers, who will each be gifted with a round-trip ticket for any destination in Japan to be used within a year.

New carrier Starlux Airlines has applied to Taiwan’s Civil Aeronautics Administration to offer a flight August 7 on board an Airbus A321neo, and piloted by the airline’s chairman, but they haven’t received government approval to sell tickets as of this writing.

(HT: Demetrios)

      ---------------------------------------------------

आणि एक report

https://asia.nikkei.com/Business/Travel-Leisure/Flights-to-nowhere-give-homebound-Taiwanese-a-taste-of-travel


Flights to nowhere give homebound Taiwanese a taste of travel

Starlux and other airlines respond to locals' hunger for international trips



Taiwanese carrier Starlux has teamed up with Hong Kong-based travel startup Klook to offer flights that start and end at the same airport. (Photo by Ken Kobayashi)

TAIPEI/TOKYO -- Taoyuan International Airport has been rather empty since the coronavirus pandemic shut the door on overseas travel, so it was a rare sight on Friday morning when nearly 200 passengers lined up to board a flight. The only catch: they weren't actually going anywhere.

The Starlux Airlines flight, which took off at 11 a.m., cruised along Taiwan's east coast and over the Philippines before retuning to Taoyuan. The flight did not touch down anywhere, but for travel-starved Taiwanese, it was enough.

"We are so excited to take this flight! This is my first time to board a plane this year. I already drafted a long duty-free shopping list for myself and my colleagues," Peter Wu, who was traveling with a friend, told the Nikkei Asian Review.

"I overslept a little bit and failed to secure a window seat," said Polon Chen, another traveler. "We might do this again later this month. I want to go abroad so badly!"

Passengers lined up in front of the check-in counters even before they opened at 8 a.m., and most check-ins were completed before 9 a.m., according to Starlux.

The flight was piloted by K.W. Chang, the founding chairman of Starlux who also acted as tour guide, and included Michelin-starred local contemporary cuisine and onboard duty-free shopping.


Starlux offered the flight in cooperation with Klook, a Hong Kong-based travel booking platform. Dubbed the "wanting to go abroad" package, prices start at 4,688 New Taiwan dollars ($159.80). Those wanting a more complete travel experience can add a stay at a five-star hotel in Taiwan after the flight.

"All the packages for the flight sold out in the first few minutes after the sale is available online, so we immediately look to launch another flight likely around mid-August," Nieh Kuo-wei, Starlux's corporate communication chief, told the Nikkei Asian Review. "We are amazed by how many people are desiring to travel."

Not everyone is so surprised. According to Klook, many people used to traveling are longing for even a semblance of the real thing.

"The desire to explore the world remains strong despite international travel restrictions," said Marcus Yong, vice president of marketing in Asia-Pacific at Klook. "In fact, people are missing even the most simple travel moments, such as using their passport or collecting their luggage at the baggage carousel."

Passengers on such flights are required to present a valid passport, though they are not stamped upon departing or returning.

Starlux is not the only airline to introduce "pretend-traveling" packages, either. Major Taiwanese airlines including China Airlines and Eva Airways are introducing similar special packages. Eva Air, Taiwan's largest privately owned airliner, is launching a special destinationless flight on Father's Day on Saturday.

The flight, which is priced at 5,288 New Taiwan dollar and will use Eva Air's Hello Kitty jet, will depart from Taiwan Taoyuan International Airport and arrive at the same airport on the day. The plane will fly along Taiwan's eastern coast toward the southern part of the island at an altitude of between 20,000 and 25,000 feet, from where passengers will be able to view the country's eastern coast clearly if visibility on that day allows.

"The sales for the special flight on the Father's Day are so good that we have decided and just got approval to do another special flight the weekend after," a spokesperson at Eva Air told the Nikkei Asian Review.

China Airlines, Taiwanese biggest airliner, is also offering two similar flight packages on Saturday and Aug. 15. The state-backed airliner's package includes a flight attendant providing tutoring sessions for children and a mock cabin for passengers to visit.

Tigerair Taiwan, a budget subsidiary of China Airlines, is partnering with Taiwanese travel startup KKday to introduce a flight program that offers circulating Taiwan on the air and enjoy a Michelin-star cuisine in-flight. The package, which costs at 8,888 New Taiwan dollar, includes a roundtrip ticket from Taiwan to Japan, valid for one year after the border controls of the two islands are lifted.

Flying, experts say, holds a special place in Taiwanese travelers' hearts.

"Although domestic flights in Taiwan are still in operation, 'taking the plane' is synonymous with going abroad for vacation for most Taiwanese," said Daniel Cheng, founder of Taiwanese tourism networking platform Redefine Tourism Mixer. While the Taiwanese domestic travel market is witnessing a rebound through the government's domestic travel subsidies, "creative and new types of local experiences are welcomed" by those bored at home, he added.

"Taiwan citizens make over 16 million journeys abroad a year, making overseas trips a major consumption habit," said Muchou Ko, vice chairman of the Taiwan Tourism Development Association. "People prefer these 'fake flights' to virtual tourism as they can have a real experience."

Passengers are able to enjoy in-flight duty-free shopping without entering a foreign country because the flights pass over Japanese or Philippine airspace. China Airlines' route, for example, will fly over Ishigaki Island, while Eva Air will pass the western part of Ryukyu Islands, according to the companies.

Key airports in Taiwan are also looking to revive their businesses. Taoyuan International Airport, the biggest international airport in Taiwan, has launched a $30 day-trip event on Thursdays and Saturdays in August, to allow 400 visitors each day to see how airports operate, watch sunsets, shop duty-free items, enjoy afternoon tea and lucky draws at the airport. The smaller Taipei Songshan Airport close to downtown hosted similar day trips that became a hit in July.

"We introduced three day trips at the Songshan Airport in July, as we tried to raise the utilization of the airport," a spokesperson at Taiwan's Civil Aeronautics Commission, which oversees Songshan Airport, told the Nikkei. "The day trips more or less helped the small shops businesses at the airport."

Taiwan's GDP for the April-June quarter unexpectedly swung into the negative territory, falling by 0.73% from a year ago, which is the first year-on-year decline in the past 17 quarters. The Taiwanese government attributed the drop to the massive decline in international travelers since the island closed the border for foreigners in the mid-March for Covid-19.

The tourism industry was hit significantly, as the number of arriving passengers, including Taiwanese nationals and foreigners, fell more than 99% during the quarter from a year ago, the government said. Lion Travel, the nation's largest listed travel agency, saw its revenue vaporizing more than 90% on the year in the June quarter. Revenues of Eva Air and China Airlines in the last quarter fell 56% and 38% on the year, respectively.

new addition:

Loksatta dated 21-Sept-2020

https://www.loksatta.com/trending-news/qantas-flight-to-nowhere-sells-out-in-10-minutes-scsg-91-2280757/




ऑस्ट्रलियाच्या ‘क्वांटास एअरलाईन्स’ने सुरु केलेल्या फ्लाइट टू नोव्हेअर म्हणजेच कुठेही न जाणाऱ्या विमानाची तिकीटं अवघ्या १० मिनिटांमध्ये संपली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ‘कुठेच न जाणारं विमान’ म्हणजे काय? तर करोनामुळे अनेक महिने विमान प्रवासावरील बंदी नंतर हळूहळू देशांतर्गत विमानप्रवासाला परवानगी देण्यात आल्यानंतर क्वांटासने विशेष विमानाची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या विमानाच्या नावाप्रमाणेच ते कुठेही जाणार नाहीत. म्हणजे जाणार पण ज्या विमानतळावरुन उड्डाण घेईल तिथेच हे विमान पुन्हा उतरणार. त्यामुळेच या विशेष सुविधेला ‘फ्लाइट टू नोव्हेअर’ असं नाव देण्यात आलं आहे.

‘द इंडिपेन्डट’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘फ्लाइट टू नोव्हेअर’ची विमान ही सात तास उड्डाण करुन पुन्हा टेक ऑफ घेतलेल्या विमानतळावरच उतरतील. या तास तासांच्या प्रवासादरम्यान विमान देशातील सर्वात सुंदर ठिकाणांवरुन जाईल. ही विमानं सिडनी विमानतळावरुन उड्डाण घेणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी हे पहिले विमान उड्डाण घेणार आहे. या उड्डाणादरम्यान विमान युरु, द ग्रेट बॅरियर रिफ आणि ऑस्ट्रेलियातील इतर प्रमुख पर्यटनस्थळांवरुन प्रवास करणार आहे. या विमानामध्ये एकूण १३४ सीट आहेत. बोईंग ७८७ शैलीच्या या विमानातील तिकीटांचे दर ५७५ डॉलर (अंदाजे ४२ हजार रुपये) ते दो हजार ७६५ डॉलर (अंदाजे २ लाख) दरम्यान ठेवण्यात आले होते. मात्र अवघ्या १० मिनिटांमध्ये फ्लाइट हाऊसफूल झालं. “आमच्या कंपनीच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने विक्री झालेलं हे उड्डाण ठरलं आहे,” असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

या उड्डाणाला मिळालेल्या प्रतिसादावरुन लोकांना प्रवासाची आणि त्यातही विमानप्रवासाची खूप आठवण येत असल्याचे स्पष्ट होतं आहे. असाच प्रतिसाद मिळत राहिला तर आम्ही भविष्यात अशाप्रकारची काही आणखीन उड्डाणांचा नक्कीच विचार करु. सध्या आम्ही आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्याची वाट पाहत आहोत, असंही कंपनीचे प्रवक्ते म्हणाले. सिडनीबरोबरच कंपनीने अंटार्टीकालाही ‘जॉय राईड’ प्रकारचे विशेष उड्डाण आयोजित केलं आहे. युके आणि ऑस्ट्रेलियादरम्यान न थांबता सल १३ तास उड्डाण करणाऱ्या विमानांच्या मदतीने मेलबर्नवरुन ही विशेष सहलीसारखी उड्डाणे ठेवण्यात आलेली आहे.

या उड्डाणांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच पर्यावरण प्रेमींनी याला विरोध केला आहे. आता कुठे वातावरण जरा स्वच्छ झालेलं असतानाच अशापद्धीतने इंधन वाया घालवणं योग्य नसल्याचे मत पर्यावरण प्रेमींनी मांडलं आहे.




---------**-----------*-----------**-----------*--------**-----------*------------