Sunday, 3 January 2021

कतरा कतरा जीने दो ज़िंदगी है, बहने दो



बर,ठेवलसं का सगळं डिकीत....हं'

'बर लवकर आवरुन झालं सगळं, चल निघूया,
मावशींना सर्व सांगीतलच आहे, त्या ठेवतील नंतर दही फ्रिज मधे'.
कोल्हापूरला सुतार आणि fabrication वाला येतील 11 वाजेपर्यत, पोहचू ना तो पर्यंत?"

"oh..yeah"

त्याने FM रेडीओ लावला,
"झालं सुरु channel बदलायचं...एक स्टेशन ठेव रे...."

"नाही गं बोअर मारतं, 
गाणं आणि शायरी कशाबरोबर खातात यांना माहीत नाही...
बायदवे,तो माणूस किती हुशार असेल ना...
फोन वर वाया जाणारी बडबड त्याने लेडी- रेडीओजाॅकी मधे ज्याने बदलली असेल तो"
त्याने मिश्कीलपणे म्हटले,
तिने कृतककोपाने राग आल्यासारखा चेहरा केला...
यावर हसून त्याने रेडीओ चॅनल बदलला.

आशाचा सुमधूर आवाज आला,

"कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
ज़िंदगी है, बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो

कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था
नींद में थी तुमने जब छुआ था
गिरते गिरते बाहों में बची मैं
सपने पे पाँव पड़ गया था
सपनों में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
कतरा कतरा मिलती है..."


अहाहा वाहवा,
क्या बात है....बेहद खूष
त्याचं सूरु झालं,
" RD बर्मन की प्रतिभा....lyrics गुलजार,
आशा चा आवाज...परदे पर अनुराधा पटेल..वाह, "

"तुमची ती माधूरी वगैरे असेल पण जी बात अनुराधा मधे आहे, ती औरो में कहाँ !"

ती त्याकडे खाऊ का गिळू अशा ख-या रागाने पहात होती कारण त्याने मुंबईचा रस्ता धरला होता.
" हा पिक्चर मी दिल्लीला असतांना पाहिला होता...इजाजत आणि हे बर का super impose पध्दतीने घेतलयं गाणं.... यू नो म्हणजे दोन दृष्य पण आणि दोन आवाज पण...असा झरना,आणि अनुराधा पटेल.. क्या बात है "

"तू काहीच का बोलत नाहीस..."
"आता हे गाणं तीन दिवस डोक्यात फिरणार...
गाणं संपल कि रेडीओ बंद करणार, नंतर च्या निर्बुद्ध ad मुळे रसभंग नको"

"राजेश...."
तिचा अतिशय थकलेला आवाज आला...खोल दरीतून आल्यासारखा आवाज, प्रचंड रागाला दाबून ठेवल्यामुळे आलेली थरथर...
whatz the problem त्याला कळेना,

"आपल्याला कोल्हापूर ला जायचयं...."
तोच खचलेला आवाज,

" ओह, साॅरी...हा हाहा असं झालं का,
अर्रर्रर्रर्र...."

पटकन उजव्या आरशात,आणि रिअर व्हू मधे पहात,
"No worries..."

कार फिरली, पण तिचा मूड नाहीच,...
डॅडी गवळी सारखंच तिचं असावं
"चूकी ला माफी नाही"

अर्धा एक तास स्मशान-शांततेनंतर....
"जीव गेला तरी सांगणार नव्हते, मुंबई ला गेल्यावर सांगणार होते"
"आपण कुठे चाललोय...कशासाठी चाललोय,तिथं काय लागतं....काही विचार करायचाच नाही, मी मस्तीत जगतो म्हणे,
तो रेडीओ लागला की तू कुणाचाच नसतोस,
फेकून दिला पाहीजे तो रेडीओ"

जीवाचा प्रचंड संताप एकीकडे.
तर whats big deal हा approach दुसरीकडे. त्याने खांदे उडवले,

तो मनात.. "कामं राहीली तर,
रहने दो नाsssssआ,
कतरा कतरा बहती है,
जिंदगी है...जिंदगी है...
हंहंहं हंहं बहने दो ना"


"याचा आणखी राग येतो, काहीच चुकलं नाही का?"

" नोप, nothing wrong....काहीचं चुकलं नाही. परफेक्ट सकाळ,सुंदर गाणं, सुंदर मूड.
हं ..कामं राहीली असती.
कामं होतील किंवा होणार नाहीत,
कामं झाली नव्हती तेव्हा ही आपण जगत होतोच ना?
whatz imp for me....आपला quality time...मस्त मूड "
( झालं...अभिमान...part- कितवा तरी)

" तूम तूम हो, हम हम है" तो म्हणाला.

"कामगार येऊन थांबलील रे, त्यांना वेळ नसतो,मोठ्या मुश्कीलीने मी ...मी...मी फोनवर जुळवून आणते सर्व...आणि तू...तुला अजिबात कदर नाही माझी "
रडू आल्यामुळे पुढचं बोलताच आलं नाही.

"किती मोठं करशील एवढीशी गोष्ट,
रात गई बात गई....असल्या गोष्टी सोडून पुढे जायचं असतं, छोड ना यार,
चल मूड change करु या, लाव तुझ्या mobile मधली evergreen नाचरी गाणी"

"त्या साठी मूड चांगला लागतो"

"मूड, चांगला करायलाच, तुझी गाणी लाव सांगतोय ना...."
"तुला कुणी सांगीतलं,आपण 11 पर्यंत पोचणार नाही...ऐक ना"

"hello, madam-ji हम आके पहूँच गये है, वोह घरकी चाभी किनसे लेनी है?"

" आपको 11 बजे कहा था ना?"
"वोह क्या है,हमारे पास काम बहोत है ना,तो हम जल्दी आ गया हूँ"
"ठीक है, वही रुको, सब सामान लाये हो ना,मै चाबी किसीसे भिजवाती हूँ"

" आठ वाजता, helicopter ने पण पोचलो नसतो" तो म्हणाला.
ती दहा ठिकाणी फोनाफोनी करुन व्यवस्था करत होती.

तुमने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में ज़मीं है
बाकी भी तुम्हारी आरज़ू हो
शायद ऐसे ज़िन्दगी हंसीं है
आरज़ू में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
कतरा कतरा मिलती है...

हलके हलके कोहरे के धुंए में
शायद आसमां तक आ गयी हूँ
तेरी दोनों बाहों के सहारे
देखो कहाँ तक आ गयी हूँ
कोहरे में बहने दो
प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो
कतरा कतरा मिलती है...

10 comments:

  1. राजेश, वा वा काय मस्त गुंफलीस सगळी गोष्ट.हे जर खर्रच घडलेलं असेल, (म्हणजे मुंबईचा रस्ता वगैरे) तर...... not imagin, काय घडलं असेल त्या दिवशी.
    तिच्यासाठीचा एक एक कतरा (11 वाजता पोहोचण्याचा) किती महत्वाचा होता. आणि त्याच्यासाठी एक एक कतरा आनंदानी जगण्याचा महत्वाचा. दोघांसाठीही जिंदगी कतरा कतरा मिलती है च होती, त्या दिवशी.

    बाकी इजाजत सिनेमा, त्यातली गाणी, स्टोरी, acting, सगळं सगळं माझ्यासाठी ऑल time favourite aahe त्यामुळेच क त रा क त रा मुळे रस्ता चुकूही शकतो अस वाटलं

    फार सुंदर लेख लिहिला आहेस, मस्तच

    ReplyDelete
    Replies
    1. वाह विद्या, किती सुंदर comment दिलीस.
      खूप छान.
      Thanks for reading and kind words💞🙏🏻

      Delete
  2. Very Nice Rajesh. Keep it up

    ReplyDelete
  3. Mast Rajesh , Excellent. Yes , attitude changes everything. Let's give out a try to change the attitude.

    ReplyDelete
  4. Thanks dear visiter.
    well about attitude change, its too late.
    आता मडकं पक्क झालयं,आता काहीही आकार देता येणार नाही.

    ReplyDelete
  5. A small incident...But you made it interesting to read!!
    Btw..I HAVE to ask..
    खरच मुंबई ला निघाला होतास?

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks geetanjali for visiting blog.

      हाँ यार 🤦🏻‍♂️,पण जास्त नाही,2 kms असेल.
      नादीश्ट लोकांना खरं तर 'जिंदगीभर" च्या साठी माफ करुन टाकायला पाहीजे ना.

      Delete
    2. आणि कहर म्हणजे त्या गाण्यात अनूराधा पटेल नसून रेखा आहे....बोंबला..म्हणजे तिथेही रस्ता चुकलो !!

      Delete