python programming AI, ML story
पण विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही,
तो पुन्हा laptop PC कडे गेला,anaconda सर्प फुत्कारुन पुढे आला त्याकडे दूर्लक्ष करुन python compiler वर grade separation च्या समस्या वर काम करु लागला,
काल youtube वर पाहील्याप्रमाणे त्याने
while True: # म्हणजे user Enter साठी पुन्हापुन्हा run करायला नको.
आणि
marks = int ( input (" Enter yr marks"))
लिहिले, मग शाणा बनून नंतर int ऐवजी float असे edit करु असा विचार केला..काय करणार आजकालच्या पोरांचा decimal मधे cut-out असतो ना.
आमच्या वेळी marks celcius मधे मिळायचे आजकाल च्या पोरांना farenheit मधे मिळतात, विक्रमादित्याने मौनातच WA वर चा joke मारला !
काम करतांनाच काहीतरी लोच्या झाला हे कळले, कारण marks > 60 Enter केले तर
" Passed with first class" असा बरोबर output येत होता, पण marks >=75 ह्या condition ला " Failed" असा output येत होता.
तेव्हा python compiler मधे बसलेला AI, ML रुपी वेताळ 'text to voice' converter मधून बोलला,
" हे राजन, इतक्या वेळा ही समस्या न सुटूनही तू ज्या चिकाटीने persivrence ने पुन्हापुन्हा प्रयत्न करतो आहेस ते वाकई काबील- ऐ-तारीफ आहे"
विक्रमादित्य काहीच उत्तर न देता,
'असं का होतय?' असा विचार करत आपण लिहीलेला program edit करुन save करुन पुन्हा run करत होता.
program विक्षीप्त output देत होता,
विक्रमादित्य डोके खाजवित विचार करत होता,
'ज्या अर्थी, " Enter yr marks". ही पहीली ओळ व्यवस्थीत exicute होतेय, आणि चुकीचे का होईना output display होतेय, म्हणजे if , elif,elif भागात काही घोळ असावा.
वैतागून विक्रमादित्याने, " Enter yr marks" आल्यावर input म्हणून 100 Enter केले व
"Passed with distinction" येण्याऐवजी
" Failed" असा output आला,
हे पाहून विक्रमादित्याची सटकली.
वेताळाने आता black humour चा आधार घेत सारथी शल्याप्रमाणे कर्णाचा तेजोभंग करायला सुरवात केली,
" हे बरं झालं मुंबई विद्यापीठाचे पेपर्स तपासायचं तुझ्याकडे दिलं नाहिये, काय करतोयस,100 मार्कस् वाल्याला सुवर्णपदक देशील की चक्क Failed ?"
वेताळ च्या sleging कडे दुर्लक्ष करत, विक्रमादित्याने स्थिरबुद्धि राहूल द्रविड किंवा आजचा अजिंक्य रहाणे सारखी batting सुरु ठेवली, धडाक्यात program edit करणे, व जे आता नको पण नंतर लागू शकेल त्यावर # हॅशटॅग लावून save व run चा धडाका लावला.
तिकडे वेताळाचे टोमणे मारणे सुरुच होते,
" हा हाहा, बरं झालं UPSC exam online examination चा program लिहायचं काम तुझ्याकडे देत नाहीत, हाहाकार माजवशील रे..."
तरीही विक्रमादित्य मौन धारण करुन काम करतच राहीला.
" हे राजन, 100 मार्कस् ला "Failed" हा output बरोबर का समजू नये?? हा program लिहायला तू "Failed" झालास असे तर python सुचवत नसेल (?!)
आता त्या else : नंतर च्या print च्या string च्या quotes मधे "program writer Failed" असे edit कर आणि hit Enter button.
ह्या समस्येचे उत्तर तू दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याचे....."
विक्रमादित्याने चुटकी वाजवून समस्यारुपी "सिगारेट' ची राख झटकली व हर्षोन्मादाने म्हणाला,
" सुटलं कोडं...
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,
जे पेरशील,तेच उगवेल."
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,
जे पेरशील,तेच उगवेल."
if आणि elif च्या conditions, न पहाता program थेट else: ची condition ची प्रिंट exicute करत होता,आधीच्या if, elif ,elif ह्या contions कदाचित loop च्या बाहेर असाव्यात, आता ठीक edit केलाय आणि
marks >= 75 and marks <= 100
ह्यात compare साठी == लिहायला विसरलो होतो, हे ही कारण असू शकतं,एवढे टोमणे मारायची गरज नव्हती"
"तू बोला..,मै चला कारण 'break' loop acted" असं म्हणून वेताळ अंतर्धान पावला.
marks >= 75 and marks <= 100
ह्यात compare साठी == लिहायला विसरलो होतो, हे ही कारण असू शकतं,एवढे टोमणे मारायची गरज नव्हती"
"तू बोला..,मै चला कारण 'break' loop acted" असं म्हणून वेताळ अंतर्धान पावला.
No comments:
Post a Comment