हे whatsapp वर पावले....आवडले.
समाधिस्थ.
अनाक्रोश क्षमा
जिथे विसावली
अनासक्त कर्मे
आचरली
ऐसा ज्ञानदेव
पावन तो योगी
गीतेच्या चिंतनी
स्थीरावला
ओवीबद्ध वृत्त
आनंद अक्षर
गीतेचे रहस्य
ज्ञानेश्वरी
लेशही उरले
कर्तव्य ना काही
कृतकृत्य काया
साधकाची
अनुज्ञा मागता
गुरूमाऊलीसी
नाथ निवृत्तीही
हेलावला
दिङमुढ सोपान
विव्हल मुक्ताई
नामदेव मनी
विषादला
वद्य कार्तिकाची
तिथी त्रयोदशी
मुहूर्त पावन
योजलेला
भावावस्थी लीन
विरक्तीचे रूप
समाधीची वाट
चाललेला
आसवांचे लोट
जनी उठलेले
माय बाप जणू
चाललेले
तुळशीपत्र दुर्वा
दर्भाचे आसन
बिल्वपत्र राशी
आच्छादिल्या
पद्मासनी स्थित
दृष्टी नासीकाग्र
योगी तयावर
आरूढला
शंख घंटा टाळ
ध्वनी उमळला
भजनाचा सूर
उसळला
पाळले पोसले
लाउनिया लळा
ज्ञानीयांचा राजा
चाललेला
जणू लोपलेला
आज दिनकर
योगी तो पावन
समाधिस्थ
©शिरीष मोराणकर
ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२६ व्या समाधी सोहळ्यानिमित्त.
-------------------------------------------------------------
मला हा form आवडला, मी addition लिहिली,
rajesh addition
नाचे वारकरी
७२६ वर्षे
मराठी हर्षे
ज्ञानेश्वरी ।।
अश्वस्थ शाखा
लागे हनूवटी
उघडली ताटी
एकनाथे।।
राहीले कोरडे
जयाचे अभंग
इंद्रायणी संग
तुकाराम।।
दिला वज्रलेप
पाउले झीजली
अश्रूने भिजली
विठ्ठलाची।
# राजेश्वर
No comments:
Post a Comment