Tuesday, 22 November 2022

आयुष्यभर एडीटर चे मत आपले म्हणून सांगितले

 आमचं काय होतयं, आम्ही आयुष्यभरडी एडीटरचं मतं  आमचं म्हणून सांगितलं.

(काल मी सकाळच्या उपसंपादकाच्या लिहीण्यावर प्रश्न उपस्थित केला....त्याने 10,000 कोटी आयफोन विकले म्हणून ठोकून दिलं, महाराज, जगाची लोकसंख्या 700 कोटी आहे, तर प्रत्येकाला 12 मोबाईल होतील !!, (actually ते एकूण रु.10,000 कोटी worth मोबाईल विकले होते. ))

अरे...तो व्हिडिओ पाहिलास का? तो पोरगा काय गातो. असं आम्ही कुठूनतरी आलेल्या पोस्टबद्दल बोलतो कारण अन्नू मालीकने त्या पोराचं कौतुक केलयं.इथं आम्हाला सेफ वाटतं,एक प्रकारे सर्टीफाईड विचार च आम्ही व्यक्त करत असतो.


शेजारचा पोरगा workshop मधे छान creative काम करतो, आम्ही मत व्यक्त करणार नाही. कारण तो कोणी  नाही.

तोच पोरगा sharq tank  मधे झळकला की आम्ही बोंबलून तो माझ्याशेजारी रहातो, हे सांगणार.

so & so पाहून/ वाचून / ऐकून मला आवडलं (खरचं आवडलं असलं तर) असं म्हणायला आपणच आपल्याला ब्रेक लावतो, म्हणूनच भिकारी स्वत:च्या कटो-यात स्वत:च पैसे टाकून ठेवतो, मग इतर विचार करतात कि पैसे टाकणारा मी पहिला जण नाही.

why do we have infirior complex about our own opinions?? why...


खरं तर आम्हाला कुठल्याचं गोष्टीतलं काहीच मत नाही. आतापर्यंत आम्ही 2,000 पोस्ट पाहील्या, लाईक केल्या, फाॅरवर्ड केल्या असतील, एकही आम्ही लिहीली नव्हती.


फोडिलें भांडार, धन्याचा हा माल । 

मी तो हमाल, भारवाही ॥


असे सारखचं अतिसेफ राहून कसं होणार?

डार्वीन चा सिध्दांत म्हणतो,

वापरा किंवा विसरा

Use it or lose it.

मग हळूहळू विचारशक्तीचं नाहीशी होईल का?!


कधीतरी आमची काही मतं असतील तर व्यक्त करुया

👌🏻👌🏻आणि 👍🏻 पेक्षा जरा वेगळं टाईप करुया किवा voice to text वापरुन लिहू या.

 

No comments:

Post a Comment