तो वैतागला होता.
म्हणाला, संस्कृत येत नाही.पण कधीतरी वाचलेल्या ओळी लक्षात राहील्या,
कवी देवाला प्रार्थना करतोय, मला कितीहि दु:ख दे,पर्वा नाही...पण
अ-रसीकेषू कवित्व निवेदनं
शिरसी मा लिख
मा लिख
मा लिख !!
भावार्थ: अ-रसीक dumb माणसाला कला दाखवायची वेळ आणू नकोस देवा, तसलं नशीब माझ्या कपाळावर लिहू नकोस.
एखाद्या गवयाने प्रचंड दमसास असणारी अलौकित तान घ्यावी ( ही घेतांना आकाशात वीज चमकावी तशी छातीत कळ यावी) आणि तान कशी वाटली म्हणून समोर बसलेल्याकडे पहावे आणि तो समोर पडलेला दो कौडीका पेपर वाचत असावा !!
एकाद्याने कल्पनेची उडान असलेली भावगर्भ कविता समोर च्या ला ऐकवावी आणि समोर बसलेला नेमका बहीरा असावा...
तो म्हणाला,तसचं माझं होतय का ..
modesty गेली तेल लावत, खुल्ला आत्मस्तुती करतोय.
चमकदार म्हणा witty म्हणा अशा posts मी मित्रांना frwd करतोय पण त्यांना झेपत नाहीये,
3-4 दिवसांपूर्वी पाठवलेल्या post ला आज खुणेने छान मिळतयं, याचा अर्थ तुम्ही strongly imcompatible ठरताय, तुमच्या मित्रमंडळींमधे.
तुमचा झपाटा त्यांना झेपत नाहीये,
मोठे लेख, science videos, market observation, witty jokes, tumche blogs, तुमची गाणी ,तुमचे यू ट्यूब त्यांना झेपत नाहीये.
मी शांतपणे ऐकून घेतलं,
म्हणालो,हे कळलं.
मग काय?
आधी उपवास कर,
grp मधे रहा dumb बनून,गणप्याचे जोक्स पाठव.
महफिल ये नही तेरी
दिवाने कही चल
क्या जानिये कहाँ से आती है कानों में सदा
ऐ दीवाने ग़म तेरा सब से जुदा
इस महफ़िल से उठा दिल,
न बहलेगा ये मतवाला
कोई सोने के दिलवाला,
कोई चाँदी के दिलवाला
शीशे का है मतवाले मेरा दिल
महफ़िल ये नहीं तेरी दीवाने कहीं चल
महफ़िल ये नहीं तेरी दीवाने कहीं चल
बेडूकराव डबक्यातून बाहेर पडा.
मोठं सरोवर गाठा,तिथले बेडूक काय म्हणतात पहा.
कधीतरी तिथले राजहंस काय म्हणतात पहा,
तिथले गरुड काय म्हणतात पहा.
"अ-रसीकेषू कवित्व निवेदनं
शिरसी मा लिख.
मा लिख
मा लिख !!"
No comments:
Post a Comment